आर्यन खान, मुनमुन धमेचा आणि अरबाझ मर्चंट यांना का मिळाला जामीन? काय म्हणालं बॉम्बे हायकोर्ट?

विद्या

• 10:15 AM • 20 Nov 2021

आर्यन खान, मुनमुन धमेचा आणि अरबाझ मर्चंट यांच्यासह आठ जणांना 2 ऑक्टोबरला ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटक करण्यात आली होती. एनसबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी ही कारवाई केली होती. त्यानंतर या कारवाईवर अनेक प्रश्नही उपस्थित केले गेले. नवाब मलिक यांनी ही संपूर्ण कारवाई म्हणजे एक प्रकारचा बनाव आहे असं सांगितलं. तसंच या प्रकरणातले साक्षीदार प्रभाकर साईल, […]

Mumbaitak
follow google news

आर्यन खान, मुनमुन धमेचा आणि अरबाझ मर्चंट यांच्यासह आठ जणांना 2 ऑक्टोबरला ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटक करण्यात आली होती. एनसबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी ही कारवाई केली होती. त्यानंतर या कारवाईवर अनेक प्रश्नही उपस्थित केले गेले. नवाब मलिक यांनी ही संपूर्ण कारवाई म्हणजे एक प्रकारचा बनाव आहे असं सांगितलं.

हे वाचलं का?

तसंच या प्रकरणातले साक्षीदार प्रभाकर साईल, के. पी. गोसावी, मिलिंद भानुशाली यांच्याकडून समोर आलेल्या गोष्टी या वेगळंच कथन करत होत्या. प्रभाकर साईलने खंडणीसाठी आर्यन खानला अडकवल्याचा आरोप केला. त्यामुळे खळबळ उडाली होती. दरम्यान 27 ऑक्टोबरला आर्यन खानला जामीन मंजूर कऱण्यात आला. तसंच मुनमुन धमेचा आणि अरबाझ मर्चंट यांनाही जामीन मंजूर करण्यात आला.

आता कोर्टाने आज जो आदेश जारी केला आहे त्यामध्ये जामीन का मंजूर करण्यात आला ते आला ते स्पष्ट केलं आहे. आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्यात अंमली पदार्थांशी संबंधित गुन्हे करण्याचा कट रचल्याचा कोणताही सकारात्मक पुरावा नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने आज जारी केलेल्या आदेशात म्हटलं आहे. षडयंत्र किंवा कट रचल्याचे कोणतेही पुरावे आढळले नाहीत. व्हॉट्स अॅप चॅटमध्ये काहीही आक्षेपार्ह नव्हतं असंही यामध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे.

आर्यन खान, मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांच्यात कट रचला गेला होता हे सिद्ध करण्यासाठी NCB सकारात्मक पुरावे गोळा करण्यात आणि परिस्थितीजन्य पुरावे दाखवण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याचंही कोर्टाने म्हटलं आहे. त्यामुळेच या तिघांना जामीन मंजूर करण्यात आला असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. आर्यन खान, मुनमुन धमेचा आणि अरबाझ मर्चंट हे एखाद्या व्यावसायिकाप्रमाणे ड्रग्जच्या गुन्हा सामील आहेत हे या टप्प्यावर सांगणं कठीण आहे. त्यांनी गुन्हेगारी कट रचला असा कोणताही पुरावा समोर आलेला नाही असंही कोर्टाने त्यांच्या आदेशात म्हटलं आहे.

आर्यन खान ड्रग्ज केसचा तपास आता संजय सिंग यांच्याकडे, वाचा सविस्तर कोण आहेत संजय सिंग?

आर्यन खानला 3 ऑक्टोबरला अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला ३० तारखेपर्यंत म्हणजेच 27 दिवस तुरुंगात काढावे लागले. त्याचा जामीन सत्र न्यायालयाने तीनवेळा नाकारला होता. ज्यानंतर 27 ऑक्टोबरला त्याचा जामीन बॉम्बे हायकोर्टाने मंजूर केला. त्यानंतर इतर औपचारिकता बाकी होत्या. ज्या पूर्ण झाल्या आणि आर्यन खान 30 ऑक्टोबरला तुरुंगाबाहेर आला.

कोर्टाने नेमकं काय म्हटलं आहे वाचा हे महत्त्वाचे मुद्दे

आरोपी क्रमाकं एक आर्यन खान याच्या व्हॉट्स अॅप चॅटमधून आक्षेपार्ह असं काहीही सापडलेलं नाही. त्याच्या चॅटवरून हे कुठेही सिद्ध होत नाही की तो मुनमुन धमेचा आणि अरबाझ मर्चंट यांच्यासोबत कट रचत होता.

या प्रकरणात मुनमुन धमेचा, अरबाझ मर्चंट आणि आर्यन खान या तिघांनाही एक गुन्हा करायचा होता याचे कोणतेही सबळ किंवा ठोस पुरावे आढळून येत नाहीत.

आर्यन खान, अरबाझ मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांची वैद्यकीय चाचणीही झाली नव्हती की ज्यावरून हे समजेल की त्यांनी छापा पडला तेव्हा ड्रग्ज घेतले होते की नव्हते.

आर्यन खान, मुनमुन धमेचा आणि अरबाझ मर्चंट हे क्रूझमधून प्रवास करत होता. फक्त या गोष्टीचा हवाला देऊन त्यांच्या विरोधात सेक्शन 29 लावता येणार नाही.

    follow whatsapp