परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांबाबत मुख्यमंत्री का बोलत नाहीत? -फडणवीस

मुंबई तक

• 09:21 AM • 21 Mar 2021

परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांबाबत मुख्यमंत्री का भूमिका घेत नाहीत ते गप्प का? उपमुख्यमंत्री गप्प का? असा प्रश्न आज देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. गृहमंत्र्यांवर झालेले आरोप गंभीर आहेत त्या प्रकरणी त्यांचा राजीनामा घ्यावा आणि या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसंच गृहखातं कोण चालवतं? शिवसेना चालवते की राष्ट्रवादी? कारण […]

Mumbaitak
follow google news

परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांबाबत मुख्यमंत्री का भूमिका घेत नाहीत ते गप्प का? उपमुख्यमंत्री गप्प का? असा प्रश्न आज देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. गृहमंत्र्यांवर झालेले आरोप गंभीर आहेत त्या प्रकरणी त्यांचा राजीनामा घ्यावा आणि या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसंच गृहखातं कोण चालवतं? शिवसेना चालवते की राष्ट्रवादी? कारण अधिवेशनाच्या वेळी गृहखात्याच्या मुद्द्यांवर अनिल परब हेच मुख्यत्वे करून बोलत होते. त्यामुळे हा प्रश्न पडला आहे असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

हे वाचलं का?

परमबीर सिंहांच्या आरोपानंतर अनिल देशमुख यांचं पत्रकातून स्पष्टीकरण

परबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांच्या आधी सुबोध जैस्वाल यांनीही आरोप केले होते. ते आरोपही गंभीर होते आहे. परबमीर सिंग यांनी त्यांच्या पत्रातून केलेले आरोप हे अत्यंत गंभीर आरोप आहेत. जैस्वाल यांनीही बदल्याचं रॅकेट कसं चालतं ते सांगितलं होती. त्यांची दखल त्यावेळी कुणीही घेतली नव्हती. महाराष्ट्रात बदल्याचं रॅकेट कसं चालतं त्यासंदर्भात हे पत्र लिहिण्यात आलं होतं. आता त्यापाठोपाठ परमबीर सिंग यांनी आरोप केले आहेत असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

त्यामुळे परमबीर सिंग यांनी लावलेला आरोप हा पहिला आरोप नाही. शरद पवार असं म्हणाले की परमबीर सिंग यांची बदली होत होती त्यामुळे त्यांनी हा आरोप लावला पण सुबोध जैस्वाल यांची तर बदली होत होत नव्हती. रश्मी शुक्ला यांची बदली होत नव्हती तरीही त्यांनी आरोप केले होते मात्र त्यांचे आरोप, त्यांच्या पत्रांकडे लक्ष दिलं गेलं नाही. एखादा निलंबित व्यक्ती जर सरकारने सेवेत पुन्हा घेतला तर त्याला एक्झुकिटिव्ह पोस्ट देता येत नाही हे मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना माहित नाही का? असाही प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे.

Sharad Pawar: अनिल देशमुखांबाबत उद्यापर्यंत निर्णय घेऊ: शरद पवार

शरद पवार यांची भूमिका आश्चर्चकारक

शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत घेतलेली भूमिका आश्चर्यकारक आहे. पण ठीक आहे कारण या महाविकास आघाडी सरकारचे निर्माते आहेत. त्यामुळे ते या सरकारला डिफेंड करत आहेत. या सरकारला वाचवण्यासाठी शरद पवार यांनी जी काही पत्रकार परिषद घेतली त्यात सत्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न झाला आहे.

    follow whatsapp