संपत्ती आणि घरगुती वादातून पत्नीने केलं पतीचं अपहरण, नवी मुंबईतला धक्कादायक प्रकार

मुंबई तक

• 10:30 AM • 10 Nov 2021

प्रॉपर्टी आणि घरगुती वादातून पत्नीने पतीचं अपहरण केल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईत घडली आहे. याप्रकरणी पत्नीसह आठजणांना अटक करण्यात आली. यात तीन महिलांचाही समावेश आहे. उरण येथील शेवा पोलिसांनी या आरोपींना कणकवलीमधून 45 वर्षीय विजयराजन चेट्टीयार यांची सुखरूप सुटका केली आहे. नवी मुंबईतील सिवूडस येथील विजयराजन चेट्टीयार यांचे बिल्डर्स आणि डेव्हलपर्स नावाची कंपनी आहे. विजयराजन […]

Mumbaitak
follow google news

प्रॉपर्टी आणि घरगुती वादातून पत्नीने पतीचं अपहरण केल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईत घडली आहे. याप्रकरणी पत्नीसह आठजणांना अटक करण्यात आली. यात तीन महिलांचाही समावेश आहे. उरण येथील शेवा पोलिसांनी या आरोपींना कणकवलीमधून 45 वर्षीय विजयराजन चेट्टीयार यांची सुखरूप सुटका केली आहे.

हे वाचलं का?

नवी मुंबईतील सिवूडस येथील विजयराजन चेट्टीयार यांचे बिल्डर्स आणि डेव्हलपर्स नावाची कंपनी आहे. विजयराजन यांची पत्नी अलगू मिनाक्षी चेट्टीयार यांचे पतीसोबत प्रॉपर्टी संदर्भात सातत्याने वाद होत असल्याने तामिळनाडू येथील न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, विजयराजन हे दुसऱ्या महिलेसोबत राहत असल्याचा संशय आल्याने त्यांच्या पत्नीने तिच्या सहकाऱ्यांसोबत कट रचला. यामध्ये, तिने मालमत्ता खरेदी करण्याचा बहाण्याने दोन महिला बोगस खरेदीदार पाठवून विजयराजन यांना उलवे येथे नेण्यात आले. याचदरम्यान, उलवेनजीक गाडी थांबवून पत्नी आणि तिच्या सहकाऱ्यांनी बोलेरो गाडीतून येऊन विजयराजन यांना धमकावून गाडीत बसविले आणि अपहरण केले.

यानंतर, अपंग असलेल्या विजयराजन यांना पुणे मार्गे गोव्याला नेण्यात आले असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने यांनी तात्काळ तपासासाठी एक पथक रवाना केले. याचदरम्यान, आरोपींनी विजयराजन यांना पुन्हा कणकवलीच्या दिशेने नेण्यात आल्याची माहिती पोलीसांना मिळताच त्यांनी आरोपींना पकडण्यासाठी पाठलाग केला. यावेळेस, पेट्रोल पंपावर असलेल्या बोलेरो गाडीत आरोपीना अटक करण्यात आली आणि अपहरण करण्यात आलेल्या विजयराजन यांची सुखरूप सुटका करण्यात आली. यावेळेस, हे अपहरणाचे संपूर्ण नाट्य हे मालमत्ता आणि पतीचे दुसऱ्या महिलेशी असलेल्या संबंधातून करण्यात आल्याचे समोर आले आहे. अटक करण्यात आलेल्या सर्वाना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे

    follow whatsapp