Crime: पतीच्या मित्रासोबत 10 वर्ष गुपचूप अनैतिक संबंध, पत्नीचं भयंकर कृत्य

मुंबई तक

03 Dec 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 08:47 AM)

Wife Killed Husband: मुंबई: विवाहबाह्य संबंधातून (extramarital affair)पत्नीने (Wife) प्रियकराच्या (boyfriend) मदतीने पतीची (Husband) हत्या (Murder) केली असल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. आरोपी प्रियकर हा मृत व्यक्तीचा जुना मित्र असल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटकही केली आहे. हत्येचा संशय येऊ नये यासाठी आरोपींनी कट रचला होता. मात्र, शवविच्छेदन […]

Mumbaitak
follow google news

Wife Killed Husband: मुंबई: विवाहबाह्य संबंधातून (extramarital affair)पत्नीने (Wife) प्रियकराच्या (boyfriend) मदतीने पतीची (Husband) हत्या (Murder) केली असल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. आरोपी प्रियकर हा मृत व्यक्तीचा जुना मित्र असल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटकही केली आहे. हत्येचा संशय येऊ नये यासाठी आरोपींनी कट रचला होता. मात्र, शवविच्छेदन अहवालानंतर पोलिसांचा संशय बळावला आणि याप्रकरणी जेव्हा तपास सुरू केला तेव्हा या प्रकरणातील सत्य अखेर बाहेर आलं. (wife killed her husband with the help of her lover from an extramarital affair)

हे वाचलं का?

कमलकांत शाह असे मृताचे नाव असून त्याचा कवितासोबत 2002 साली विवाह झाला होता. या दाम्पत्याला दोन मुले आहेत. मृत कमलकांत शाह आणि आरोपी हितेश जैन यांची मैत्री होती. त्यातच मृत कमलकांत यांची पत्नी कविता उर्फ काजल आणि हितेश जैन यांच्यात विवाहबाह्य प्रेमसंबंध होते. जवळपास 10 वर्षांपासून या दोघांमध्ये प्रेमप्रकरण सुरू होते. त्यानंतर कमलकांत यांची हत्या करण्याचा कट आखण्यात आला असावा असा पोलिसांचा संशय आहे. प्राथमिक तपासातून पोलिसांनी या दोन आरोपींना अटक केली आहे.

काही दिवसांपूर्वी प्रकृती खालावल्याने कमलकांत शाह यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. मात्र, कमलकांत शाह यांचा शवविच्छेदन अहवाल पाहिल्यानंतर पोलीसही चक्रावून गेले. विषबाधेतून त्यांचा मृत्यू झाला असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.

पतीकडून पत्नीच्या प्रियकराला गुप्तांगावर ‘ओलिनी स्प्रे’ मारत जबर मारहाण, अनैतिक संबंध असल्याचा संशय

आरोपी कविता, पती कमलकांतच्या जेवणात आर्सेनिक आणि थॅलियम मिसळत होती. या विषारी पदार्थांचा परिणाम कमलकांत यांच्या प्रकृतीवर झाला. ज्यामुळे प्रकृती खालावल्याने कमलकांत शाह यांना 3 सप्टेंबर रोजी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर 17 दिवसांनी त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले.

कमलाकांत शाह यांच्या निधनानंतर शवविच्छदेन अहवालातील काही गोष्टींकडे पोलिसांचे लक्ष गेले. या शवविच्छेदन अहवालात मिळालेल्या पुराव्याच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी भारतीय दंड विधान संहितातील कलम 302, 328, 120 (बी) नुसार, हत्येचा गुन्हा दाखल केला.

पोलिसांच्या प्राथमिक तपासात हितेश जैन आणि कविता यांच्यात प्रेमसंबंध असल्याचा उलगडा झाला. या दोघांमधील प्रेमसंबंध हे मागील एक दशकापासून सुरू असल्याचे समोर आले. यातील आरोपी हितेश जैन आणि कविता यांना विवाह करायचा होता. त्यामुळेच त्यांच्या मार्गात अडथळा ठरणाऱ्या कमलकांतला दूर करण्याचा कट त्यांनी आखला.

मुलाच्या टीचरसोबत जुळलं कपडा व्यापाऱ्याचं सूत, अनैतिक संबंधाचा गुंता अन् हत्येनं शेवट!

कमलकांतला मारल्यानंतर दोघेही विवाह करणार होते, असे प्राथमिक तपासात आढळून आले आहे. त्यामुळे दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. या दोघांनाही 8 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

    follow whatsapp