उद्धव ठाकरे फुटीर गटाची मागणी मान्य करणार?, मुलाखतीत सर्व प्रश्नांची उत्तरं मिळणार…

मुंबई तक

• 01:04 PM • 23 Jul 2022

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) शिवसेनेविरोधात बंड करत भाजपला जवळ करुन राज्यात सरकार स्थापन केले. त्यानंतर आरोपांची मालिका सुरु आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), आदित्य ठाकरे या बंडाने पुरते हाललेले आहेत. शिवसेनेच्या ४० आमदारांनी अगोदर सुरत मग गुवाहटी गाठली. १२ दिवस महाराष्ट्राबाहेर राहिल्यानंतर थेट बहुमत चाचणीच्या अगोदर महाराष्ट्रात पाऊल ठेवले. त्यानंतर अनेक गोष्टी पुलाखालून […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) शिवसेनेविरोधात बंड करत भाजपला जवळ करुन राज्यात सरकार स्थापन केले. त्यानंतर आरोपांची मालिका सुरु आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), आदित्य ठाकरे या बंडाने पुरते हाललेले आहेत. शिवसेनेच्या ४० आमदारांनी अगोदर सुरत मग गुवाहटी गाठली. १२ दिवस महाराष्ट्राबाहेर राहिल्यानंतर थेट बहुमत चाचणीच्या अगोदर महाराष्ट्रात पाऊल ठेवले. त्यानंतर अनेक गोष्टी पुलाखालून वाहून गेल्या आहेत. यावरच आता संजय राऊतांनी नवं ट्विट केले आहे. हे ट्विट आहे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीबाबत माहिती देणारं.

हे वाचलं का?

संजय राऊत घेणार उद्धव ठाकरेंची मुलाखत

”जोरदार मुलाखत.. सर्व प्रश्नांची सडेतोड उत्तरे.. महाराष्ट्राला प्रतीक्षा असलेली मुलाखत..सामना..26 आणि 27 जुलै.” असं ट्विट संजय राऊतांनी (Sanjay Raut) केले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या या मुलाखतीमधून आतापर्यंत घडलेल्या सर्व गोष्टींबाबत खुलासा होणार का? असा प्रश्न लोक विचारु लागले आहेत. काही वेळानंतर संजय राऊतांनी दुसरे ट्विट केले आणि त्याने मुलाखतीची उत्सुकता आणखी वाढलेली आहे.

मी: साहेब,फुटीर गटाची तुम्हाला एक विनंती आहे.

उद्धवजी: बोला..मी त्यांची विनंती लगेच मान्य करतो..

खळबळ जनक मुलाखत.

सामना: 26 आणि 27 जुलै

अशा आशयाचं ट्विट राऊतांनी केले आहे. त्यामुळे आता फुटीर गटाची मागणी काय आहे? त्याला उद्धव ठाकरेंनी काय उत्तर दिलं असेल यावर चर्चा सुरु झाली आहे. येत्या २६ आणि २७ जुलैला ही मुलाखत सामनावरती सर्वांना पाहता येणार आहे. एकनाथ शिंदेंसह ४० आमदारांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच जाहीर मुलाखत देत आहेत. संजय राऊतांनी ट्विट करताना एकनाथ शिंदे आणि BJP4Mumbai या अकाऊंट्सला टॅग केले आहे.

दरम्यान आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर सामानामधून सतत एकनाथ शिंदे आणि भाजपवरती निशाणा साधला जात आहे. त्याला बंडखोर आमदारही उत्तर देत आहेत. सरकार स्थापन होऊन बरेच दिवस झाले तरीही मंत्रीमंडळ विस्तार नाही त्यामुळेही शिंदे आणि फडणवीस टीकेची धनी होत आहेत. आता उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीमध्ये नवीन कोणत्या गोष्टी उलगडणार, सर्वसामान्यांना सर्व प्रश्नांची उत्तरं मिळणार का? याची उत्तरं २६ आणि २७ जुलैला मिळणार आहे.

    follow whatsapp