मुंबईतल्या मुलुंडमध्ये एका मुलाने आपल्या आजोबांची आणि वडिलांची हत्या करून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. एलबीएस मार्ग मुलुंड या ठिकाणी एका मुलाने इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारल्याची बातमी आधी समोर आली. शार्दुल मिलिंद मांगले असे या मुलाचे नाव आहे. या तरूणाला अग्रवाल रूग्णालयात दाखल करण्यात आले पण तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या तरूणासंदर्भात अधिकची माहिती घेतली असता त्याचे मानसिक संतुलन बिघडल्याने त्याने वडील मिलिंद मांगले आणि आजोबा सुरेश मांगले यांची हत्या केल्याचीही माहिती समोर आली आहे. मुलुंड पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी ही माहिती दिली.
ADVERTISEMENT
मुलुंड पश्चिमेला असलेल्या वसंत ऑस्कर सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे. सुरेश मांगले (वय ८५) आणि मिलिंद मांगले (वय ५५ ) या दोघांना शार्दुल मांगलेनं चाकूने भोसकलं. मानसिक संतुलन बिघडल्याने त्याने हे कृत्य केलं. त्यानंतर शार्दुलने सहाव्या मजल्यावरून उडी मारली. या घटनेत तो जखमी झाला. त्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं तेव्हा डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
ADVERTISEMENT