सातारा : न्यायाधीशाच्या भावावर प्राणघातक हल्ला; एक डोळा निकामी, एकाला अटक

मुंबई तक

• 08:35 AM • 16 Mar 2022

शाहूनगर (जि. सातारा) येथील अ‍ॅड. राम खारकर (वय ३८, रा. शाहूनगर) यांच्यावर प्राणघातक हल्ला करुन त्यांच्या वाहनाची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. यात त्यांचा डोळा निकामी झाला असून, हल्ला करणाऱ्या टोळीतील युवकांची नावं समोर आली आहे. त्यापैकी एकाला शाहूपुरी पोलिसांच्या डीबी पथकाने एकाला केली आहे. संशयित सातारा, पुणे, सांगली येथील असल्याचे तपासात समोर येत […]

Mumbaitak
follow google news

शाहूनगर (जि. सातारा) येथील अ‍ॅड. राम खारकर (वय ३८, रा. शाहूनगर) यांच्यावर प्राणघातक हल्ला करुन त्यांच्या वाहनाची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. यात त्यांचा डोळा निकामी झाला असून, हल्ला करणाऱ्या टोळीतील युवकांची नावं समोर आली आहे. त्यापैकी एकाला शाहूपुरी पोलिसांच्या डीबी पथकाने एकाला केली आहे. संशयित सातारा, पुणे, सांगली येथील असल्याचे तपासात समोर येत आहे.

हे वाचलं का?

खारकर यांचे बंधू न्यायधीश असून, चक्क न्यायाधीशांच्या भावावरच प्राणघातक हल्ला करण्यात आल्याने साताऱ्यात खळबळ उडाली आहे.

बीडमध्ये अवैध धंद्यांना संदीप क्षीरसागर यांचं संरक्षण, शिवसेनेचा राष्ट्रवादीवर निशाणा

याबाबत अधिक माहिती अशी, की ही घटना १२ मार्च रोजी रात्री १०.३० वाजताच्या दरम्यान घडली. तक्रारदार वकील राममोहन खारकर हे (एम एच ११ डीके ००१६) कारमधून घरी निघाले होते. मोनार्क हॉटेलपासून पुढे चढानजीक आल्यानंतर तेथे ५ ते ६ युवक थांबले होते.

संबंधितांना ‘रस्त्यावरुन बाजूला व्हा’, असे म्हटल्यानंतर संशयित युवकांनी तक्रारदार यांच्यासोबत वाद घातला व त्यांच्या अंगावर धावून गेले. संशयितांनी हल्ला चढवत कारच्या काचा फोडल्या. यातच त्यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. उपचारादरम्यान त्यांचा डोळा निकामी झाला आहे.

नाशिक : पोलीस चौकीत रंगली ओली पार्टी, मद्यधुंद पोलिसांची नागरिकाला धक्काबुक्की

साताऱ्यात तीव्र पडसाद

या घटनेनं साताऱ्यात खळबळ उडाली आहे. त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. वकील संघटनेनं एक दिवस काम बंद आंदोलन करत तत्काळ संशयित आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे.

गेली चार दिवस सातारा पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत होते, मात्र त्यात यश येत नव्हते. अखेर शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोनि. संजय पतंगे, फौजदार नानासाहेब कदम, पोलीस अमित माने, लैलेश फडतरे यांना माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण (डीबी) पथकाने एकाच्या मुसक्या आवळल्या आहेत.

    follow whatsapp