नवी मुंबई : ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Aapasaheb Dharmadhikari) यांच्या ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ (Maharashtra Bhushan) सोहळ्याला मोठं गालबोट लागलं आहे. या पुरस्कार सोहळ्यात उपस्थित असलेल्या 11 श्रीसदस्यांचा रणरणत्या उन्हात उष्माघाताने मृत्यू झाला असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तर 24 जणांवर वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. याशिवाय 25 जणांना प्राथमिक उपचार करुन घरी पाठविण्यात आले असल्याचीही माहिती आहे. (7 died in Aapasaheb Dharmadhikari Maharashtra Bhushan award ceremony distribution)
ADVERTISEMENT
दरम्यान, आज संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपराचार्थ दाखल श्रीसदस्यांची रुग्णालयात भेट घेतली. यावेळी शिंदे म्हणाले, मी मृत श्रीसदस्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ही अतिशय वेदनादायी आणि दुर्दैवी घटना आहे. मृत कुटुंबीयांना सरकारच्यावतीने 5 लाख रुपयांची मदत देण्यात येणार असून सर्व उपचार घेणाऱ्या श्रीसदस्यांचा मोफत इलाज करण्याच्या सुचनाही प्रशासनाला दिल्या असल्याचं त्यांनी सांगितलं. जखमींपैकी काही जणांवर खारघर सेंट्रल पार्कजवळील टाटा हॉस्पिटल, कामोठे येथील एमजीएम हॉस्पिटल, वाशी येथील महानगरपालिका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
Uddhav Thackeray : ‘सच्चा समाजसेवकापुढे तुम्हाला झुकावचं लागलं…’ ठाकरेंचा शाहंना टोला
याबाबत अधिक माहिती अशी की, आज (रविवारी) नवी मुंबईजवळील खारघर येथील सेंट्रल पार्क मैदानावर महाराष्ट्र सरकारच्या वतीने महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना 2022 या वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तब्बल 25 लाख श्रीसदस्यांनी उपस्थिती लावली होती.
या सोहळ्यासाठी कालपासूनच जागा मिळविण्यासाठी अनेक श्रीसदस्य उपस्थित होते. तर अनेक श्रीसदस्य आज उपस्थित झाले होते. यावेळी रणरणत्या उन्हामुळे अनेक श्रीसदस्यांना त्रास जाणवू लागला. यातील 11 श्रीसदस्यांना उष्माघाताना आपला जीव गमवावा लागला आहे. तर जवळपास 49 श्रीसदस्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं. यातील 25 जणांना प्राथमिक उपचारानंतर घरी पाठविण्यात आलं तर 24 जणांवर अद्यापही उपचार सुरु आहेत.
फडणवीसांनी मोदींकडे शब्द टाकला अन् अप्पासाहेबांना…; शाहांनी सांगितला किस्सा
कोण आहेत अप्पासाहेब धर्माधिकारी?
आप्पासाहेब धर्माधिकारी हे ज्येष्ठ निरुपणकार स्व. नानासाहेब धर्माधिकारी यांचे पुत्र आहेत. आप्पासाहेबांनी वडिलांकडूनच निरुपणाचा वसा घेतला. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी बाल संस्कार वर्ग, आरोग्य शिबीरे, रक्तदान शिबीरे, व्यसनमुक्ती, परिसर स्वच्छता, वृक्ष लागवड, पर्यावरण संवर्धन, विहिरी पुनर्भरण, शैक्षणिक साहित्य वाटप हे आणि इतर समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून डी.वाय. पाटील विद्यापीठाने मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली. 2017 मध्ये केंद्र सरकारने त्यांना पद्मश्री हा नागरी सन्मान देऊन गौरवले आहे.
ADVERTISEMENT