Sayaji shinde राष्ट्रवादीत! पक्षप्रवेश होताच अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी

सौरभ वक्तानिया

11 Oct 2024 (अपडेटेड: 11 Oct 2024, 07:56 PM)

Sayaji Shinde Join Ajit Pawar Ncp : अभिनेते सयाजी शिंदे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. अजित पवारांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला आहे. या पक्षप्रवेशाला प्रफुल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे असे अनेक नेते उपस्थित होते.

actor sayaji shinde join ajit pawar ncp maharashtra assembly election 2024

अभिनेते सयाजी शिंदे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत

follow google news

बातम्या हायलाइट

point

सयाजी शिंदेंचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत

point

अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पडला पार

point

पक्षप्रवेश होताच दिली मोठी जबाबदारी

Sayaji Shinde Join Ajit Pawar Ncp : बॉलिवूड,तमिळ आणि मराठी फिल्म इंडस्ट्रील आपल्या अभिनयाचा ठसा उमटणारे अभिनेते सयाजी शिंदे यांनी आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. अजित पवारांच्या उपस्थित हा पक्षप्रवेश पार पडला आहे. या पक्षप्रवेशाला अनेक नेत्यांची उपस्थिती होती.या पक्षप्रवेशानंतर अजित पवारांनी सयाजी शिंदेंवर मोठी जबाबदारी दिली आहे. त्यामुळे नेहमी पडद्यावर दिसणारे सयाजी शिंदे आगामी विधानसभा निवडणुकीत एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.  (actor sayaji shinde join ajit pawar ncp maharashtra assembly election 2024) 

हे वाचलं का?

सयाजी शिंदे यांचा मुंबईत आज अजित पवारांच्या पक्षात जाहीर प्रवेश झाला आहे.या पक्षप्रवेशाला प्रफुल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे असे अनेक नेते उपस्थित होते. मी जास्त चित्रपट पाहत नाही, पण सयाजी शिंदे याचे चित्रपट मी पाहिले आहेत. अभिनयावर एक वेगळ्या प्रकारचा ठसा सयाजी शिंदे यांनी उमटवला आहे, असे  कौतुक अजित पवार यांनी केले आहे. सयाजी शिंदे, सयाजी यांचे चित्रपट समाजात जागरूकता वाढवतात. अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी केले आहेत. सह्याद्री देवराई या सामाजिक संस्थेमार्फत ते राज्यभर वृक्षारोपण करतात, असे अजित पवार यांनी सांगितले. 

हे ही वाचा : Noel Tata : रतन टाटा यांचा उत्तराधिकारी ठरला! कुटुंबातील 'ही' व्यक्ती सांभाळणार 3800 कोटींचं साम्राज्य ?

सयाजी शिंदे यांच्यावर कोणती जबाबदारी द्यावी. याबाबत आमच्यात सखोल चर्चा झाली आहे. त्यानुसार सयाजी शिंदे हे पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून काम करणार आहेत, अशी माहिती अजित पवारांनी दिली. 

सयाजी शिंदे काय म्हणाले? 

सिनेमात मी नेत्यांच्या भूमिका केल्या आहेत, खलनायकाच्या भूमिका केल्या आहे.आता वाईट माणसाने राजकारणात यायचं असं काही बंधन नाही ना, मी राजकारणात प्रवेश करेन असं मला वाटलं नव्हतं, असं सयाजी शिंदे यांनी म्हटलं आहे. 

मंत्रालयात मी 25 वेळा गेलो असेल तर 15 वेळा अजित दादांना भेटलो असेल. माझी त्या वेळेस काम झाली आहे. मला या पक्षाच्या विचारधारा आणि स्ट्रेटेजीस मला आवडल्या आहेत. शेतकऱ्यांच्या योजनासंदर्भात अजितदादांशी माझी चर्चा झाली. त्यावेळेस हा पक्ष चांगला निर्णय घेतोय, असं मला जाणवलं. तसेच लाडक्या बहिणींचा निर्णय देखील मला आवडला. या योजनेचा अनेकांना फायदा होतोय. या निर्णयामुळेच मी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे सयाजी शिंदे यांनी सांगितले आहे. सगळे पक्ष हे एकसारखेच असतात. पण या पक्षात मला विश्वास वाटतो, याचा मला सार्थ अभिमान आहे,असे देखील शेवटी सयाजी शिंदे म्हणाले आहेत. 

हे ही वाचा : Bhanudas Murkute: महिलेवर अत्याचार करणाऱ्या माजी आमदारचा 'तो' फोटो का होतोय Viral.. काय आहे कहाणी?

 

    follow whatsapp