Ajit Pawar meets Sharad Pawar Delhi : पवारांची भेट, अर्ध्या तासानंतर बाहेर, अजितदादा, भुजबळ, पटेल काय म्हणाले?

सुधीर काकडे

12 Dec 2024 (अपडेटेड: 12 Dec 2024, 10:33 AM)

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पक्षाला चांगलं यश मिळालं, तर फक्त 10 आमदार निवडून आल्यानं शरद पवार यांना धक्का बसला. मात्र, त्यानंतर या सर्व घडामोडी घडून गेल्यानंतर अजित पवार आज शरद पवार यांची भेट घेत आहेत. निमित्त जरी वाढदिवसाचं असेल, तरी यामध्ये चर्चा काय होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

अजित पवार पवारांच्या भेटीनंतर काय म्हणाले?

point

शरद पवार यांच्यासोबत कोणत्या विषयांवर चर्चा?

शरद पवार यांची साथ सोडून भाजपसोबत जाऊन सत्तेत बसलेल्या अजित पवार आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली. अजित पवार, पार्थ पवार, सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ या सर्व नेत्यांनी आज दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी भेटीसाठे गेले आहेत. शरद पवार यांचा जन्म 12 डिसेंबर 1940 रोजी झाला असून, यंदा ते 85 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. वाढदिवसाच्या दिवशी ही भेट घेतल्यानंतर अजित पवार काय म्हणाले यावर सर्वांचं लक्ष होतं. साधारणत: साडेनऊ वाजता शरद पवार यांच्या निवासस्थानी गेलेले अजित पवार आणि त्यांचे सहकाही 10 वाजता बाहेर आलेत. 

हे वाचलं का?

 

हे ही वाचा >> CM फडणवीसांची दिल्लीत जाऊन खलबतं, शिंदे-अजितदादांच्या 'त्या' खात्यांवरही भाजपचा डोळा!


अजित पवार म्हणाले, शरद पवार साहेबांसोबत परभणी, राज्यसभा आणि लोकसभेबद्दल चर्चा झाली. मंत्रिमंडळाचं काय झालं, हिवाळी अधिवेशन वैगेरे गोष्टींवर आमच्यात चर्चा झाली. तसंच चहा-नाष्टा झाला असं अजिदादांनी सांगितलं. आज साहेबांचा वाढदिवस आहे, त्यांना सगळेच शुभेच्छा द्यायला  येत असतात असंही अजितदादा म्हणाले.  यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत राजकारण कसं करायचं हे शिकवलं आहे हे सांगायलाही अजित पवार विसरले नाहीत. पुढे त्यांनी यावेळी सांगितलं की, 14 डिसेंबरला शपथविधी होऊ शकतो.

 

हे ही वाचा >> Mangesh Chivate: फडणवीस CM होताच शिंदेंना मोठा झटका! अत्यंत जवळच्या सहकाऱ्याला हटवलं


शरद पवार यांच्या भेटीनंतर प्रफुल्ल पटेल म्हणाले, शरद पवार यांचं आरोग्य चांगलं राहो, त्यांचं नेतृत्व महाराष्ट्राला आणि देशाला मिळत राहो या सदिच्छा देण्यासाठी इथे आलो. छगन भुजबळ म्हणाले, आम्ही कायम त्यांना शुभेच्छा देत असतो. मी त्यांच्यासोबत तीस वर्षांहून अधिक दिवस काम केलं आहे, त्यामुळे राजकारण राजकारणाच्या ठिकाणी आहे, पण स्नेहसंबंध आहेतच ना असं छगन भुजबळ म्हणाले आहेत.

दरम्यान, अजित पवार यांनी आज आपण अमित शाह यांची भेट घेणार असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल काय निर्णय होणार यावर सर्वांचं लक्ष असणार आहे. 

    follow whatsapp