महाराष्ट्रातील आणखी एका जिल्ह्याचे नामांतर! अहमदनगरमध्ये CM एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

मुंबई तक

31 May 2023 (अपडेटेड: 31 May 2023, 02:44 PM)

Ahmadanagar Name Change As Ahilya Devi Nagar : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर अहिल्यादेवी होळकरनगर करणार असल्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर अहमदनगरवासियांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

maharashtra ahmadanagar district name change as ahilya devi nagar cm eknath shinde announcemnet

maharashtra ahmadanagar district name change as ahilya devi nagar cm eknath shinde announcemnet

follow google news

Latest News Maharashtra Politics : अहमदनगर (Ahmadnagar) जिल्ह्याच्या नामांतराची मागणी गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होती. त्यानुसार आज पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर (Ahilyabai Holkar) यांच्या जयंतीचे औचित्य साधत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर अहिल्यादेवी होळकरनगर (Ahilya Devi Nagar) करणार असल्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर अहमदनगरवासियांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. (ahmadanagar district name change as ahilya devi nagar cm eknath shinde announcemnet)

हे वाचलं का?

अहमदनगरच्या जामखेडच्या चौडी येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर (Ahilyabai Holkar) यांच्या 298 व्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर अहिल्यादेवी होळकरनगर करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता औरंगाबादच छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशीव केल्यानंतर आता अहमदनगरचे नामांतर होणार आहे.आज रामभाऊ शिंदे आणि गोपिचंद पडळकर यांनी मागणी मांडली.उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझीही तीच इच्छा आहे. आणि तुमच्या सर्वांच्या इच्छेखातर अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर अहिल्यादेवी होळकरनगर करण्याचा निर्णय़ राज्य सरकारने घेतला आहे.

हे ही वाचा : जेजुरी विश्वस्त वाद : 5 माणसांमुळे जेजुरीकर भडकलेत, समजून घ्या वाद काय?

अहिल्यादेवी यांचे कार्य हिमालयाऐवढे आहे. त्यामुळे अहमदनगरचं नामांतर आमच्या काळात होतंय, हे आमचे भाग्य आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. अहिल्या देवीच्या भक्तांसाठी या सरकारने अहिल्यादेवी सहकारी तत्वावरील महामंडळाला 10 हजार कोटींची तरतुद केली आहे. तसेच 300 वी जयंती अहिल्या देवींची अशी साजरी करू की जगातल्या सर्वांना हेवा वाटेल, असे देखील मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत.

आपलं सरकार तर हिंदूत्ववादी सरकार आहे, आपण छत्रपतींचे नाव सांगणारे लोक आहोत, आपण तुमच्याच नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगर, धाराशीव तयार केले आहे, आणि आता मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली अहिल्या नगरही झालंच पाहिजे. मला विश्वास आहे छत्रपतींचा मावळा मुख्यमंत्री आहे. तर अहिल्यानगर होणारचं, असा विश्वास उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे.

    follow whatsapp