Ajit Pawar: महाराष्ट्राच्या राजकारणातील सगळ्यात मोठी बातमी, अजितदादा मुलासाठी बारामती विधानसभा सोडणार?

मुंबई तक

15 Aug 2024 (अपडेटेड: 15 Aug 2024, 04:21 PM)

Ajit Pawar On Jay Pawar : आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांना विधानसभेची उमेदवारी मिळणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यामुळे शरद पवार गटाचे युगेंद्र पवार आणि जय पवार यांच्यात जोरदार लढत होईल, असं बोललं जात आहे.

अजित पवार (फाइल फोटो)

अजित पवार

follow google news

बातम्या हायलाइट

point

बारामतीत रंगणार पवार विरुद्ध पवार लढत?

point

"शेवटी लोकशाही आहे. मला त्यात फार रस नाही"

point

जय पवार यांच्या उमेदवारीबाबत अजित पवार काय म्हणाले?

Ajit Pawar On Jay Pawar : लोकसभा निवडणुकीत सर्वांच्या नजरा लागलेल्या बारामती मतदारसंघात आता पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार असा राजकीय सामना रंगण्याची शक्यता आहे. लोकसभेत सुप्रिया सुळे यांनी दीड लखांहून अधिक मताधिक्क्यानं सुनेत्रा पवार यांचा पराभव केला. सुनेत्रा पवारांच्या पराभवामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला होता. परंतु, आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांना विधानसभेची उमेदवारी मिळणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यामुळे शरद पवार गटाचे युगेंद्र पवार आणि जय पवार यांच्यात जोरदार लढत होईल, असं बोललं जात आहे. याच पार्श्वभूवीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. "ठिक आहे, देऊया...शेवटी लोकशाही आहे. "मला त्यात फार रस नाही. कारण मी सात-आठ निवडणुकीत लढलो आहे. त्यासंदर्भात जनतेचा आणि कार्यकर्त्यांचा कौल कसा असेल, याबाबत पार्लमेंटरी बोर्डात नक्कीच विचार केला जाईल", असं मोठं विधान पवारांनी माध्यमांशी बोलताना केलं आहे. (A strong discussion is going on Ajit Pawar's son Jai Pawar will get the candidature of the Legislative Assembly in the upcoming Maharashtra assembly elections)

हे वाचलं का?

जय पवार यांच्या उमेदवारीबाबत अजित पवार काय म्हणाले?

तरुणांना संधी देण्याच्या मुद्द्यावरून बारामतीत जय पवार यांना संधी दिली जावी, असं समर्थक म्हणतात. यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले, "ठिक आहे, देऊया...शेवटी लोकशाही आहे. मला त्यात फार रस नाही. कारण मी सात-आठ निवडणुकीत लढलो आहे. त्यासंदर्भात जनतेचा आणि कार्यकर्त्यांचा कौल कसा असेल, याबाबत पार्लमेंटरी बोर्डात नक्कीच विचार केला जाईल. पार्लमेंटरी बोर्ड आणि त्या विभागाचे कार्यकर्ते जी काही मागणी करतील, ते करायला आम्ही तयार आहोत". 

हे ही वाचा >>Kolkata Crime : कोलकाताच्या अत्याचाराच्या घटनेनंतर 'ती' पोस्ट व्हायरल! सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला नेटकऱ्यांनी सुनावलं

अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी बारामती लोकसभा निवडणूक लढवावी, अशी जोरदार मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली होती. त्यानंतर शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांना या लोकसभा मतदारसंघात निवडून आणण्यासाठी कंबर कसली. बारामतीत झालेल्या पवार विरुद्ध पवार लढतीची दिल्लीतही चर्चा रंगली. अशातच आता विधानसभा निवडणूक येत्या काही दिवसांत होऊ घातली असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार तर राष्ट्रवादीकडून जय पवार उभे राहणार असल्याचं संकेत मिळत आहेत. या दोन्ही उमेदवारांना अधिकृतपणे उमेदवारी जाहीर केल्यास, बारामतीत पुन्हा एकदा पवार कुटुंबीयांमध्ये राजकीय रणधुमाळी पाहायला मिळेल. 

    follow whatsapp