Rohit Pawar Mumbai Tak Chawadi: राष्ट्रवादीत बंडखोरीकरून अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर इतर 8 नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली होती. अजित पवार गट शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना त्यांच्या गटात सामील होण्याची ऑफर दिली होती. या ऑफरनंतर अनेक नेते अजित पवार गटात सामील देखील झाले होते. अशीच ऑफर आमदार रोहित पवारांनाही आली होती. पण या ऑफरला त्यांनी नकार का दिला, याची माहिती आता रोहित पवार यांनी मुंबई TaK चावडीवर दिली आहे. (ajit pawar group offer rohit pawar sharad pawar mumbai tak chawadi maharashtra politics)
ADVERTISEMENT
राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर अनेक नेत्यांना अजित दादांच्या गटात सामील होण्याच्या ऑफर येत होत्या. अशात रोहित पवारांना देखील अजित दादांच्या गटाची ऑफर आली होती.विशेष म्हणजे ही ऑफर अजित दादांनी नव्हे तर दस्तुरखुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच दिल्याचा खुलासा रोहित पवार यांनी यावेळी केला.
2 जुलैच्या अजित पवार गटाच्या शपथविधीदरम्यान मी आणि शरद पवार चर्चा करत होतो. या चर्चेदरम्यान आम्ही टीव्ही लावला होता. त्यावेळेस शपथविधीला सुरूवात झाली होती आणि शरद पवारांच्या चेहऱ्यावर हास्य होते. साहेब कधीच ताण घेत नाही, असे रोहित पवारांनी सांगितले.
हे ही वाचा : INDIA PC: शरद पवारांनी टाकला भलताच डाव, PM मोदींना चॅलेंज अन् अजितदादांचा करेक्ट कार्यक्रम?
रोहित पवार पुढे म्हणाले, अजित दादांच्या शपथविधीनंतर शरद पवारांनी मला 3 पर्याय दिले. 1) भूमिका बदलून अजित पवार गटात जा, 2) राजकारण सोडून दे आणि व्यावसायाकडे लक्ष दे, 3) संघर्ष करण्याची तयारी ठेव. हे पर्याय सुचवल्यावर मी लगेचच तिसरा पर्याय निवडला. पण शरद पवारांनी,असे निर्णय एकट्यात कधीच घ्यायचे नसतात, तुझी पत्नी, आई-वडील आहेत, त्याच्याशी बोलून दोन दिवसात निर्णय कळव. मी घरी जाऊन सर्वांशी चर्चा केली. सर्वांनी मला शरद पवारांसोबत खंबीरपणे उभे राहण्यास सल्ला दिली. त्यानंतर मी शरद पवारांना भेटून त्यांना निर्णय सांगितला.त्यावेळी ते लगेच हसले, म्हणजे त्यांना माझा निर्णय पटला होता, असे रोहित पवार यांनी सांगितले.
तसेच रोहित पवार यांना अजित दादांकडून ऑफर आली होती का? असा प्रश्न विचारला होता. यावर रोहित पवार म्हणाले, बघा माझी भूमिका किती स्पष्ट आहे, ती इतकी स्पष्ट आहे कुणी विचारलंच नाही, असे रोहित पवार यांनी सांगितले.
ADVERTISEMENT