Ncp split latest news : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झालं. अजित पवारांसह 40 आमदारांनी शिवसेना-भाजप सरकारला पाठिंबा दिला. पण, शरद पवारांकडून सातत्याने असा दावा केला गेला की पक्षात फूट पडलेली नाही. आता निवडणूक आयोगानेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेली असल्याचे म्हटले आहे. यासंदर्भातील सुनावणीची तारीखही निश्चित झाली आहे. आयोगातील सुनावणीसंदर्भातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावरून त्यांनी त्रागा केला.
ADVERTISEMENT
पुण्यात अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी निवडणूक आयोगात बाजू मांडण्यासाठी काय तयारी केली आहे, असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला.
हेही वाचा >> Nagpur News : नागपूरात साजरा होणारा मारबत उत्सव आहे तरी काय?
त्याला उत्तर देताना अजित पवार म्हणाले, “प्रत्येकजण आपापली भूमिका मांडणार. तुम्हाला काय सांगायचं की अशी तयारी केलीये. असे जोर काढलेत. अशा बैठका काढल्या. तुम्ही कसे रे प्रश्न विचारता”, असा नाराजीचा सूर अजित पवारांनी लावला.
ते पुढे म्हणाले, “त्यासंदर्भात ज्यांना बोलावलेलं आहे, ते सगळेजण आपापल्या पद्धतीने आमची बाजू कशी उजवी आहे. आमची बाजू कशी योग्य आहे. हे तिथे ते सांगतील.”
“निवडणूक आयोगाचा निर्णय मान्य करावा लागेल”
“दोन्ही गटांनी तिथे सांगितल्यानंतर निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाने अधिकार दिला आहे. दोघांचं ऐकून घेतील आणि काय तो निर्णय देतील. ते जो निर्णय देतील, तो दोघांना मान्य करावा लागेल”, अशी भूमिका अजित पवारांनी मांडली.
अमित शाहांचा मराठवाडा दौरा रद्द, शाहांनी सांगितलं कारण…
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्याबद्दल अजित पवारांनी महत्त्वाची अपडेट दिली. ते म्हणाले, “तीन राज्यातील निवडणुका येऊ घातल्या आहेत. जी20 च्या निमित्ताने अनेक मान्यवर दिल्लीत आले होते. आता पाच दिवसांचं लोकसभेचं अधिवेशन बोलवण्यात आलं आहे. या सगळ्या गोष्टी घडत आहेत.”
हेही वाचा >> Wrong UPI MoneyTransfer : गुगल पे, फोन पेद्वारे चुकीच्या अकाउंटमध्ये पैसे गेले तर काय करायचं?
“आम्ही आधीच अमित शाह यांना मराठवाडा मुक्तिसंग्रामाला बोलावलेलं होतं. पण, त्यांच्या कामाच्या व्यापामुळे तो कार्यक्रम थांबवावा लागला. त्यांना इतर कामांना अग्रक्रम द्यावा लागत असल्यामुळे त्यांना येता येणार नाही म्हणून तो कार्यक्रम रद्द करण्यात आला”, अशी माहिती अजित पवारांनी दिली.
ADVERTISEMENT
