Ajit Pawar: 'माझ्याकडून चूक झाली', सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीबद्दल अजित पवारांची कबुली

मुंबई तक

13 Aug 2024 (अपडेटेड: 13 Aug 2024, 06:33 PM)

Ajit Pawar Sunetra Pawar: बारामती लोकसभा निवडणुकीत अजित पवारांनी पत्नी सुनेत्रा पवारांना सुप्रिया सुळे यांच्याविरोधात उमेदवारी दिली होती. ती चूक होती, अशी कबुली आता अजित पवारांनी दिली.

सुनेत्रा पवार यांना सुप्रिया सुळे यांच्याविरोधात उमेदवारी देणे, चूक होती, असे विधान अजित पवार यांनी केले.

अजित पवार, सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार.

follow google news

बातम्या हायलाइट

point

लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवारांची कबुली

point

सुनेत्रा पवारांच्या उमदेवारीबद्दल अजित पवार बोलले

point

अजित पवार सुप्रिया सुळे यांच्या घरी जाणार

 Ajit Pawar Supriya Sule Sunetra Pawar: बारामती लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर तब्बल अडी महिन्यांनी अजित पवारांनी एक मोठं विधान केले. बारामती लोकसभा मतदारसंघात बहीण सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अजित पवारांनी सुनेत्रा पवारांना उमेदवारी दिली होती. त्या उमदेवारीबद्दल अजित पवारांनी पहिल्यांदाच पश्चाताप व्यक्त केला आहे. अजित पवारांच्या या विधानाचे आता वेगवेगळे अर्थ काढण्यास सुरूवात झाली आहे. (Ajit Pawar Said that i Made a mistake by fielding my wife Sunetra Pawar against my sister Supriya Sule in Lok Sabha Election)

हे वाचलं का?

अजित पवार विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. पक्ष बांधणी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पेरण्यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात जन सन्मान यात्रा काढली आहे. याच यात्रेदरम्यान अजित पवारांनी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. 

अजित पवार म्हणाले, 'माझ्या सगळ्या बहिणी लाडक्या'

बारामतीची लाडकी बहीण आहे कुणी पवारांच्या घरात? असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला होता. याच प्रश्नाला उत्तर देताना अजित पवारांनी चूक झाल्याचे कबुली दिली.

हेही वाचा >> "...तर महाविकास आघाडी तुटली असती", पृथ्वीराज चव्हाणांचे विधान 

अजित पवार म्हणाले की, "सगळ्या माझ्या बहिणी लाडक्या आहेत. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी, बहिणी माझ्या सगळ्या लाडक्या आहेत. अनेक घरांमध्ये राजकारण त्या ठिकाणी चालते. राजकारण हे पार घरामध्ये शिरू द्यायचे नसते."

'माझ्याकडून चूक झाली',अजित पवारांची कबुली

याच प्रश्नावर अजित पवार पुढे म्हणाले की, "मागे मात्र माझ्याकडून थोडीशी चूक झाली. त्याकाळात मी माझ्या बहिणीच्या विरोधात सुनेत्राला उभे करायला नको होते. त्यावेळी केले गेले. पार्लमेंटरी बोर्डाने निर्णय घेतला गेला. परंतु आता जे झाले... एकदा बाण सुटल्यावर आपण काही करू शकत नाही. आज माझे मन मला सांगते की, असे व्हायला नको होते."

हेही वाचा >> ठाण्यातून लढणार की वरळीतून? आदित्य ठाकरेंचा निर्णय झाला

राखापौर्णिमेला सुप्रिया सुळेंना भेटणार

फोन करून आपण बोलावे, राखीपौर्णिमेला जावे, असे काही आहे का? अजित पवार म्हणाले, "आता महाराष्ट्राचा दौरा चाललेला आहे. त्याच काळात मी तिथे असेल आणि माझ्या बहिणी पण तिथे असतील, तर जरूर मी जाणार",असे अजित पवार यांनी सांगितले. महत्त्वाची गोष्ट म्हणजे उत्तर देताना अजित पवारांनी सुप्रिया सुळेंचा कुठेही उल्लेख केला नाही. 

    follow whatsapp