Akola MNS: मनसेला हादरवणारी बातमी, अमोल मिटकरींची गाडी फोडणाऱ्या मनसे कार्यकर्त्याचा मृत्यू!

मुंबई तक

30 Jul 2024 (अपडेटेड: 30 Jul 2024, 10:03 PM)

आमदार अमोल मिटकरी यांच्या कारवर हल्ला करणारा मनसेचा कार्यकर्ता जय मालोकार याचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे वृत्त समोर आलं आहे.

अमोल मिटकरींच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्याचा मृत्यू!

अमोल मिटकरींच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्याचा मृत्यू!

follow google news

बातम्या हायलाइट

point

अमोल मिटकरींच्या कारची तोडफोड करणाऱ्या मनसैनिकाचा मृत्यू

point

मनसैनिक जय मालोकारचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन

point

मिटकरींसोबत झालेल्या राड्यानंतर जय मालोकारला रुग्णालयात करण्यात आलेले दाखल

Amol Mitkari Car attack and MNS Worker Death: धनंजय साबळे, अकोला: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांच्या कारवर आज (30 जुलै) अकोल्यात मनसे नेत्यांनी जोरदार हल्ला चढवला. यावेळी बराच राडाही झाला. पण आता या घटनेतील सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी आता समोर आली आहे. मिटकरींच्या कारची तोडफोड करणाऱ्यांमधील आरोपी आणि मनसैनिक जय मालोकार याचा काही वेळापूर्वीच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. (akola mns shocking news for mns mns party worker jay malokar who attacked ncp mla amol mitkari car dies of heart attack)

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार, अकोल्याच्या शासकीय विश्रामगृहावर जो राडा मनसैनिकांकडून करण्यात आला त्यामध्ये जय मालोकार हा देखील सहभागी होता. पण याच राड्यानंतर मालोकार याला अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे त्याला अकोल्यातील एका खाजगी रुग्णालयात करण्यात आलं. राड्यात झालेल्या झटापटीनंतर जय मालोकार याच्या छातीत दुखत असल्याने त्याला रुग्णालयात नेण्यात आलं होतं.

हे ही वाचा>> Uddhav Thackeray : मराठ्यांना 'ओबीसी'तून आरक्षण द्यावं का? ठाकरे म्हणाले, "मोदींनी निर्णय..."

मात्र, काही वेळापूर्वीच त्याच्या निधनाचं वृत्त समोर आलं. त्यामुळे अकोल्यातील मनसे पदाधिकाऱ्यांसह सर्वच मनसैनिकांना मोठा धक्का बसला आहे.

मनसैनिकांच्या अटकेसाठी अमोल मिटकरींचं पोलीस ठाण्यात सुरू होतं धरणं आंदोलन

आमदार अमोल मिटकरी यांचे दुपारपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह आंदोलन सुरूच होतं. अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात हे आंदोलन सुरू होतं. जोपर्यंत आरोपी मनसे कार्यकर्त्यांना अटक होत नाही तोपर्यंत तेथून हलणार नसल्याचे मिटकरी यांनी म्हटलं होतं. हल्ला करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांनी पोलिसांना भेटून नंतर पळ काढल्याचा गंभीर आरोप आमदार मिटकरी यांनी केला होता.

हे ही वाचा>> Bacchu Kadu : 'घरी बसून खा अन् घ्या 1500 रुपये', बच्चू कडूंच्या विधानाने महायुतीत नाराजी

अकोल्यातील शासकीय विश्रामगृहात मिटकरी यांच्यावर हल्ला करून त्यांच्या गाडीची तोडफोड करण्याचा प्रयत्न करण्यात आला. राज ठाकरे यांनी अजित पवार यांच्यावर केलेल्या टीकेला मिटकरी यांनी ‘सुपारीबहाद्दर’ म्हणत प्रत्युत्तर दिली होती. त्यांच्या या प्रतिक्रियेमुले संतापलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी आज गोंधळ घातला होता.

नेमकं प्रकरण काय आहे?

अकोला येथील शासकीय विश्रामगृहात महाराष्ट्र नवनिर्माण सेवेच्या कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. पण त्याचवेळी आमदार अमोल  मिटकरी हे देखील काही कामानिमित्त सर्कीट हाऊसमध्येच येणार असल्याची माहिती ही मनसे कार्यकर्त्यांना मिळाली. हे समजताच मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरीच्या कारच्या मागे धावू लागले. यावेळी सुरक्षारक्षक आणि कार्यकर्त्यांनी मिटकरींना सर्किट हाऊसच्या खोलीत नेलं. तर दुसरीकडे मनसे कार्यकर्त्यांनी मिटकरींविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 

राज ठाकरे यांच्या विरोधात मिटकरींनी जे वक्तव्य केलं होतं त्याबाबत त्यांनी माफी मागावी अशी मागणी मनसैनिक करत होते. मात्र मिटकरी आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये समोरासमोर बोलणी न झाल्याने मनसैनिक अचानक आक्रमक झाले आणि त्यांनी बाहेर उभ्या असलेल्या मिटकरींच्या कारवर हल्ला चढवला. ज्यामध्ये गाडीच्या काचा फोडल्या आणि कारचं बरंच नुकसान केलं.

पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच पुण्याचा दौरा करत पूरस्थितीचा आढावा घेतला होता. ज्यावरून राज ठाकरेंनी त्यांच्यावर बोचरी टीका केली होती. ज्या टीकेला आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर देत राज ठाकरेंना 'सुपारीबाज' असं म्हटलं होतं. ज्यामुळे मनसेचे कार्यकर्ते संतापले होते. त्यातच ते आज अकोल्यात मनसैनिकांसमोर आल्याने त्यांच्या गाडीची तुफान तोडफोड करण्यात आली.

दरम्यान, कारची तुफान तोडफोड केलेल्या मनसैनिकांनी घटनास्थळी पोलीस येत असल्याचं पाहून तात्काळ तेथून पळ काढला. या घटनेनंतर अमोल मिटकरी यांनी पुन्हा एकदा मनसेला इशारा देत असं म्हटलं होतं की, 'ते जर माझ्या नेत्याच्या विरोधात बोलत असतील तर मी त्यांना त्याच पद्धतीने प्रत्युत्तर दिलं तर त्यात माझा काय दोष आहे?'
 

    follow whatsapp