वारकऱ्यांवरील लाठीचार्जवर देवेंद्र फडणवीस स्पष्टच म्हणाले, ‘मविआच्या काळात…’

मुंबई तक

• 04:53 PM • 11 Jun 2023

आळंदीत कोणताही लाठीचार्ज झालेला नाही. वारकऱ्यांची सुरक्षा आमच्यासाठी सर्वात महत्वाची आहे. अशाही स्थितीत विरोधकांना राजकारण करायचे असेल तर त्यांच्या बुद्धीची कीव करावी लागेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

maharashtra political crises supreme court decision devendra fadnavis

maharashtra political crises supreme court decision devendra fadnavis

follow google news

Latest Marathi News : आळंदीत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळा सुरु असताना पोलिसांनी काही वारकऱ्यांवर लाठीचार्ज (lathi charge) केल्याची घटना घडली होती. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओचा दाखला देऊन विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली होती. आता या टीकेवर उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यु्त्तर दिले आहे. आळंदीत कोणताही लाठीचार्ज झालेला नाही. वारकऱ्यांची सुरक्षा आमच्यासाठी सर्वात महत्वाची आहे. अशाही स्थितीत विरोधकांना राजकारण करायचे असेल तर त्यांच्या बुद्धीची कीव करावी लागेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. (alandi warkari lathi charge video devendra fadnavis reply opposition leader)

हे वाचलं का?

महाविकास आघाडी सरकारच्या काळात गेल्यावर्षी चेंगराचेंगरी होऊन काही महिला जखमी झाल्या होत्या. तशी स्थिती निर्माण होऊ नये म्हणून यावर्षी प्रधान जिल्हा न्यायाधीश, धर्मादाय आयुक्त, मंदिर प्रमुख विश्वस्त ढगे पाटील आणि सर्व मानाच्या दिंडीचे प्रमुख यांची एक बैठक झाली. या बैठकीत सर्वानुमते निर्णय घेण्यात आला की, प्रत्येक मानाच्या दिंडीला 75 पासेस देण्यात यावेत. त्यानुसार संपूर्ण नियोजन करण्यात आले होते,अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली.

हे ही वाचा : वारकऱ्यांवर ‘लाठीचार्ज’! जयंत पाटील, राऊतांचा संताप, सुप्रिया सुळेंनीही सुनावलं

काही स्थानिक तरुणांनी मध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे थोडी झटापट झाली. आता परिस्थिती संपूर्णपणे शांत असून पोलिस स्थानिकांशी चर्चा करीत आहेत. आम्ही सुद्धा गांभीर्याने याची दखल घेतली आहे, असे देखील फडणवीस यांनी स्पष्ट केले. तसेच काही माध्यमांनी याचे वृत्तांकन करताना फार मोठा लाठीमार अशा बातम्या दिल्या, माझी माध्यमांना विनंती आहे की जे झाले नाही, त्यातून जनतेत क्षोभ निर्माण होईल, असे काही करू नका, असे आवाहन त्यांनी माध्यमांना केले.

महाविकास आघाडीच्या काळात चेंगराचेंगरी झाली, त्या घटनेचे आम्ही राजकारण केले नाही. अशाही स्थितीत त्यांना राजकारण करायचे असेल तर त्यांच्या बुद्धीची कीव करावी लागेल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. तसेच आळंदी येथे कोणताही लाठीचार्ज झालेला नाही, त्यामुळे न घडलेल्या घटनेचे राजकारण करू नका, असे आवाहन देखील फडणवीस यांनी राजकीय नेत्यांना केले.

आळंदीत लाठीमार झालेला नाही- पोलीस आयुक्त

सर्व मानाच्या दिंडी प्रत्येकी 75 जणांनाच पाठवित होते. मात्र आज अचानक काही स्थानिक युवकांनी मध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. मंदिर विश्वस्त आणि चोपदार सुद्धा त्यांना समजावण्यासाठी आले. पण ते युवक ऐकत नव्हते. बॅरिकेट तोडून त्यांनी आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्या स्थानिकांशी केवळ किरकोळ झटापट झाली, पोलिसांनी लाठीचार्ज किंवा बळाचा वापर केलेला नाही. त्यामुळे लाठीचार्ज केला, हे म्हणणे खोटे आहे. सर्व वारकरी, प्रशासनाला उत्तम सहकार्य करीत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची उच्च परंपरा असलेल्या वारीला उगाच गालबोट लावण्याचा प्रयत्न कुणी करू नये, ही माझी नम्र विनंती आहे, असे पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सांगितले.

    follow whatsapp