वज्रमूठ सभा एन्जॉय करण्यासाठी अमित शाह मुंबईत : संजय राऊंत

मुंबई तक

15 Apr 2023 (अपडेटेड: 15 Apr 2023, 05:01 PM)

Sanjay raut on Amit Shah : महाविकास आघाडीच्या सभेवर लक्ष ठेवण्यासाठी आणि सभा एन्जॉय करण्यासाठी ते (अमित शाह) मुंबईत आल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत. संजय राऊत पत्रकारांशी बोलत होते.

amit shah in mumbai to enjoy vajramooth meeting sanjay raut criticize

amit shah in mumbai to enjoy vajramooth meeting sanjay raut criticize

follow google news

Sanjay raut on Amit Shah :केंद्रीय मंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याची खिल्ली आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उडवली आहे.महाविकास आघाडीच्या सभेवर लक्ष ठेवण्यासाठी आणि सभा एन्जॉय करण्यासाठी ते (अमित शाह) मुंबईत आल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत. संजय राऊत पत्रकारांशी बोलत होते. (amit shah in mumbai to enjoy vajramooth meeting sanjay raut criticize)

हे वाचलं का?

अमित शाह देशाचे गृहमंत्री आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही जाऊ शकतात.मी सकाळीच सांगितल की नागपूरात महाविकास आघाडीची इतकी मोठी सभा होतेय,,त्या सभेवर लक्ष ठेवण्यासाठी आणि सभा एन्जॉय करण्यासाठी (अमित शाह) मुंबईत आले असतील. मुंबईतून सभा पाहावी,असाही टोला राऊत यांनी लगावला आहे.

हे ही वाचा : मेट्रो कारशेडमध्ये घोटाळा…आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

संपूर्ण कॉग्रेस जरी सुनील केदार यांच्या नेतृत्वाखाली किंवा नाना पटोलेंच्या नेतृत्वाखाली असली तरी आम्ही त्याच्यात पुर्ण सहभाग घेऊ असे देखील संजय राऊत म्हणाले आहेत.अख्ख्या विदर्भात या सभेचे वातावरण तयार झालंय. नागपूरच्या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राच लक्ष लागले आहे. इतकं भव्य व्यासपीठ आहे की भव्य सभा होईल.तसेच वरून पाहिल्यास शिवाजी पार्कात उभे असल्याचा अनुभव येतो. या सभेला उद्धव ठाकरे सायंकाळी 5 दरम्यान सभेस्थळी दाखल होणार आहेत.आदित्य ठाकरे सुद्धा उपस्थित राहतील, अशी माहिती राऊत यांनी दिली.

महाविकास आघाडीची दुसरी वज्रमुठ सभा उद्या रविवारी 16 एप्रिलला नागपूर शहरात पार पडणार आहे. नागपूर शहरातील दर्शन कॉलनीतील सद्भावनानगर इथल्या मैदानावर ही सभा होणार आहे. या सभेला पोलिसांनी ही परवानगी दिली. या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा : जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यावर भयानक हल्ला, भाषणापूर्वी फेकला बॉम्ब!

दरम्यान आज आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केले. कांजूर मार्गच्या 44 हेक्टर जमीनीवरील 15 हेक्टर जागा मेट्रो लाईन 6 साठी एमएमआरडीएला हस्तांतरीत करण्यात आली. त्यामुळे यातील उर्वरीत जागा बिल्डरांच्या घशात घालायला ठेवलीय का असा सवाल (UBT)माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला. तसेच हा सरासर मोठा घोटाळा आहे, त्यामुळे घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी यावर उत्तर द्यावे, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे. यावर आता मुख्यमंत्री काय उत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

    follow whatsapp