Exclusive: ‘समोर भीष्माचार्य असले तरी बाण…’, बंडानंतर मिटकरी आता शरद पवारांना भिडणार!

साहिल जोशी

12 Jul 2023 (अपडेटेड: 12 Jul 2023, 02:48 PM)

अजित पवारांवर कोणी टीका केली तर त्या मोठ्या नेत्यावर मी पण तशाच प्रकारची टीका करेल असं विधान अमोल मिटकरी यांनी मुंबई Tak च्या मुलाखतीत हे विधान केलं आहे.

amol mitkari statement in interview mumbai tak ajit pawar great leader criticize sharad pawar ncp

amol mitkari statement in interview mumbai tak ajit pawar great leader criticize sharad pawar ncp

follow google news

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडल्यानंतर झालेल्या एका सभेत अजित पवार (Ajit Pawar) यांनी थेट शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधला होता. शरद पवारांनी अनेकदा शेवटच्या क्षणी शब्द फिरवले होते असा आरोपही अजित पवारांनी केलेला. तसंच त्यांनी शरद पवारांना निवृत्तीचा सल्ला देखील दिला होता. अशावेळी आता अजित पवारांच्या पाठिशी असलेले विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) हे देखील आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्याही बड्या नेत्याची भीड ठेवणार नसल्याचं जाहीरपणे म्हणत आहेत. मुंबई Tak ला (Mumbai Tak) दिलेल्या Exclusive मुलाखतीत त्यांनी अनेक खळबळजनक विधानं केली आहेत. (amol mitkari statement in interview mumbai tak ajit pawar great leader criticize sharad pawar ncp maharashtra politics update today)

हे वाचलं का?

‘जो कोणी पक्षातील.. राष्ट्रवादी काँग्रेसमधील किती मोठा नेता असेल मग तो.. जो अजितदादांच्या विरुद्ध बोलेल त्याला त्याच तोडीस मी उत्तर देणार.. कोणीही असो तो.. ही माझी अजितदादांप्रती असलेली निष्ठा आहे. मग समोर द्रोणाचार्य असो किंवा भीष्माचार्य असो मी बाण काढणारच.’ असं म्हणत अमोल मिटकरी यांनी आता थेट शरद पवारांनाच चँलेज दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

पाहा मुंबई Tak एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत अमोल मिटकरी नेमकं काय म्हणाले?

‘अजितदादा जर सोबती असला तर तो कृष्णासारखा सखा आहे.. अर्जुनासारखी संभ्रमावस्था असेल.. की, समोर द्रोणाचार्य, कृपाचार्य आणि भीष्माचार्य समोर आहेत तर काय करावं.. तर कृष्ण सांगतो की, तुझा क्षात्रधर्म आहे. बाण काढ आणि चालव… तीच भूमिका अमोल मिटकरीची इथून पुढे तुम्हाला सभागृहात, सभागृहाच्या बाहेर असेल.’

‘आता तर मला सर्वात मोठं संकट हे आहे की, मी.. लोकांसमोर काय सांगू.. मला एक प्रश्न विचारला मागे पत्रकारांनी की, तुम्ही मोदींविरोधात, भाजपविरोधात बोलत होतात.. आता तुम्ही लोकांना काय सांगणार? आहेच ना माझ्यासमोर संभ्रम… पण मी त्या-त्या वेळेस ते-ते सांगणार..’

हे ही वाचा >> Sharad Pawar : पुनरावृत्ती होणार!, दादांचा पुतण्या पवार कुटुंबाला एकत्र आणणार?

‘मला जे-जे सांगायचं आहे ते-ते ठासून सांगणार.. अमोल मिटकरी भूमिका बदलणारा माणूस नाही.. आरआरएसची विचारधारा मरेपर्यंत स्वीकारणारा माणूस नाही.. जिथे जो विरोध आहे तो कायम राहणार. पण ज्या नेत्याने मोठं केलं, माझ्या दोन लेकरांचं शिक्षणाचं वैभव उभं केलं.. आणि आज माझ्यासारख्या सर्वसामान्य.. ज्याच्या वडिलांनी रोजगार हमी योजनेची कामं केली.. बाबांचं नाव घेतलं की, माझ्या डोळ्यात पाणी येतं.. त्यांच्या एका साधारण मुलाला दादांनी आमदार केलं. हे बऱ्याच लोकांच्या पोटात अजूनही खुपतंय.’

‘आज 3 वर्ष पूर्ण झाली आमदार होऊन.. मला जन्म माझ्या वडिलांनी दिला पण मला राजकीय जन्म मला अजितदादांनी दिलं.. एवढंच सांगतो की, मातीच्या गोळ्याला आकार अजितदादांनी दिला. मी चुकलो सुद्धा सर.. माझ्या या तीन वर्षाच्या आयुष्यात मी चुकलो पण.. मी म्हटलं देखील की, दादा माझ्याकडून ही चूक व्हायला नको होती. माझ्यावर अनेक आरोप.. भ्रष्टाचाराचे वैगरे.. माझ्या पक्षातील लोकांनीच आरोप केले की, वर्षभरातच दीड कोटीचं घर बांधलं.. मी अजितदादांकडे रेंट अॅग्रीमेंट घेऊन गेलो. म्हटलं माझी तेवढी ऐपतच नाही..’

हे ही वाचा >> एकनाथ शिंदेंचे खास, पण अजितदादांच्या एंट्रीनं होणार गेम, गादी जाणार?

‘महाराष्ट्रात एकमेव नेता आहे की, जो सर्वांना न्याय देऊ शकतो.. म्हणून दादांनी घेतलेल्या निर्णयाचं मी स्वागत करुन मी त्यांच्यासोबतच आहे.’ असं म्हणत अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांच्यासोबत राहणार असून त्यांच्याविरोधात जो कोणी काही बोलेल त्याला सुनावणार असल्याचंही स्पष्टपणे सांगितलं आहे.

    follow whatsapp