बीड: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याची आणखी एक वादग्रस्त ऑडिओ क्लिप ही आता व्हायरल झाली आहे. ज्यामध्ये तो एकदा आरोपीला सोडून देण्याविषयी महिला PSI ला सांगत असल्याचं ऐकायला मिळतंय. ज्यामुळे आता पुन्हा एकदा वाल्मिक कराड हा चर्चेत आला आहे. (another audio clip with Valmik Karad's female PSI goes viral)
ADVERTISEMENT
एका तरूणाने सोशल मीडियावर काही वादग्रस्त पोस्ट शेअर केली होती. ज्याप्रकरणी सायबर पोलिसांनी त्याविरोधात कारवाई सुरू केलेली. मात्र, ती मुलं सिन्नरला राहणारी आहेत. त्यांच्यावर कारवाई करू नका अशी भलामण करण्यासाठी वाल्मिक कराड याने सायबर सेलच्या महिला PSI अधिकाऱ्याला थेट फोन केला होता. ज्याची ऑडिओ क्लिप ही व्हायरल झाली आहे.
हे ही वाचा>> Ajit Pawar: 'सुरेश धसला काय वाटतंय याच्याशी मला काही घेणं-देणं नाही', अजितदादा चिडले
महिला अधिकाऱ्याशी बोलणं झाल्यावर वाल्मिक कराड हा तरुणाला मुजोरपणे म्हणाला की, 'इथे बाप बसलेले आहेत आपण..'
व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय म्हटलं...
वाल्मिक कराड: ताई वाल्मिक कराड बोलतोय..
महिला पोलीस अधिकारी: बोला ना अण्णा..
वाल्मिक कराड: ताई काय ते.. सिन्नरला आहेत ती पोरं.. ते काय करणार आहेत तिकडे. लक्ष द्या जरा तिकडे..
महिला पोलीस अधिकारी: नाही नाही.. पोस्ट डिलीट केली तरी बस झालं ना अण्णा.. दुसरं काय पाहिजे.
वाल्मिक कराड: ठीकए.. भैय्या पोस्ट डिलीट करून टाक हा.
हे ही वाचा>> Dhananjay Munde : "देवेनभाऊ आणि अजितदादांनीच उत्तर द्यावं...", दमानियांच्या आरोपानंतर काय म्हणाले मुंडे?
महिला पोलीस अधिकारी: काय होतं माहितीए का.. वातावरण खराब होतं. सगळ्यांनाच आमचे फोन चालू आहेत.
वाल्मिक कराड: ताई.. पूर्वी त्यांनीच सुरुवात केली ना.. आम्ही शांतच होतो ना.. कुणीविषयी आरे ला कारे..
महिला पोलीस अधिकारी: नाही एक-दोन दिवस अजून सुरू राहतंय. बाकीच्यांचं फोनवर सुरू राहील
वाल्मिक कराड: ठीकए..
वाल्मिक कराड: हॅलो.. इग्नोर करायचं भैय्या एवढं काय मनावर घ्यायचं नाही, इथे बाप बसलेले आहेत आपण.. काय घाबरायलाय..
पोलीस कारवाई सुरू असलेला तरुण: तुम्ही आहेत म्हणूनच दम धरलाय आम्ही...
दरम्यान, या सगळ्या प्रकरणाबाबत वाल्मिक कराडविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता सातत्याने केली जात आहे. आता या प्रकरणी सरकार नेमकी काय कारवाई हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT
