महाराष्ट्रात राजकारण पेटलं, 12 श्री सदस्यांच्या मृत्यूवर अखेर आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी सोडलं मौन

मुंबई तक

17 Apr 2023 (अपडेटेड: 17 Apr 2023, 01:29 PM)

Appasaheb Dharmadhikari first Reaction on Maharashtra Bhushan incident :महाराष्ट्र भूषण (Maharashtra Bhushan) पुरस्काराच्या कार्यक्रमात उपस्थित राहिलेल्या 12 जणांचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडलीय. या घटनेनंतर राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावर आता आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी मौन सोडलं आहे.

Appasaheb Dharmadhikari first Reaction on Maharashtra Bhushan incident

Appasaheb Dharmadhikari first Reaction on Maharashtra Bhushan incident

follow google news

Appasaheb Dharmadhikari first Reaction on Maharashtra Bhushan incident : नवी मुंबईच्या खारघरमध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र भूषण (Maharashtra Bhushan) पुरस्काराच्या कार्यक्रमात उपस्थित राहिलेल्या 12 श्री सदस्यांचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली होती. या घटनेनंतर राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावर आता ज्येष्ठ निरुपणकार डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांनी मौन सोडलं आहे. (appasaheb dharmadhikari first reaction on maharashtra bhushan incident)

हे वाचलं का?

हे ही वाचा  :आप्पासाहेबांच्या बंगल्याबाहेरची रांगोळी पुसली, रोषणाई उतरवली.. रेवदंड्यात काय स्थिती?

आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे घटनेवर निवेदन सादर

ज्येष्ठ निरुपणकार डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांनी या घटनेवर एक निवदेन सादर केले आहे. या निवेदनात आप्पासाहेब धर्माधिकारी म्हणतायत की, महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी खारघर येथे आलेले सारे श्री सदस्य माझ्या कुटुंबातले सदस्य आहेत. श्री सदस्यांचा हा परिवार देशविदेशात पसरला आहे.या पुरस्कार सोहळ्यावेळी उष्माघाताने काही श्री सदस्यांना त्रास झालाा आणि त्यातील काहींचा दुदैवाने मृत्यू झाला. ही घटना माझ्यासाठी अत्यंत क्लेषदायक आहे. माझ्या कुटुंबातीलच सदस्यांवर कोसळलेली ही आपत्ती आहे. आपल्याच कुटूंबातील लोकांवर घाला येण्याच्या या घटनेने मी व्यथित झालो असल्याते ते म्हणतायत.

माझे हे दु:ख शब्दात व्यक्त करण्यापलिकडचे आहे.मृत्यु झालेल्या या सदस्यांच्या कुटूंबियांची आणि माझी वेदना सारखीच असल्याचीही भावना आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांनी यावेळी व्यक्त केली.

हे ही वाचा  : 12 श्री सदस्यांच्या मृत्यूप्रकरणात राज ठाकरेंनी शिंदे सरकारला दिली क्लीन चीट, Tweet मध्ये काय?

श्री सदस्य परिवाराची एकमेकांच्या सोबत राहण्याची पिढ्यानपिढ्यांची परंपरा आहे त्यानुसार आम्ही सारेजण या आपदग्रस्तांसोबत कायम आहोत. यातील मृतांना सद्नतीत लाभो,तसेच त्यांच्या कुटूंबाला हा आघात सहन करण्याची शक्ती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना,असे देखील आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) पत्रात म्हणाले आहेत.तसेच झालेला हा प्रकार हा दुदैवीच होता.या घटनेचे कोणत्याही पद्धतीने राजकारण होऊ नये अशी अपेक्षा शेवटी त्यांनी व्यक्त केली आहे.

मृत पावलेल्या व्यक्तींची नावे

खारघर येथील सोहळ्यात उपस्थित राहिलेल्या आणि उष्माघातामुळे मृत पावलेल्यांपैकी 8 महिला असून, 3 पुरुष आहेत. एकूण 11 मृतदेह पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालय पनवेल नेण्यात आले होते. त्यांची नावे खालील प्रमाणे आहेत.

1) महेश नारायण गायकर (वय 42, गाव- वडाळा, मुंबई, मूळ गाव – म्हसळा मेहंदडी)
2) जयश्री जगन्नाथ पाटील (वय 54, गाव – म्हसळा, रायगड)
3) मंजुषा कृष्णा भोंबंडे (वय 51, गाव – गिरगाव मुंबई मुळगाव श्रीवर्धन)
4) स्वप्निल सदाशिव केणी (वय 30, गाव – शिरसाटबामन पाडा विरार)
5) तुळशीराम भाऊ वांगड (वय 58, गाव -जव्हार पालघर)
6) कलावती सिद्राम वायचळ (वय 45, गाव – तोडकर आळी सोलापूर)
7) सविता संजय पवार (गाव – मंगळवेढा सोलापूर)
8) भीमा कृष्णा साळवे (वय 58, गाव – कळवा ठाणे)
9) पुष्पा मदन गायकर (वय 64 वर्ष गाव – कळवा ठाणे
10) वंदना जगन्नाथ पाटील (वय 62 वर्ष गाव- करंजाडे
 11) अनोळखी महिला (वय 50 ते 55 वर्ष)

दरम्यान एकूण 11 मृतदेहांपैकी 10 मृतदेह वारसाच्या ताब्यात देण्यात आले आहेत. तर एक मृतदेह बेवारस असून महिलेचा आहे वारसाचा शोध चालू आहे.

 

    follow whatsapp