Vidhan Parishad Election : "जयंत पाटलांचा उबाठाने ठरवून पराभव केला", शेलारांची 'पोस्ट'

मुंबई तक

• 01:58 PM • 13 Jul 2024

Maharashtra MLC Election 2024 : विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे सगळे उमेदवार विजयी झाले. तर शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील पराभूत झाले. 

जयंत पाटील यांच्या पराभवासाठी आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना जबाबदार धरले आहे.

विधान परिषद निवडणुकीत जयंत पाटलांचा पराभव, शेलारांची ठाकरेंवर टीका.

follow google news

बातम्या हायलाइट

point

शेकापचे जयंत पाटील यांचा विधान परिषद निवडणुकीत पराभव

point

आशिष शेलार यांची उद्धव ठाकरेंवर टीका

point

ठाकरेंच्या शिवसेनेला म्हणाले अजगर

Vidhan Parishad Election 2024 : विधान परिषद निवडणुकीचे निकाल महाविकास आघाडीला धक्का देणारे ठरले. 12 वा उमेदवार म्हणून रिंगणात उतरलेले ठाकरेंच्या शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर विजयी झाले. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिलेले जयंत पाटील पराभूत झाले. या निकालानंतर भाजपचे नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना या पराभवासाठी जबाबदार धरलं. (BJP Leader Ashish Shelar held Uddhav Thackeray responsible for Jayant Patil's defeat in the Maharashtra Legislative Council elections 2024)

हे वाचलं का?

महायुतीचे 9 आणि महाविकास आघाडीचे 3 उमेदवार विधान परिषद निवडणूक लढवत होते. यात महायुतीने मतांचे गणित जुळवून आणत महाविकास आघाडीला धक्का दिला. महत्त्वाचे म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप महाविकास आघाडीची मते फोडण्यात यशस्वी झाले. 

जयंत पाटलांचा पराभव, आशिष शेलार ठाकरेंबद्दल काय बोलले?

आशिष शेलार यांनी एक फोटो पोस्ट केला आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना अजगराच्या रुपात दाखवली आहे. तर शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्ष, शिक्षक भारती असे छोटे पक्ष संघटना अजगरच्या मिठीत दाखवल्या आहेत. हा फोटोबरोबर शेलारांनी ठाकरेंना लक्ष्य केले आहे. 

शेलारांनी म्हटले आहे की, "विधान परिषद निवडणूकीत भाजपाचे पाचही उमेदवार विजयी! सर्व विजेत्या उमेदवारांचे अभिनंदन !!"

हेही वाचा >> "जे आमदार फुटले त्यांची नावे...", जितेंद्र आव्हाडांच्या पोस्टने खळबळ

पुढे शेलार म्हणतात, "महाराष्ट्र पाहतोय... लोकसभा निवडणुकीत उबाठाने स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टींना मदत केली नाही. मुंबई शिक्षक मतदार संघात महाआघाडीचे घटक पक्ष असलेल्या शिक्षक भारतीचे नेते कपिल पाटील यांच्या उमेदवाराचा उबाठाने पराभव केला. (गंमत म्हणजे कपिल पाटीलांच्या समाजवादी गणराज्य पक्षाची स्थापनाच श्रीमान उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत झाली होती.)"

हेही वाचा >> Majhi ladki bahin yojana New Rules : रेशन कार्डवर नाव नाही, मग असा भरा अर्ज!

"तर आता विधान परिषद निवडणुकीत ही आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शेकापचे उमेदवार शेतकरी नेते जयंत पाटील यांचा उबाठाने ठरवून पराभव केला. सोबत असलेल्या छोट्या पक्षांना संपवण्याचे काम कोण करतोय...? महाराष्ट्र पाहतोय!! छोट्या पक्षांनो तुम्ही अजगराच्या विळख्यात सापडला आहात !", अशी टीका शेलारांनी केली आहे.

 

विधान परिषद निवडणुकीत 2022 ची पुनरावृत्ती 

2022 मध्ये झालेल्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्याच भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांच्यात लढत झाली होती. यात भाई जगताप जिंकले होते. यावेळीही महाविकास आघाडीतील मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटील यांच्यात लढत झाली.

हेही वाचा >> Opinion Poll : महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येणार? भाजपची झोप उडवणारा सर्व्हे 

विधान परिषद निवडणुकीतील विजयी उमेदवार

भाजप - पंकजा मुंडे, परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे, सदाभाऊ खोत.

शिवसेना - भावना गवळी, कृपाल तुमाने. राष्ट्रवादी काँग्रेस - राजेश विटेकर, शिवाजीराव गर्जे.

प्रज्ञा सातव (काँग्रेस), मिलिंद नार्वेकर (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे).

    follow whatsapp