Congress Working Committee Member list : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेसकडून केंद्रीय कार्य समिती जाहीर करण्यात आली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी CWC च्या (congress working committee) नव्या टीमची घोषणा केली. खरगे यांनी आपल्या विरोधात काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणारे शशी थरूर आणि राजस्थान काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांचाही समितीत समावेश केला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना काँग्रेस कमिटीत स्थान देण्यात आले आहे. महाराष्ट्रातील 8 नेत्यांचा वेगळ्या गटात समावेश करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
काँग्रेस कार्य समिती आज (20 ऑगस्ट) जाहीर करण्यात आली. यात मल्लिकार्जून खरगे यांच्यानंतर सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांचे नाव आहे. त्यानंतर राहुल गांधी, अधीर रंजन चौधरी, एके अँटनी, अंबिका सोनी, मीरा कुमार आणि दिग्विजय सिंह यांच्या नावाचाही समावेश आहे.
वाचा >> ‘नितीन गडकरींच्या खात्याचे घोटाळे PM मोदींनीच…’, ठाकरेंच्या खासदाराचं खळबळजनक वक्तव्य
काँग्रेसकडून समितीत अनेक तरुण चेहऱ्यांना स्थान देण्यात आले आहे. राहुल गांधी तसेच सचिन पायलट, चरणजित सिंग चन्नी, कुमारी सेलजा, दीपेंद्र सिंग हुडा, गौरव गोगोई आणि रणदीप सिंग सुरजेवाला यांच्यासह अनेक नावे आहेत.
याशिवाय यूपीए सरकारमधील केंद्रीय मंत्री एके अँटनी यांनाही खर्गे यांच्या CWC टीममध्ये स्थान देण्यात आले आहे. अलीकडेच त्यांचा मुलगा अनिल अँटोनी भाजपमध्ये दाखल झाले, त्यांना भाजपने आपल्या राष्ट्रीय समितीत स्थान दिलेले आहे.
अशोक चव्हाण काँग्रेसच्या वर्किंग कमिटीत
काँग्रेसच्या कार्य समितीत मुकुल वासनिक यांच्याबरोबरच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना स्थान देण्यात आले आहे. चंद्रकांत हंडोरे यांचा कायम आमंत्रित सदस्यांच्या यादीत समावेश केला गेला आहे. दुसरीकडे माणिकराव ठाकरे, रजनी पाटील यांचा प्रभारी म्हणून यादीत समावेश केला गेला आहे. यशोमती ठाकूर, अविनाश पांडे, प्रणिती शिंदे यांनाही राष्ट्रीय स्तरावरील समितीत विशेष निमंत्रित सदस्य म्हणून स्थान दिलं गेलं आहे.
अशी आहे नवी काँग्रेस कार्य समिती
1) मल्लिकार्जुन खरगे
२) सोनिया गांधी
3) डॉ.मनमोहन सिंग
4) राहुल गांधी
५) अधीर रंजन चौधरी
6) ए के अँटनी
7) अंबिका सोनी
8) मीरा कुमार
9) दिग्विजय सिंह
10) पी चिदंबरम
11) तारिक अन्वर
12) ललथनहवला
13) मुकुल वासनिक
14) आनंद शर्मा
15) अशोक चव्हाण
16) अजय माकन
17) चरणजित सिंग चन्नी
18) प्रियांका गांधी वाड्रा
19) कुमारी सेलजा
20) गायखंगम गंगमाई
21) एन रघुवीरा रेड्डी
22) शशी थरूर
23) ताम्रध्वज साहू
24) अभिषेक मनु सिंघवी
25) सलमान खुर्शीद
26) जयराम रमेश
27) जितेंद्र सिंग
28) रणदीप सिंग सुरजेवाला
29) सचिन पायलट
30) दीपक बाबरिया
31) जगदीश ठाकोर
32) जीए मीर
33) अविनाश पांडे
34) दीपा दास मुन्शी
35) महेंद्रजितसिंग मालवीय
36) गौरव गोगोई
37) सय्यद नसीर हुसेन
38) कमलेश्वर पटेल
39) केसी वेणुगोपाल
वाचा >> NCP वर दावा केल्यानंतरही शरद पवार जिंकलेले निवडणूक आयोगातली लढाई!
कायम आमंत्रित सदस्य
१) वीरप्पा मोईली
२) हरीश रावत
३) पवनकुमार बन्सल
4) मोहन प्रकाश
5) रमेश चेन्निथला
6) बी के हरिप्रसाद
7) प्रतिभा सिंह
8) मनीष तिवारी
9) तारिक हमीद कारा
10) दीपेंद्रसिंग हुड्डा
11) गिरीश राय चोडणकर
12) टी सुब्रमी रेड्डी
13) के राजू
14) चंद्रकांत हंडोरे
15) मीनाक्षी नटराजन
16) फुलो देवी नेताम्
17) दामोदरराज नरसिंह
18) सुदीप रॉय बर्मन
प्रभारी
19) डॉ. ए. चेलाकुमार
20) भक्त चरण दास
21) डॉ.अजोय कुमार
22) हरीश चौधरी
23) राजीव शुक्ला
24) मणिकम टागोर
25) सुखविंदर रंधवा
26) रजनी पाटील
27) कन्हैया कुमार
28) गुरदीप सप्पल
29) देवेंद्र यादव
30) मनीष चतरथ
31) माणिकराव ठाकरे
खास निमंत्रित
1) पल्लम राजू
2) पवनखेडा
3) गणेश गोडियाल
4) कोडिकुनिल सुरेश
५) यशोमती ठाकूर
6) सुप्रिया श्रीनेट
7) प्रणिती शिंदे
8) अलका लांबा
9) वामशीचंद रेड्डी
10) श्रीनिवास BV (IYC अध्यक्ष)
11) नीरज कुंदन (NSUI अध्यक्ष)
12) नेट्टा डिसोझा (महिला काँग्रेस अध्यक्ष)
13) लालजी देसाई (सेवा दल मुख्य संघटक)
ADVERTISEMENT