Baba Siddique Murder Case Update : बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणात आता एकामागून एक आरोपी अटकेत येत असल्या कारणाने या हत्येचा हळूहळु उलगडा होत चालला आहे. आतापर्यंत या प्रकरणात तीन आरोपींना अटक झाली आहे, तर तीन जण अद्याप फरार आहेत. त्यामुळे अटकेत असलेल्या आरोपींच्या चौकशीत अनेक गोष्टींचा उलगडा होत चालला आहे. त्यामुळे या घटनेची प्लानिंग नेमकी कशी करण्यात आली होती? या हत्येचा कट कसा रचण्यात आला होता? हे जाणून घेऊयात. (baba siddique case update patiala jail lawrence bishnoi connection full story of murder case read full crime story )
ADVERTISEMENT
इंडिया टुडेला सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा कट हा पटियाला जेलमध्ये रचण्यात आला होता. या हत्येचा कट रचण्यात मोहम्मद झिशान अख्तरचे नाव समोर येत आहे. आणि हाच झिशान या हत्येचा मास्टरमाईंड असल्याची माहिती आहे.
घटनास्थळी बाबा सिद्दीकी यांच्यावर गुरुमेल सिंह, धर्मराज कश्यप आणि शिवकुमार यांनी गोळीबार केला होता. यापैकी धर्मराज आणि गुरमेल यांना घटनास्थळावरून अटक करण्यात आली आहे, तर झिशान, शुभम लोणकर आणि शिवकुमार फरार आहेत. त्यानंतर प्रवीण लोणकरलाही पोलिसांनी अटक केली होती. प्रवीण आणि शुभम हे भाऊ असल्याची माहिती आहे.
तुरूंगात केली हत्येची प्लानिंग
21 वर्षीय झिशान अख्तरला जालंधर पोलिसांनी 2022 मध्ये खून आणि दरोड्याच्या आरोपाखाली अटक केली होती. सुत्रानुसार, तो पटियाला तुरुंगात बंद होता. या तुरूंगातच तो लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या संपर्कात आला होता. आणि इथेच त्याला बाबा सिद्दीकींच्या हत्येची सूपारी देण्यात आली होती. त्यानंतर यावर्षी 7 जूनला तुरुंगातून सुटल्यानंतर झिशानने हरियाणातील कैथलमध्ये जाऊम गुरमेल सिंग यांची भेट घेतली होती.
हे ही वाचा : Baba Siddique Murder : सिद्दीकी हत्याकांडात मोठी अपडेट! शूटरच्या टार्गेटवर होते आमदार झिशानही...
हत्याकांडात झिशानचा काय रोल?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झिशाननेच गुरमेल, धर्मराज कश्यप आणि शिवकुमार यांना सिद्दिकीच्या हत्येचा कट रचण्यास सांगितले होते. या शार्प शुटर्सना मुंबईत भाड्याने खोली देण्यापासुन त्यांची इतर व्यवस्था करण्यात झिशानचा हात होता. तसेच हल्लेखोर चार आठवड्यांपासून सिद्दीकी यांच्या घराची आणि मुलाच्या कार्यालयाची रेकी करत होते. यासाठी हल्लेखोर 40 दिवस मुंबईत राहिले होते. इतकंच नाही तर बाबा सिद्दीकी यांचे लोकेशन देखील झिशानच हल्लेखोरांना देत होता. त्यानुसार त्यांनी लोकेशनवर पोहोचून हे हत्याकांड घडवून आणले होते.
शूटर पुण्यात काय करत होते?
बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अटकेत असलेले शिवकुमार आणि धर्मराज कश्यप हे पुण्यात भंगार विक्रेते म्हणून काम करायचे, तर तिसरा आरोपी प्रवीण लोणकर हा डेअरीत काम करायचा. शिवकुमार आणि धर्मराज हे दोघेही उत्तर प्रदेशचे रहिवासी असून दोघांनाही प्रवीण आणि त्याचा भाऊ शुभम लोणकर यांनी सिद्दिकीच्या हत्येसाठी कामावर ठेवले होते.
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर एका दिवसानंतर शुभम लोणकरच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लॉरेन्स बिश्नोई टोळीने या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती. याप्रकरणी गुरमेल सिंग, प्रवीण लोकर आणि धर्मराज कश्यप यांना अटक करण्यात आली आहे, तर शिवकुमार, मोहम्मद जीशान अख्तर आणि शुभम लोणकर हे तिघे अद्याप फरार आहेत.
हे ही वाचा : धमकी, रेकी, फायरिंग आणि मित्राची हत्या...लॉरेन बिश्नोईने सलमान खानला कसं केलं भयभीत? वाचा Inside Story
21 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी
सिद्दीकी हत्याकांडात धर्मराज कश्यप आणि गुरमेल सिंह यांना अटक केल्यानंतर त्यांना सुट्टीकालीन न्यायालयात रविवारी हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने गुरमेल सिंहला 21 तारखेपर्यंत कोठडी सुनावली होती. तर धर्मराज कश्यप हा अल्पवयीन असल्या कारणाने त्याचा बोन ऑसिफिकेशन चाचणीचे आदेश दिले होते. त्यामध्ये तो आज प्रौढ असल्याचे निष्पण्ण झाले आहे. त्यामुळे आता त्याला देखील कस्टडीत घेतले जाणार आहे.
ADVERTISEMENT