Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणात मोठी अपडेट, चौथ्या आरोपीची ओळख पटली; कोण आहे तो शूटर?

मुंबई तक

13 Oct 2024 (अपडेटेड: 13 Oct 2024, 06:57 PM)

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी यांच्या हत्याप्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणात आता चौथ्या आरोपीला अटक केली आहे. मोहम्मद झिशान अख्तर असे या आरोपीचे नाव आहे. हा आरोपी नेमका कोण आहे? त्याला पोलिसांनी कशी अटक केली? हे जाणून घेऊयात.

baba siddique murder case police arreste forth accuse zishan akhtar lawrence bishnoi gang member

सिद्दीकी हत्याकांडातील चौथा शूटर कोण?

follow google news

बातम्या हायलाइट

point

सिद्दीकी हत्याकांडातील चौथ्या आरोपीला अटक

point

मोहम्मद झिशान अख्तर असे आरोपीचे नाव आहे

point

पंजाबच्या पटियाला तुरुंगात होता झिशान

Baba Siddique Murder Case Update : बाबा सिद्दीकी यांच्या हत्याप्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणात आता चौथ्या आरोपीला अटक केली आहे.  मोहम्मद झिशान अख्तर असे या आरोपीचे नाव आहे. हा आरोपी नेमका कोण आहे? त्याला पोलिसांनी कशी अटक केली? हे जाणून घेऊयात.  (baba siddique murder case police arreste forth accuse zishan akhtar lawrence bishnoi gang member) 

हे वाचलं का?

आजतकने दिलेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील चौथ्या आरोपीचे नाव मोहम्मद झिशान अख्तर आहे. झिशान अख्तर हा पंजाबमधील जालंधरचा रहिवासी आहे. झिशान अख्तरला यावर्षी 7 जून रोजी पटियाला तुरुंगातून बाहेर आला होता. पंजाबच्या पटियाला तुरुंगातच तो लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात आला होता,अशी माहिती आता समोर आली आहे. 

हे ही वाचा : Baba Siddique : गावात एकाचा काटा काढला, 18 व्या वर्षी जेल..., सिद्दीकींची हत्या करणाऱ्या शुटरची क्रिमिनल हिस्ट्री

या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी गुरमेल सिंग आणि धर्मराज कश्यप नावाच्या दोन आरोपींना अटक केली आहे. शिवा कुमार आणि मोहम्मद झिशान अख्तर नावाचे दोन आरोपी फरार होते.  या आरोपींना पकडण्यासाठी मुंबई पोलिसांनी 10 पथके तयार केली होती. दरम्यान आज कोर्टात झालेल्या सुनावणीत न्यायालयाने गुरमेल सिंगला 21 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच अल्पवयीन असल्याचा दावा करणाऱ्या धर्मराज कश्यपचे खरे वय शोधण्यासाठी बोन ओसीफिकेशन चाचणी केली जाणार आहे. न्यायालयाने देखील याला मान्यता दिली आहे.
 
 दरम्यान या प्रकरणात आता झिशान अख्तरला अटक केल्यानंतर आता पोलीस तपासात आणखी गोष्टी उजेडात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता या प्रकरणात आणखी काय माहिती समोर येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

    follow whatsapp