Baba Siddique : 700 शूटर, 11 राज्यात नेटवर्क, दाऊद इब्राहिम सारखीच आहे बिश्नोई गँग?

मुंबई तक

14 Oct 2024 (अपडेटेड: 14 Oct 2024, 05:43 PM)

Lawrence Bishnoi Gang : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दी यांच्या हत्येची जबाबदारी ही लॉरेन्स बिष्णाई गँगने घेतल्याचा दावा केला जात आहे. पुण्यातील शुबू लोणकर नावाच्या फेसबूक अकाऊंटवरून हा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे या हत्याकांडात आता बिश्नोई गँग चर्चेत आली आहे. ही बिश्नोई गँग नेमकी कशी आहे? या गँगमध्ये किती मेंबर आहेत? आणि किती राज्यात या गँगचे नेटवर्क आहे? हे जाणून घेऊयात.

 baba siddique murder lawrence bishnoi gang is follwing dawood ibrahim path bishnoi gang read full story

दाऊद इब्राहिम सारखीच आहे बिष्णोई गँग?

follow google news

बातम्या हायलाइट

point

बिश्नोई गँग नेमकी कशी आहे?

point

गँगमध्ये किती मेंबर आहेत?

point

किती राज्यात या गँगचे नेटवर्क आहे?

Lawrence Bishnoi Gang : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दी यांच्या हत्येची जबाबदारी ही लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतल्याचा दावा केला जात आहे. पुण्यातील शुबू लोणकर नावाच्या फेसबूक अकाऊंटवरून हा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे या हत्याकांडात आता बिश्नोई गँग चर्चेत आली आहे. ही बिश्नोई गँग नेमकी कशी आहे? या गँगमध्ये किती मेंबर आहेत? आणि किती राज्यात या गँगचे नेटवर्क आहे? हे जाणून घेऊयात. (baba siddique murder lawrence bishnoi gang is follwing dawood ibrahim path bishnoi gang read full story)

हे वाचलं का?

खरं तर गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांच्या टोळीवर राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) सातत्याने कारवाई करत आहे. त्यामुळे एनआयएने दिल्ली न्यायालयात दाखल केलेल्या आपल्या आरोपपत्रात बिश्नोई टोळीबाबत अनेक मोठे खुलासे केले आहेत. ज्यामध्ये एनआयएने लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीची तुलना दाऊद इब्राहीमशी केली होती. तसेच कॅनडा आणि भारतातून वॉन्टेड असलेला लॉरेन्स बिश्नोई, गोल्डी ब्रार यांच्यासह अनेक कुख्यात गुंडांच्या विरोधात गँगस्टर टेरर प्रकरणात आरोपपत्र दाखल करून राष्ट्रीय तपास यंत्रणा NIA ने मोठा खुलासा केला आहे.

दाऊदच्या पावलावर पाऊल ठेवतोय बिश्नोई 

एनआयएने आपल्या आरोपपत्रात म्हटले आहे की, लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचे दहशतवादी सिंडिकेट अभूतपूर्व पद्धतीने पसरले आहेत. जसे दाऊद इब्राहिमने 90 च्या दशकात छोटे छोटे गुन्हे करून आपले नेटवर्क तयार केले होते. दाऊदने ड्रग स्मगलिंग, टार्गेट किलिंग, खंडणी रॅकेटच्या माध्यमातून डी कंपनी सुरू केली आणि नंतर पाकिस्तानी दहशतवाद्यांशी हातमिळवणी करून आपले नेटवर्क पसरवले होते. दाऊद इब्राहिम आणि डी कंपनीप्रमाणेच बिश्नोई टोळीनेही छोट्या छोट्या गुन्ह्यांपासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. आता त्याने स्वतःची टोळी तयार केली आणि बिश्नोई टोळीने उत्तर भारताचा ताबा घेतला आहे.

हे ही वाचा : Baba Siddique : तुरुंगात रचला सिद्दीकींच्या हत्येचा कट! 4 आठवडे रेकी, 3 शूटर 6 गोळ्या..., हत्याकांडात आतापर्यंत काय काय घडलं?

टोळीत 700 हून अधिक शूटर 

बिश्नोई टोळी सतविंदर सिंग उर्फ गोल्डी ब्रारच्या माध्यमातून कार्यरत आहे, जो कॅनेडियन पोलीस आणि भारतीय एजन्सीला हवा आहे. एनआयएने सांगितले की बिश्नोई टोळीत 700 हून अधिक शूटर आहेत, त्यापैकी 300 पंजाबशी संबंधित आहेत.

 बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांचे फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूबच्या माध्यमातून अपलोड करण्यात आले. न्यायालयात हजर करत असताना  बिश्नोईचा फोटो पोस्ट करून अशा प्रकारे टोळीचा प्रचार करण्यात आला.  बिश्नोई टोळीने 20-21 या वर्षात खंडणीतून कोट्यवधी रुपये कमावले आणि तो पैसा हवालाद्वारे परदेशात पाठवला गेला.

'इतक्या' राज्यात पसरलंय गँगचं नेटवर्क

एनआयएनुसार, बिश्नोईची टोळी एकेकाळी फक्त पंजाबपुरती मर्यादित होती. पण गोल्डी ब्रार याने हरियाणा, दिल्ली आणि राजस्थानच्या टोळ्यांशी हातमिळवणी करून मोठी टोळी तयार केली. बिश्नोई टोळी आता संपूर्ण उत्तर भारतात पंजाब, उत्तर प्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान आणि झारखंडमध्ये पसरली आहे.तसेच सोशल मीडिया आणि इतर विविध मार्गांनी तरुणांना टोळ्यांमध्ये भरती केली जाते.तरुणांना त्यांच्या आवडीच्या देशात हलवण्याचे आमिष दाखवून टोळीत भरती केले जाते. 

हे ही वाचा : Baba Siddique Murder : सिद्दीकी हत्याकांडात मोठी अपडेट! शूटरच्या टार्गेटवर होते आमदार झिशानही...

एनआयएच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानमध्ये राहणारा खलिस्तानी दहशतवादी हरविंदर सिंग रिंडा हा पंजाबमध्ये टार्गेट किलिंग आणि गुन्हेगारी कारवाया करण्यासाठी बिश्नोई टोळीच्या शूटर्सचा वापर करतो. काही दिवसांपूर्वी एनआयएने लॉरेन्स बिश्नोई, गोल्डी ब्रार यांच्यासह एकूण 16 गुंडांच्या विरोधात UAPA अंतर्गत कोर्टात आरोपपत्र दाखल केले होते.

    follow whatsapp