Balasaheb Thackeray On Narayan Rane: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. अशातच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी बाळासाहेब ठाकरेंसोबतचा एक महत्त्वाचा किस्सा समोर आणला आहे. 2004 मध्ये भास्कर जाधव यांनी शिवसेना सोडली होती. तर 2005 मध्ये नारायण राणे यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी भास्कर जाधव यांच्याशी फोनवरून संवाद साधला होता. त्यावेळी बाळासाहेबांनी नारायण राणे यांच्यावर कठोर शब्दात टीका केली होती. "भास्कर तुला सांगून टाकतो, माझा याला (नारायण राणे) शाप आहे. हा पदाकरता लोकांच्या दारोदारी भटकेल", असं बाळासाहेब म्हणाले होते, असा खुलासा जाधव यांनी केला. ते मुंबई तकच्या चावडी शो मध्ये बोलत होते.
ADVERTISEMENT
बाळासाहेब ठाकरे आणि भास्कर जाधव यांच्यात काय चर्चा झाली होती?
माझी माणसं सांगायची की, बाळासाहेब तुम्हाला फोन करणार आहेत. बाळासाहेबांचं एक काम आहे. एक दिवसा मी तीन-साडेतीन वाजता अँटी चेंम्बरमध्ये जेवायलो बसलो होतो. त्यावेळी माझ्या पीएनं मला फोन आल्याचं सांगितलं. तेव्हा मी म्हणालो, अरे मला घासभर जेऊदे ना...तेव्हढ्यात ते म्हणाले साहेबांचा फोन आला आहे. माझ्या ध्यानी मनी काहीच नव्हतं. कोण साहेब...जरा जेवतोय, दिसत नाही का तुम्हाला, असं मी त्यांना बोलतो. तेव्हा ते लगेच म्हणाले, बाळासाहेबांचा फोन आहे. मी तसाच जेवणावरून उठलो आणि फोन घेतला. ते डॉ जलील परकार होते. ते हयात आहेत. विचारून बघा. मी खोटं बोलत नाही. बाळासाहेबांचा फोन म्हटल्यावर माझ्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत होत्या, असा भावनिक किस्सा भास्कर जाधव यांनी मुंबई तकच्या मुलाखतीत सांगितला.
हे ही वाचा >> धमकी, रेकी, फायरिंग आणि मित्राची हत्या...लॉरेन बिश्नोईने सलमान खानला कसं केलं भयभीत? वाचा Inside Story
"भास्कर कसा आहेस? असा साहेबांनी विचारलं. साहेबांना मी म्हणालो, मी बरा आहे. डॉ जलील परकारांचं काम कुणाकडून होत नाही. ते काम तू करू शकतोस. मी साहेबांना म्हणालो, ते काम मला माहित नाही. पण ते काम मी करतो. तुम्ही कसे आहात साहेब? तुम्हाला भेटायची इच्छा आहे. साहेब म्हणाले, कधीही ये, माझा दरवाजा उघडा आहे. पण तुझ्या नेत्याला (शरद पवार) भेटून ये. तुझ्याबद्दल आता संशय निर्माण होता कामा नये. आमच्याकडून तुझ्यावर अन्याय झालाय.
हे ही वाचा >> Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दीकी हत्याकांड! दोन मोठी कारणं आली समोर
मी साहेबांना म्हणालो, ठीक आहे, जे काही काम असेल, ते मी करतो. पवार साहेब कोकणच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी मी पवार साहेबांना म्हणालो, कधीतरी तुमच्या कानावर येईल. माझं आणि बाळासाहेबांचं बोलणं झालं आहे. मला तुम्हाला भेटायची इच्छा आहे, असं मी बाळासाहेबांना म्हणालो. यावर मोठं मन करून पवार साहेब म्हणाले, थांबू नकोस, ताबडतोब भेटायला जा. तुला जेव्हा कधी वाटेल, तेव्हा त्यांना भेट. माझ्या परवानगीची गरज नाही. काहीही होणार नाही, हे पवार साहेब म्हणाले, असं भास्कर जाधव यांनी मुंबई तकच्या चावडी शो मध्ये सांगितलं.
ADVERTISEMENT