Maharashtra MLC Election 2025 : महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांनंतर आता राज्यात विधान परिषदेची पोट निवडणूक पार पडणार आहे. पाच जागांसाठी ही निवडणूक पार पडत असून, भाजप सर्वाधिक तीन जागा लढवणार आहे. भाजप केंद्रीय कार्यालयाने ही यादी जाहीर केली आहे. यामध्ये संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादा राव केचे यांना संधी देण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
कोण आहेत संदीप जोशी?
संदीप जोशी हे देवेंद्र फडणवीस यांचे बालपणीचे मित्र असून, त्यांनी राजकारणातही बराच काळ सोबत घालवला आहे. जोशी हे नागपुर महापालिकेचे दोन वेळा ( 2002-2007 ते 2007-2012) महापौर राहिले आहेत. त्यांनी विधानसभेला पश्चिम नागपुर मधून तिकीट मिळावं अशी इच्छा व्यक्त केली होती. परंतु जातीय आणि राजकीय समीकरण बघता त्यांना तिकीट देण्यात आलेलं नव्हतं. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असतांना त्यांच्या नागपूर येथील कार्यालयाची जबाबदारी त्यांनी संदीप जोशी यांच्याकडे सोपविलेली होती. संदीप जोशी यांना उपमुख्यमंत्री यांचे मानद सचिव बनवण्यात आले होते.
हे ही वाचा >> शरद पवारांनी दिल्लीतील 'तालकटोरा'मध्ये मराठा योध्यांचे पुतळे बसवण्याची मागणी का केली? इतिहास काय?
दादाराव केचे कोण?
दादाराव केचे हे आर्वीचे माजी आमदार असून, नंतर त्यांचं तिकीट कापून त्यांच्याजागी सुमित वानखेडेंना उमेदवारी देण्यात आली होती. नाराज झालेल्या दादाराव केचेंनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. बावनकुळेंनी केचेंची थेट अमित शाहांशी भेट करुन दिली होती. त्यानंतर दादाराव केचेंनी उमेदवारी अर्ज मागे घेतला होता.
संजय केनेकर कोण आहेत?
हे ही वाचा >> रत्नागिरी: होळीदरम्यान मशिदीचा गेट तोडला? काय खरं-काय खोटं.. नेमकं प्रकरण काय?
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात संजय केनेकर यांनी बूथ लेव्हलपासून पक्षासाठी काम केलं आहे. भाजपच्या कामगार मोर्चाचे अध्यक्ष, भाजप जिल्हाध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं आहे. संभाजीनगर पूर्वमधून निवडणूक लढण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली होती, मात्र 2014 ला अतुल सावेंना उमेदवारी देण्यात आली. संजय केनेकर हे म्हाडाचे सभापती सुद्धा राहिले आहेत. सध्या ते भाजप प्रदेश सरचिटणीस म्हणून काम करत होते.
ADVERTISEMENT
