Nilesh Rane: 'आ%#$@... भ%&^...', निलेश राणेंनी पातळीच सोडली, भास्कर जाधवांना भर सभेत शिवीगाळ

मुंबई तक

16 Feb 2024 (अपडेटेड: 16 Feb 2024, 11:30 PM)

Nilesh Rane vs Bhaskar Jadhav: गुहागरमधील जाहीर सभेत निलेश राणेंनी अत्यंत खालच्या शब्दात भास्कर जाधव आणि ठाकरे कुटुंबावर टीका केली. अत्यंत शिवराळ भाषेत त्यांनी भास्कर जाधव यांचा समाचार घेतला.

निलेश राणेंनी दिल्या भास्कर जाधवांना अर्वाच्य शिव्या

निलेश राणेंनी दिल्या भास्कर जाधवांना अर्वाच्य शिव्या

follow google news

बातम्या हायलाइट

point

निलेश राणेंनी पातळी सोडली

point

भास्कर जाधवांना जाहीर सभेत शिव्या

point

ठाकरे कुटुंबावरही जहरी टीका

Nilesh Rane Speech: गुहागर: भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी आज (16 फेब्रुवारी) शिवसेना (UBT) नेते आणि आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांचा बालेकिल्ला असलेल्या गुहागरमध्ये जाहीर सभा घेतली. पण याच सभेत बोलताना निलेश राणेंनी कोणतेही राजकीय संकेत न पाळता सर्वांसमोर भास्कर जाधव यांना अर्वाच्य शब्दात शिवीगाळ केली. याशिवाय त्यांनी ठाकरे कुटुंबीयांवर देखील जहरी टीका केली. (bjp leader nilesh rane dropped the level used bad words bhaskar jadhav in a public meeting and highly venomous criticism on the thackeray family)

हे वाचलं का?

निलेश राणेंच्या सभेआधी दगडफेक

दरम्यान, या सभेला येण्यापूर्वी चिपळूणमध्ये ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना अक्षरश: भिडले होते. दोन्ही गटातील कार्यकर्त्यांकडून यावेळी मोठ्या प्रमाणात दगडफेक देखील करण्यात आली. ज्यामध्ये निलेश राणेंच्या ताफ्यातील अनेक गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या. त्यामुळे काही काळ परिसरात तणाव निर्माण झाला होता. म्हणून पोलिसांकडून अश्रूधुराच्या नळकांड्या देखील फोडण्यात आल्या. 

निलेश राणेंची भर सभेत शिवीगाळ 

या सगळ्या राड्यानंतर गुहागरमध्ये झालेल्या जाहीर सभेत निलेश राणे यांनी मात्र सगळ्या मर्यादा सोडून भास्कर जाधव आणि ठाकरे कुटुंबावर हल्ला चढवला.. 

निलेश राणेंचं गुहागरमधील भाषण जसंच्या तसं... 

'उद्धव ठाकरे जेव्हा कणकवलीला आले होते.. कणकवलीमध्ये हा तुमचा चिपळूणचा भास्कर नको नको ते शब्द बोलला.. नितेश राणेला बोललेलं मला चालतं पण राणे साहेबांना बोललेलं मला चालत नाही. आमच्या नेत्यांना वेडवाकडं बोलायचं नाही.'

 

'हा भास्कर नाशिकला गेला तिकडे हा भ*$# आमच्यावर टीका.. नाशिकच्या सभेत राणे साहेबांचं काय घेणं-देणं.. हा शिवाजी पार्कला उभा राहिला तिकडे पण राणे साहेबांवर टीका.. परवा कणकवलीला आला तेव्हाही परत टीका करून गेला. गुहागर मतदारसंघाची एक उंची होती. मी अनेक वर्षात गुहागरमध्ये ये-जा करत आहे.' 

 

'या मतदारसंघाला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम नातू कुटुंबाने केलं.. या भ*#% मात्र घालवायचं काम केलं. एक तरी काम सांगण्यासारखं, दाखवण्यासारखं नाही.. ज्या उंचीवर नातू साहेबांनी मतदारसंघ नेला त्याच्या 25 टक्के तरी या लोकांना सांभाळलं असतं ना आज या लोकांनी डोक्यावर घेतलं असतं. आज भ&$% ज्या दगडी पडल्या ना ते पडले नसते..' 

 

'एक-दोन आमच्यावर पण पडले दगड.. आमच्या म्हणजे मागच्या कोणत्या तरी गाड्यांवर.. काही हरकत नाही.. तू आमच्या शेपटीवर पाय दिलाएस भास्कर जाधव भ*&%# लक्षात ठेव.. या जन्मात तुला विसरणार नाही म्हणजे नाही...'

 

'तुझा नाय #$% #@ &$&$ ना.. एक दिवस तर नावाचा राणे नाही सांगणार..' 

 

'लक्षात ठेव.. राणे कधीही कोणाच्या वाकड्यात जात नाही.. तुझी ती चिपळूणची भाईगिरी होती ना.. भ#%$@ याच निलेश राणेने संपवली होती. हे विसरू नको..' 

 

'तुझ्या आ%@# &!@ तुला... साल्या 100 बापाची ^#^#@ तू.. तू दुसऱ्यांचे बाप काढतोस.. म्हणे बाळासाहेब बोलले.. याला.. अरे या भिका^ कोणी मातोश्रीमध्ये घेत नव्हतं. हा कुत्र्यासारखा बाहेर.. &$# तुला घेतलं कधी मातोश्रीमध्ये? काय संबंध...' 

 

'एक दिवस तोच भंगार तुझ्या &%# नाय ना घातला.. तर.. कोणाला हुशारी करतोस तू आमच्याशी... अरे त्या ठाकरेंना ना घाबरलो आम्ही, त्या पवारांना नाही घाबरलो आम्ही.. मुंबईत राहतो.. छातीठोकपणे मातोश्रीच्या बाहेरून रॅली काढतो.. कोणाच्या बापाने काय केलं नाही.. तू आम्हाला शिकवतो भाईगिरी...'

 

'भाईगिरीचं सर्टिफिकेट मुंबईतून मिळतं लक्षात ठेव.. अरे लांबून कसले दगड मारतो समोर ये.. तू नडतो आम्हाला..'

 

'हा पोलिसांच्या मागे.. पोपटी रंगाचं टी-शर्ट घातलं होतं.. याच्या आ%#$@ *#.. पोपटी.. सा# भ#%@' 

 

'आधी पोलिसांच्या मागे नंतर महिलांच्या मागे.. दोन-चार दगडी मारली असतील. काही हरकत नाही.. आता दगडीच्या बदल्यात निलेश राणे काय पाठवेल.. हे लक्षात ठेव.. तुला नाही सोडत आता..' 

 

'तू नख लावलास आम्हाला.. आता बसलाय तिकडे भ^#&... मोजून 100 लोकं होती.. म्हणे बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं की, मी नारायण राणेला काय नाय दिलं? त्याने दुसरेच शब्द वापरले.. बाळासाहेबांचे एवढे वाईट दिवस कधीच आले नव्हते.. तुला बाजूला बसवायला.. कधी सांगितलं तुला? आमच्या राणे साहेबांनी जेवढं बाळासाहेबांवर प्रेम केलं ना.. त्याच्या 25 टक्के पण प्रेम केलं नाही कधी तू..'

 

'हे शरद पवार वैगरे काय.. यांना सगळं आयतं मिळालं.. आमच्या साहेबांनी 1 रुपयांच्या नोकरीपासून सुरुवात केली. बाळासाहेबांवर अफाट प्रेम.. बाळासाहेब बोलले म्हणजे विषय संपला.. ज्या दिवशी बाळासाहेब गेले.. तेव्हा आम्ही लंडनला होतो. तेव्हा राणेसाहेब जेवले सुद्धा नाही.. आमचं अख्खं घर रडलं.. तू आम्हाला बाळासाहेबांचं प्रेम सांगतो.'

 

'भ%#& या निलेश राणेने तुझा बाजार उठवला नाही तर नाव सांगणार नाही.. अरे मला काय निवडणुकीची चिंता नाही.. दोन पराभव झाले अजून चार होऊ दे.. बापासाठी जगणारा म्हणजे निलेश राणे.. लक्षात ठेव..' 

 

'भर चौकात नको नको ते शब्द तू वापरलेस... तुझ्या कुठल्या कुटुंबावर &$#% आलो होतो रे आम्ही... कोण-कोण &$# गेलं.. एक मुलगा तुझ्यासारखा दिसत नाही..' 

 

'अरे तुझी दखल सुद्धा राणे साहेब घेत नाहीत.. ते आपले उद्धव ठाकरे, संजय राऊतवर बोलतात.. ते त्यांचं राजकारण आहे. अरे बाळासाहेब बोलत होते चालत होतं. आम्ही अनेक वेळा विचारलं साहेब.. बाळासाहेब काय-काय बोलतात.. मला राणे साहेब बोलले.. निलेश त्या माणसाला अधिकार आहे.. त्या माणसाने मला घडवलं, हे वैभव जे बघतोय ते त्यांच्यामुळे.. त्या माणसाने बोलायचं ते बोलू दे आपण कधी नाही बोलायचं.. मी म्हटलं.. मला सहन होत नाही मी कधी तरी बोलणार..' 

 

'या मातोश्रीची अब्रू नाही चव्हाट्यावर काढली तर बघ.. तू माझ्या दैवतावर बोललाएस.. मी तुझ्या दैवतावर बोलल्याशिवाय राहणार नाही. एकदा बोललो होतो मागे माहितीए ना..' 

 

'आता भास्कर तू महाराष्ट्रात कुठेही सभा घे.. त्यानंतर निलेश राणे तिथे सभा घेणार म्हणजे घेणार.. तू आम्हाला राजकारण शिकवतो का रे? आम्ही नाही सहन करणार..' 

 

'नातू साहेब.. जेवढा खर्च कुडाळ-मालवणला करणार तेवढा खर्च गुहागर करणार.. या भ@ आता घरी पाठवायचं म्हणजे पाठवायचं.. च्या.. आ%#& %#....' 

 

'अरे उद्धव ठाकरेची चाटायची म्हणजे किती चाटायची.. म्हणे ठाकरे कुटुंबासारखं कुटुंबच नाही.. आता तुम्हाला ठाकरे कुटुंब सांगतो.. जयदेव ठाकरे सख्खे बंधू.. आज कुठे आहेत.. शिंदे साहेबांकडे, स्मिता वहिनी कुठे आहेत शिंदे साहेबांकडे.. थापा कुठे आहे.. तू कुटुंबप्रमुख ना.. हा म्हणतो मी महाराष्ट्राचा कुटुंबप्रमुख अरे &$ घे माझा.. हा कसला कुटुंबप्रमुख...'

 

'जयदेव ठाकरे काय मागत होते.. ते कोर्टात गेले.. कोर्टामध्ये जज साहेबांसमोर जयदेव ठाकरे जे बोलायला सुरू झाले ना.. त्यानंतर जज साहेबांनी विनंती केली की, सगळ्या मीडियाला बाहेर काढा... जयदेव ठाकरेंचं एक वाक्य ऐकून घ्या.. ते म्हणाले की, 'तो ऐश्वर्य ठाकरे कोणाचा आहे ते मला माहीत नाही.'

 

'म्हणजे ठाकरे कुटुंबातला एक.. कोणाचा आहे ते माहीत नाही.. आणि ज्या दिवशी महाराष्ट्राला कळेल की तो ऐश्वर्य ठाकरे कोण त्या दिवशी महाराष्ट्रात भूकंप येईल.. हे माझी वाक्यं नाहीत. हे त्या जयदेव ठाकरेंचे वाक्य आहेत.' 

 

'त्यानंतर कोणतीच सुनावणी कॅमेऱ्यासमोर झाली नाही.. हे ठाकरे कुटुंब? कोण कोणाल जन्माला घालतोय हेच माहिती नाही. आम्ही बोलायला गेलो.. तुझे बाप काढले तर..' 

 

'मला वाईट या गोष्टीचं वाटलं की, भास्कर बोलत होता आणि उद्धव एका कोपऱ्यात हसत होता. तू एवढा सुसंस्कृत ना.. मग सांगायचं होतं. भाषा सुधरा आम्हाला ही भाषा चालत नाही..' 

 

 

 

 

'काय झालं.. दोन्ही मुलांची लग्न झाली नाही.. कोणी मुलीच देत नाही. आता तर मुलंही देणार नाही.. तो आदित्य ठाकरे अडीच वर्ष कॅबिनेट मंत्री.. कसलाही अनुभव नव्हता. त्याने काय केलं.. दिशा सालियन नावाची मुलगी.. तिला कपडे काढून बाल्कनीतून फेकून दिलं. कपडे काढून... हे विकृत.. हे %$ राक्षस..'

 

'यांचे चेहरे फक्त साधे आहेत.. त्या मुलीच्या आई-वडिलांना कसं वाटलं असेल.. ठाकरे घराण्यासमोर कसे ते आई-वडील लढतील.. त्यांनी साधी तक्रार केली नाही.. तेव्हा मुख्यमंत्र्याच्या मुलाने मर्डर केला आहे.. आदित्य ठाकरे.. त्याला नंतर एक पोरगी आवडली तो सुशांतसिंग राजपूत त्याला वाटलं ही मला नाही तर त्याला पटेल.. बाचाबाचीमध्ये त्या मुलाचा जीव गेला समोरासमोर.. आणि फाशी दाखवली.' 

 

'एका पोरीवरून लफडं झालं.. फाशी दाखवली.. मला सांगा.. ही सगळी मर्डर केस, रेप केस.. ही सगळी केस यांचा तपास अधिकारी कोण होता? सचिन वाझे..' 

 

'मुकेश अंबानीच्या घराबाहेर जिलेटीनच्या कांड्या ठेवल्या.. तपास अधिकारी कोण वाझे.. ही सगळी कामं स्वत:च्या अधिकाऱ्यांकडून करून घ्यायची आणि स्वत:च्या मुलाला वाचवायचं.. असा हा मुलगा..' 

 

'महाराष्ट्रात दाखवतो मी सुसंस्कृत आहे.. तो दुसरा मुलगा तो उंटासारखा कोण रे तो.. &$XS सारखा... तो तर कोणासारखाच वाटत नाही.. तो तर साला थापासारखा पण वाटत नाही..' 

 

'कुठल्या तरी हॉटेलमध्ये गेला.. आमच्या मोहीत कंबोजने त्याची सीसीटीव्ही काढलं.. 90 हजाराची दारू प्यायला.. पेग प्यायचा आणि पोरीच्या कानात काही तरी बोलायचा.. हे सुसंस्कृत म्हणे..' 

 

'उद्धव ठाकरेला गरमी लागते तर वर्षातून दोनदा लंडनला जातात.. सगळं कुटुंब.. हे साधे? मुंबईत आंदोलन असेल तर याला व्हॅनिटी व्हॅन लागतात दोन-दोन..' 

 

'आमच्या कशाला तोंडाला लागतो रे.. त्या दोन राणेंच्या तोंडाला लाग.. पण निलेश राणेच्या तोंडाला नका रे लागू.. निलेश राणे हा जिवंतच नारायण राणेसाठी आहे लक्षात ठेव.. जोपर्यंत तुम्ही नारायण राणेवर बोलणार.. तोपर्यंत निलेश राणे असाच आडवा येणार.. हीच भाषा बोलणार.. मला कसलीच पर्वा नाही..'

 

'तुला सांगतो भास्कर.. मेरा वक्त बदला है.. हैसिएत नही.. तेरी किस्मत बदली है.. औकात नही..'

 

'2019 ची निवडणूक होती.. आम्ही स्वाभिमान पक्षात होतो. मला माहिती होतं माझा पराभव होणार.. पण राणे साहेबांची इच्छा होती की, मी लढलो पाहिजे.. मी म्हटलं कोणता पक्ष जवळ नाही.. ते म्हणाले लढायचं.. उतरलो आम्ही.. आगीत उतरलो.. पराभव झाला.. त्यादिवशी उमेदवार म्हणून हरलो पण मुलगा म्हणून जिंकलो.. याच निलेश राणेने फ्रिजवर तीन लाख मतं घेतली.' 

 

'तू एकदा हो बाजूला.. बघ आमचे नातू साहेब तुझं डिपॉझिट जप्त करतील तुझं भ^#$%... तू येऊनच दाखव इकडे..' 

 

'मी पोलीस प्रशासनाला सांगतो.. ज्या त्याला संरक्षण द्या.. निलेश राणे मागे लागलाय सांगा.. जेवढं संरक्षण द्यायचं तेवढं त्याला.. आता नाही सोडत..' 

 

'आज आपल्यामसोर या सगळ्या गोष्टी बोलायला लागल्या याची खंत आहे. मी आपली माफी मागतो..की मला माझं तोंड खराब करावं लागलं या भ$^ मुळे.. मी माफी मागतो..' 

 

अशा शब्दात निलेश राणेंनी गुहागरमधील जाहीर सभेत भाषण केलं.. ज्याला आता शिवसेना (UBT) आणि भास्कर जाधव कसं उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

    follow whatsapp