Ganpat Gaikwad : शिवसेना-भाजपत ठिणगी, थेट एकनाथ शिंदे-श्रीकांत शिंदेंवर आरोप

मिथिलेश गुप्ता

13 Sep 2023 (अपडेटेड: 13 Sep 2023, 05:24 AM)

Ganpat Gaikwad eknath shinde News : भाजपचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

Kalyan news : Ganpat Gaikwad alleged that eknath shinde and shrikant shinde demotivate bjp workers.

Kalyan news : Ganpat Gaikwad alleged that eknath shinde and shrikant shinde demotivate bjp workers.

follow google news

BJP MLA Ganpat Gaikwad Allegation : कल्याण लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपमधील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर आलाय. भाजपचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सुपुत्र तथा कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर आरोप केले आहेत. (Kalyan East MLA Ganpat Gaikwad allegations on cm eknath shinde and shrikant shinde)

हे वाचलं का?

भाजप-शिवसेनेत युती झाली. दोन्ही पक्षाचं राज्यात सरकार आहे. मात्र, ठाणे, कल्याणमध्येच दोन्ही पक्षात संघर्ष जुंपला आहे. गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही पक्षातील नेते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये सातत्याने राजकीय वादाच्या ठिणग्या उडत आहेत. त्यात आता कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदेंनाच लक्ष्य केलं आहे.

हेही वाचा >> India-Bharat : 74 वर्षांपूर्वी कसं ठरलं देशाचे नाव? आंबेडकरांची भूमिका ठरली महत्त्वाची

निवडणुका लांबणीवर पडल्या असल्या तरी कल्याण डोंबिवली महापालिकेत महापौर कुणाचा असेल, यावरूनच शिवसेना-भाजपत संघर्ष सुरू झालाय. यावरून मनसेचे आमदार राजू पाटील यांनी भाजपची खिल्ली उडवली. त्यानंतर भाजप आमदार गणपत गायवाडांनी त्यांच्या भूमिकेला दुजोरा देत शिंदेंना लक्ष्य केलं.

गणपत गायकवाड शिंदे पिता-पुत्रांबद्दल काय बोलले?

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे या पितापुत्राकडून भाजपला कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजप कार्यकर्त्यांचं खच्चीकरण केले जात आहे. शिंदे गटासमोर भाजपच काहीच चालत नाही”, असे गणपत गायकवाडांनी म्हटलं आहे. त्यामुळे कल्याणमधील हा संघर्ष राजकीय वर्तुळात महत्त्वाचा बनला आहे.

हेही वाचा >> Maratha Reservation : तामिळनाडूत 69 टक्के आरक्षण, मग महाराष्ट्रात का अशक्य?

भाजप-शिवसेनेत आधीही झालाय संघर्ष

भाजप-शिवसेनेत संघर्ष होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची बदली करण्याची मागणी भाजपने केली होती. पण, त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. यानंतर भाजपने असा ठराव केला की, लोकसभा निवडणुकी श्रीकांत शिंदेंना मदत करणार नाही. त्यामुळे श्रीकांत शिंदेंही आक्रमक झाले होते. मात्र, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी यात हस्तक्षेप करत वादावर पडदा टाकला होता.

विकास कामाच्या मुद्द्यावरून वाद

विकास कामाच्या मुद्द्यावरून कल्याण पूर्वचे शिवसेना (शिंदे गट) शहरप्रमुख महेश गायकवाड आणि आमदार गणपत गायकवाड यांच्यात सोशल मीडियावर वाद झाला होता. गायकवाड यांना चर्चेसाठी येण्याचं खुलं आव्हान दिलं गेलं. गायकवाड चर्चेसाठी मनपाच्या डी वार्डात आलेही, पण पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर गायकवाड यांनी हे विधान केलं आहे.

    follow whatsapp