भाजप प्रवेशानंतर नांदेडमध्ये पहिलीच रॅली, चव्हाणांकडून भाजपचं तोंडभरून कौतुक

मुंबई तक

• 06:43 PM • 23 Feb 2024

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांची राज्यसभेवर निवड झाल्यानंतर ते पहिल्यांदाच नांदेडमध्ये आले. त्यांची जंगी मिरवणूक काढत अशोक चव्हाण यांनी भाजपचे तोंडभरून कौतुक करत जे विकासासोबत आहेत, ते माझ्यासोबत असल्याचं मत त्यांनी व्यक्त केले.

Ashok Chavan

Ashok Chavan

follow google news

बातम्या हायलाइट

point

'नांदेडच्या विकासासाठी भाजपची मोठी मदत'

point

'जी लोकं विकासासोबत तिच माणसं माझ्यासोबत'

Ashok Chavan: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसमधून (Congress) भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला. त्यानंतर अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांची भाजपमधून राज्यसभेवर निवड करण्यात आली.  अशोक चव्हाण राज्यसभेवर गेल्यानंतर त्यांच्याच बालेकिल्ल्यात आज पहिल्यांदाच आगमन झाले. यावेळी त्यांनी भाजपचे तोंडभरून कौतुक करत जी मंडळी विकासासोबत आहेत, ती भाजपसोबत आहेत आणि माझ्यासोबतही असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. 

हे वाचलं का?

काँग्रेस ते भाजप प्रवास

राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. त्यांना राज्याचे मुख्यमंत्री पद दोन भूषवण्याची संधी मिळाली होती. मात्र तरीही त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. 

तिच लोकं माझ्यासोबत

अशोक चव्हाण भाजपमध्ये जाण्याचे कारण अनेकांनी विचारले होते. मात्र आज त्यांनी राज्यसभेवर निवड झाल्यानंतर त्यांनी अनेकांच्या प्रश्नांचे उत्तर दिले. जी मंडळी विकासासोबत आहेत ती भाजपसोबत आणि तिच लोकं माझ्यासोबतही असल्याचा त्यांनी विश्वास व्यक्त केला.

भाजप म्हणजे विकास

राज्यसभेच्या निवडीनंतर नांदेडमध्ये आलेल्या अशोक चव्हाण यांनी भाजप म्हणजे विकास आहे. त्याला नरेंद्र मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची साथ लाभली आहे. त्यामुळे आता नांदेडचाही विकास होण्यासाठी मोठी मदत होणार असल्याचंही त्यांनी सांगितले.

जंगी मिरवणूक

अशोक चव्हाण यांची राज्यसभेवर निवड झाल्यानंतर ते पहिल्यांदाच नांदेडमध्ये आले. यावेळी नांदेड विमानतळापासून घरापर्यंत चव्हाण यांची मिरवणूक काढण्यात आली. 

कार्यकर्त्यांचा जल्लोष

राज्यसभेच्या निवडीनंतर त्यांची मिरवणूकही मोठ्या जल्लोषात काढण्यात आली. फटाके आणि ढोल ताश्याच्या गजरात अशोक चव्हाण यांचे स्वागत करण्यात आले होते. त्यामुळे कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहून मी भारावून गेल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.

    follow whatsapp