BJP Sharad Pawar's NCP Leader : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना पक्षात सामावून घेत भाजपने सगळ्यांना धक्का दिला. त्यानंतर आता पश्चिम महाराष्ट्रातील एक नेता भाजपच्या वाटेवर आहे. हा नेता शरद पवारांच्या जवळचा असून, भाजपकडून त्याला पक्षात घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती समोर आली आहे. लोकमत वृत्तपत्राने सुत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. (There is buzzing that a big leader of Sharad Pawar's NCP is going to join the BJP.)
ADVERTISEMENT
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपकडून जोरदार तयारी सुरू आहे. अधिकाधिक जागा जिंकण्यासाठी भाजपकडून विरोधी पक्षातील नेत्यांनाही पक्षात घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्रातही अनेक नेते भाजपमध्ये येण्यास इच्छुक आहेत, असे भाजपच्या नेत्यांकडून वारंवार सांगितले जात असताना आता शरद पवारांच्या जवळचा नेता भाजपच्या वाटेवर असल्याचे समोर आले आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यावर भाजपचं लक्ष्य
अशोक चव्हाण यांच्यानंतर राष्ट्रवादीतील हा नेता कोण, याबद्दलही चर्चा होत आहे. दिलेल्या वृत्तानुसार, भाजपने महाराष्ट्रातील 48 पैकी 42 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी काँग्रेस आणि शरद पवार (शरद पवार) यांच्या पक्षातील नेत्यांना पक्षात आणण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरू आहे.
शरद पवारांच्या जवळ असलेला हा नेता कोण?
वृत्तात म्हटलं आहे की, सांगली, सातारा आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढवण्याचे भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. शरद पवारांच्या जवळचा हा नेता पक्षात आला, तर फायदा होईल, असे भाजपचे समीकरण आहे. हा नेता अनेक वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात आहे. अनेक महत्त्वाच्या खात्याचे मंत्रिपदही या नेत्याने सांभाळले आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे या नेत्याची भाजपच्या राज्यातील एका महत्त्वाच्या नेत्यासोबत आणि दिल्लीतील नेत्यासोबतही पक्ष प्रवेशाबाबत चर्चा झाली असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. या नेत्याला भाजपमध्ये घेऊन त्याला किंवा त्याच्या मुलाला लोकसभेची उमेदवारी द्यायची अशी भाजपची रणनीती असल्याची चर्चा सुरू आहे.
जयंत पाटील यांनी मात्र हे वृत्त फेटाळून लावलं आहे. "अशा बातम्या केवळ अफवा आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे", अशी भूमिका जयंत पाटील यांनी मांडली.
अनेक नेते भाजपच्या वाटेवर
राज्यातील विरोधी पक्षातील अनेक नेते भाजपत जाणार असल्याचे बोलले जात आहे. उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातील भाजपचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस यांनीही याला दुजोरा दिलेला आहे. अशोक चव्हाण यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस असं म्हणाले होते की, "मी एवढंच सांगेन की, काँग्रेसमधले अनेक नेते भाजपच्या संपर्कात आहेत. गेली काही वर्ष काँग्रेस जी वाटचाल करतेय, त्यामुळे अनेकांची घुसमट होतेय."
फडणवीसांनी यावेळी असंही सांगितलं की, "भाजपसोबत अनेक पक्षातील बडे नेते येण्यासाठी इच्छुक आहेत. अनेक नेत्यांना वाटतं की, मुख्य प्रवाहात यायला हवं. त्यामुळे कोण कोण संपर्कात आहेत, भाजपमध्ये कोण कोण येणार... याबाबत मी इतकंच सांगेन की, आगे आगे देखीये, होता है क्या." त्यांच्या या विधानाने अनेक नेत्यांची नावे चर्चेत आली आहेत.
ADVERTISEMENT