ADVERTISEMENT
सुप्रीम कोर्टात समलैंगिक विवाहाच्या मान्यतेसाठी दाखल झालेल्या याचिकेवर केंद्र सरकारने आपली भूमिका मांडलीय.
केंद्राने 56 पानी प्रतिज्ञापत्र सादर करून समलैंगिक विवाहांना मान्यता देण्यास विरोध दर्शवला आहे.
समलैंगिक विवाहाची तुलना भारतीय विवाह नवरा, बायको आणि त्यांचे अपत्य या संकल्पनेत होऊ शकत नाही.
भारतीय विवाहाच्या संकल्पनेत नवरा बायको आणि त्यांचे अपत्य संकल्पना असताना समलैंगिक विवाहांना त्यात जागा नाही.
पार्टनर म्हणून एकत्र राहणे आणि समलैंगिक व्यक्तींद्वारे लैंगिक संबंध ठेवणे या गोष्टीची तुलना भारतीय कुटुंब संकल्पनेशी करता येणार नाही.
विवाहाची संकल्पना स्वत:च विरूद्द लिंगाच्या दोन व्यक्तींमधील मिलन दर्शवते. ही व्याख्या सामाजिक, सांस्कृतिक आणि कायदेशीररित्या विवाहाच्या कल्पना आणि संकल्पनेमध्ये अंतर्भूत आहे.
ही संकल्पना बदलू नये.भारतीय कुटूंब व्यवस्थेचे महत्व कमी करू नये असे केंद्राने स्पष्ट केले आहे.
या प्रकरणातील सुनावणी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड यांच्या अध्यक्षतेखालील न्यायपीठासमोर सोमवारी होणार आहे.
अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा.
ADVERTISEMENT