Chhagan Bhujbal Mumbai Tak Exclusive Interview : ‘मी जाहिरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती’. ‘ती शपथ आज पुर्ण केली’. ‘दिलेला शब्द मी पाळला’ असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मनोज जरांगे पाटलांच्या (Manoj Jarange Patil) आंदोलनावर तोडगा काढल्यानंतर व्यासपीठावर केले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या याच शपथेवर आता राज्याचे अन्न, नागरी व पुरवठा मंत्री व ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी टोला लगावला आहे. तुम्ही कुठली शपथ पुर्ण केलीत, असा थेट सवालच भुजबळांनी मुख्यमंत्री शिंदे यांना केला आहे. (chhagan bhujbal question to cm eknath shinde on maratha reservation manoj jarange patil mumbai tak exclusive interviw maharashtra politics)
ADVERTISEMENT
मुंबई तकचे संपादक साहिल जोशी यांनी छगन भुजबळ यांची एक्सक्लुझीव्ह मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत भुजबळांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. या मुलाखतीत भुजबळ म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती, मी मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही, असे ते म्हणाले होते. आणि त्या दिवशी ते म्हणाले मी शपथ पुर्ण केली. पण मराठा समाजाला काही आरक्षण दिले नाही, असा आरोपच भुजबळांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर केला.
हे ही वाचा : Ranjit Savarkar : पुस्तकातील ‘त्या’ दाव्यावर आव्हाड भडकले, ‘नथुरामी प्रवृत्तीला ठेचून…’
एकीकडे तुम्ही म्हणता ओबीसीला धक्का लावत नाही, दुसरीकडे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आयोगातर्फे साडे तीनशे कोटी रूपये खर्च करून सर्वेक्षण सुरू आहे. म्हणजेच काम पुर्ण नाही झालं नाही आहे. क्युरेटीव्ह पिटीशनचाही निर्णय अद्याप यायचा आहे. मग तुम्ही कुठली शपथ पुर्ण केलीत, असा खडा सवालच भुजबळांनी मुख्यमंत्री शिंदे यांना केला आहे.
भुजबळ पुढे म्हणतात, तुम्ही फक्त पुढच्या मार्गाने 10 ते 15 टक्के आरक्षण देत असल्याचे दाखवताय, पण खरं आरक्षण तुम्ही दुसऱ्याच मार्गाने दिले आहे. तुम्ही जे आरक्षण दिले आहेत, ते कुणबी प्रमाणपत्र देऊन आडमार्गाने दिल्याचे भुजबळ यांनी सांगितले. त्यामुळे मराठा समाजाला वेगळं आरक्षण मिळालंच नाही. मग तुम्ही जे आरक्षण दिलेत, ते कुठल्या मार्गाने दिले आहात. मग तुम्ही आरक्षणाचा जो शब्द पुर्ण केला आहे तो मराठा समाजाला ओबीसीतून घुसवून केल्याचे भुजबळ म्हणाले आहेत.
तसेच जर तुम्ही शपथ पुर्ण झाली असे म्हणता, तर मग आयोगाचा काम थांबवा, क्युरेटीव्ह पिटीशन मागे घ्या. मग साडे तीनशे कोटी का खर्च करताय? असा सवाल देखील भुजबळांनी मुख्यमंत्री शिंदेंना केला आहे.
हे ही वाचा : Lok Sabha 2024 Opinion Poll : भाजप, काँग्रेस की आप… कोण मारणार बाजी?
हे (जरांगे) उपोषण करून जे मागतात ते द्यायला सुरूवात केली. निजामशाहीच्या नोंदी, नंतर अख्ख्या मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या आणि आता ओबीसीत टाका. मग म्हणाले अख्ख्या महाराष्ट्रातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या. नंतर म्हणाले आरक्षण घेणार तर ओबीसीतूनच घेणार, आता म्हणतात 57 लाख नोंदी सापडल्या. त्यातले 30 ते 35 लाख जुने आहेत, तरी सुद्धा 20 ते 22 लाख नोंदी कुठून आल्या, या सगळ्या चुकीच्या नोंदी आहेत, असा आरोप देखील छगन भुजबळ यांनी केला आहे.
ADVERTISEMENT