CM Devendra Fadnavis : "लाडक्या बहिणींना मदत करतोय आणि...", शिर्डीत CM देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधानं!

CM Devendra Fadnavis Speech:  शिर्डीत भारतीय जनता पक्षाचं महाअधिवेशन सुरु आहे.  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आणि मंत्री या महाअधिवेशनाला उपस्थित राहिले आहेत.

CM Devendra Fadnavis On Ladki Bahin Yojana

CM Devendra Fadnavis On Ladki Bahin Yojana

मुंबई तक

• 04:53 PM • 12 Jan 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट आली समोर

point

लाडकी बहिण योजनेबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान

point

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाडक्या बहिणींबाबत नेमकं काय म्हणाले?

CM Devendra Fadnavis Speech:  शिर्डीत भारतीय जनता पक्षाचं महाअधिवेशन सुरु आहे.  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आणि मंत्री या महाअधिवेशनाला उपस्थित राहिले आहेत. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींबाबत मोठं विधान केलं. "आज भारतीय पक्षासोबत जोडणं म्हणजे लोकं सन्मान समजतात. सदस्य होण्यासाठी कुणालाही विचारा, तो व्यक्ती सदस्य होण्यासाठी तयार आहे. सरकारच्या माध्यमातून समाजातील सर्व वर्गांची अपेक्षापूर्ती करण्याचा प्रयत्न चालला आहे. आमच्या लाडक्या बहिणींना आपण मदत करतोय आणि पुढेही करतच राहणार आहे. लाडक्या बहिणींची मदत बंद होणार, शेतकऱ्यांना दिलेली वीज, सवलत बंद होणार, असा नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न चाललाय. मी एकच गोष्ट सांगतो, महिला, शेतकरी, युवा, गरिब, अल्पसंख्यांक, दिव्यांग असतील, तसच समाजातील जेव्हढ्या घटकांसाठी आम्ही योजना सुरु केल्या आहेत. त्या सर्व योजना पूर्ण करणार आहोत", असं फडणवीस म्हणाले. 

हे वाचलं का?

आपण पाहतो जी-20, जी-7 असतं, तसं भारतीय जनता पक्षाचं जी-6 तयार झालं आहे. जे लगातर तीनवेळा जिंकले, त्या राज्यांच्या म्हणजे गुजरात, मध्य प्रदेश, गोवा, छत्तीसगढ आणि हरियाणा यांच्यासोबत आता महाराष्ट्रदेखील जोडलेला आहे. ज्याने तिसऱ्यांदा जिंकण्याची हॅट्ट्रिक केली आहे.
जे काही घोषणापत्रात सांगितलेलं आहे. ते देखील पूर्ण करण्याचा प्रयत्न निश्चितपणे करणार आहोत. लाडक्या बहिणींना मदत करतोय, यापुढेही करणार आहे. आता सरकार आलेलं आहे. हे आपल्या महायुतीचं सरकार आहे.

हे ही वाचा >>  Suresh Dhas : "दलित समाजाचा सरपंच, जागेवर खात्मा केला गेला...", बीड सरपंच अपघातावर काय म्हणाले धस?

ज्यांना श्रद्धा आणि सबुरी समजलं नाही, त्यांची हालत बुरी झाली. हे आपण या विधानसभेत बघितलं आहे. महाकुंभाचं पर्व आपल्या देशात सुरु होत आहे. महाकुंभाचं अमृत पुन्हा एकदा प्राप्त करण्यासाठी हजारो लोक महाकुंभात एकत्रित होणार आहेत. अशा काळात हा विजय आपल्याला मिळाला आणि महाविजयाचं अधिवेशन आपण करत आहोत. महाराष्ट्राच्या जनतेनं तीन वेळा भारतीय जनता पक्षाला शंभर पेक्षा जास्त जागा दिल्या. गेल्या तीस वर्षाच्या महाराष्ट्राच्या इतिहासात शंभर पेक्षा जास्त जागा मिळवणारा एकमेव पक्ष कोणता असेल, तर तो तुमचा आणि आमचा भारतीय जनता पक्ष आहे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हे ही वाचा >> Beed Sarpanch Accident : राखेची वाहतूक करणाऱ्या ट्रकने उडवलं, बीडमध्ये पुन्हा एका सरपंचाचा मृत्यू, अपघात की...

    follow whatsapp