Congress MLA Hiraman Khoskar : विधान परिषद निवडणुकीने काँग्रेसला झटका दिला. पक्षाचे सात आमदार फुटले. कोणत्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले, याबद्दल काही नावांची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. यात हिरामण खोसकर यांच्या नावाबद्दलही चर्चा होत आहे. अशात हिरामण खोसकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. (Why Congress MLA Hiraman Khoskar meets CM Eknath Shinde)
ADVERTISEMENT
विधान परिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केल्याचा आरोप झालेले आमदार हिरामण खोसकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
हिरामण खोसकर एकनाथ शिंदेंना का भेटले?
"आमचे स्थानिक शेतकरी आहेत. आम्हाला वर्षभरापासून वेठीस धरले जात होते. एमएमआरडीएचे उपायुक्त खडके हे आले. गेल्या सहा महिन्यांपासून अतिक्रमणमध्ये असल्याचे सांगून काढायचे म्हणत होते. सातपूरपासून ते त्र्यंबकेश्वरपर्यंत आमच्या स्थानिक व्यावसायिक शेतकऱ्यांनी स्वतःच्या जागा घेऊन ठेवलेल्या आहेत", असे खोसकर यांनी सांगितले.
हेही वाचा >> मोदी सरकारचा मोठा निर्णय! 58 वर्षांपूर्वी घातलेली बंदी उठवली
"बाहेरच्या जिल्ह्यातून आलेल्यांनी त्या अधिकाऱ्याला उलट सुलट सांगितलं आहे. चार महिने अधिकाऱ्याने त्रास दिला. चार महिन्यांपूर्वी आम्ही मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली. शिंदेंनी आमचं ऐकून घेतलं आणि त्या अधिकाऱ्याला कॉल केला. निकषांमध्ये बसत असेल त्याला मदत करण्यास सांगितले होते", अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
अजित पवारांना सांगितलं, त्यांनी हे थांबवलं -हिरामण खोसकर
"गेल्या आठ दहा दिवसांपासून परत सुरूवात केली. मी स्वतः अजित पवारांना सांगितले. अजित पवारांनी थांबवलं. हा आयुक्त मंत्र्यांना वेगळं सांगतो आणि आम्हाला वेगळं सांगतो. मी त्यांना सांगितलं होतं की, पावसाळा आहे. आता करू नका. पण, त्यांनी मला अरेरावी केली", असा आरोप खोसकर यांनी केला.
"आता मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. त्यांनी आमच्यासमोर अधिकाऱ्याला फोन करून सांगितलं की, पावसाळा आहे, थांबवा. कायम करा. साडेतीनशे कुटुंबांना न्याय मिळाला आहे."
हेही वाचा >> काँग्रेसचा आणखी एक आमदार भाजपच्या वाटेवर?
क्रॉस व्होटिंग केल्याचे आरोप तुमच्यावर झाले आहेत. अशात तुम्ही मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली. खोसकर म्हणाले, "हे लोकच मुख्यमंत्री आहे. ते असले तर आम्ही निवडून येऊ. नाहीतर कोण विचारेल? जनतेसाठी कुठेही डोकं घालावं लागतं. सत्तेतल्या कुठेतरी जावंच लागत ना? हे खाते मुख्यमंत्र्यांकडे आहे", असे उत्तर आमदार हिरामण खोसकर यांनी दिले.
ADVERTISEMENT
