Jitesh Antapurkar : काँग्रेसचा आणखी एक आमदार भाजपच्या वाटेवर?

मुंबई तक

• 01:11 PM • 22 Jul 2024

Jitesh Antapurkar Ashok Chavan : विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले. त्यात एक नाव जितेश अंतापूरकर यांचेही आहे. 

जितेश अंतापूरकर आणि अशोक चव्हाण यांच्यात झालेल्या भेटीचे वेगळे अर्थ काढले जात आहेत.

काँग्रेसचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी अशोक चव्हाण यांची भेट घेतली.

follow google news

बातम्या हायलाइट

point

आमदार जितेश अंतापूरकर यांनी अशोक चव्हाणांची भेट घेतली

point

क्रॉस व्होटिंग करणाऱ्या काँग्रेस आमदारांच्या नावांमध्ये अंतापूरकर यांचे नाव असल्याची चर्चा

point

अशोक चव्हाणांची भेट घेतल्याने अंतापूरकर भाजपमध्ये जाण्याच्या चर्चेला फुटले तोंड

Congress MLA : विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसला मोठा झटका बसला. काँग्रेसच्या सात आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले. ज्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले, त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. मात्र, त्यांची नावे काँग्रेसकडून अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. क्रॉस व्होटिंग केल्याच्या प्रकरणात काँग्रेसच्या ज्या आमदारांची नावे चर्चेत आहेत. त्यात जितेश अंतापूरकर यांच्याबद्दलही चर्चा होत आहेत. अंतापूरकर यांनी आता भाजपचे नेते अशोक चव्हाण यांची भेट घेतल्याने काँग्रेसचा आणखी एक आमदार फुटणार असल्याच्या चर्चेला तोंड फुटले आहे. (Congress MLA Jitesh Antapurkar meets Ashok Chavan)

हे वाचलं का?

लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजपमध्ये गेलेल्या अशोक चव्हाण यांची नांदेड जिल्ह्यातील देगलूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी भेट घेतली. या भेटीने राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहे.

हेही वाचा >> "शरद पवार कोण आहेत, हे एकदा ठरवा", सुळेंचा शाहांवर हल्ला 

जितेश अंतापूरकर अशोक चव्हाणांचे निकटवर्तीय

देगलूरचे आमदार जितेश अंतापूरकर यांना अशोक चव्हाणांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाते. चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसचे काही आमदार त्यांच्यासोबत जातील अशी चर्चा रंगली होती. त्यात अंतापूरकर यांच्या नावाचीही चर्चा होती.

हेही वाचा >> ठाकरे-पवारांवर शाहांचा सर्वात मोठा हल्ला! भाजपची विधानसभेची ‘लाईन’ ठरली? 

पक्षांतरबंदी कायद्यामुळे अशोक चव्हाण समर्थक आमदारांनी भाजप प्रवेश करणे टाळले आणि आमदारकी टिकवण्यासाठी ते काँग्रेसमध्येच राहिले. पण, विधान परिषद निवडणुकीत पक्षाने दिलेल्या आदेशाचे काही आमदारांनी उल्लंघन केले. त्यांच्यावर आता कारवाई केली जाणार आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी तसे स्पष्ट केले आहे. 

आमदार अंतापूरकरांची भेट ठरली चर्चेचा विषय

विधान निवडणुकीत क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांवर कारवाई करण्यासंदर्भातील अहवाल महाराष्ट्र काँग्रेसने दिल्लीला पाठवण्यात आला आहे. त्यांच्यावर लवकरच कारवाई होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे क्रॉस व्होटिंग केलेल्या आमदारांची चिंता वाढली आहे. त्यातच जितेश अंतापूरकर यांनी अशोक चव्हाण यांची भेट घेतल्याने नवी चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात सुरू झाली आहे. 

    follow whatsapp