देवीची खोटी शपथ अन् 2019 सालची बेईमानी, फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

मुंबई तक

13 Jul 2023 (अपडेटेड: 13 Jul 2023, 04:19 PM)

उद्धव ठाकरे यांनी मोदींचे फोटो लावून मत मागितली आणि कॉ्ग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेले. खऱ्या अर्थाने 2019 साली उद्धव ठाकरे यांनी बेईमानी करून पाठीत खंजीर खुपसला आहे. असा हल्लाबोल उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.

dcm devendra fadnavis criticized udhhav thackeray maharashtra politics

dcm devendra fadnavis criticized udhhav thackeray maharashtra politics

follow google news

उद्धव ठाकरे यांनी मोदींचे फोटो लावून मत मागितली आणि कॉ्ग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेले. खऱ्या अर्थाने 2019 साली उद्धव ठाकरे यांनी बेईमानी करून पाठीत खंजीर खुपसला, असा हल्लाबोल उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे. हा दगा हा खंजीर देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत नव्हता, फडणवीस फक्त निमित्त होते, खरं तर हा खंजीर भाजपच्या पाठीत खुपसला होता. हा खंजीर उत्तमरावांपासून गोपीनाथरावांपर्यंत प्रत्येक कार्यकर्त्यांच्या पाठीत खुपसलेला खंजीर होता,अशी गंभीर टीका फडणवीस यांनी ठाकरेंवर केली आहे. (dcm devendra fadnavis criticized udhhav thackeray maharashtra politics)

हे वाचलं का?

काही लोक खोट्या शपथा देखील घेऊ लागले आहेत. किमान पोहरादेवीला जाऊन त्याठिकाणी खोटी शपथ घेताना, त्यांनी मनात माफी मांगितली असेल.राजकारणासाठी मला खोटी शपथ घ्यायची आहे, त्यामुळे मला माफ कर आणि निश्चित देवी त्यांना माफ करेल, असा टोला फडणवीसांनी ठाकरेंना लगावला.2019 साली भाजपला आणि शिवसेनेला पुर्ण बहूमत आले. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी मोदींचे फोटो लावून मत मागितली आणि नंतर ते कॉ्ग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेले. खऱ्या अर्थाने 2019 साली उद्धव ठाकरे यांनी बेईमानी करून पाठीत खंजीर खुपसला, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. तसेच हा खंजीर देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत नव्हता, तर फडणवीस हे निमित्त होतं, खर तर हा खंजीर भाजपच्या पाठीत खुपसला होता. हा खंजीर उत्तमरावांपासून गोपीनाथरावांपर्यंत प्रत्येक कार्यकर्त्यांच्या पाठीत खुपसलेला खंजीर होता,अशी टीका देखील फडणवीस यांनी ठाकरेंवर केली.

हे ही वाचा : ‘अमित शाह म्हणालेले, अपमान सहन करा पण…’, मातोश्रीतील ‘त्या’ बैठकीवर फडणवीसांचे गौप्यस्फोट

2019 सालचा युतीचा किस्सा…

देवेंद्र फडणवीस यांनी या सभेत 2019 साली शिवसेनेबरोबर होणाऱ्या युतीच्या चर्चेदरम्यान झालेला संपूर्ण किस्सा सांगितला. 2019 साली भाजप शिवसेनेची युती अंतिम टप्प्यात होती. त्यावेळी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद हवं होतं. यासंदर्भात त्यांचे अमित शहा यांच्याशी फोनवर बोलणे झाले होते. त्यानंतर रात्री 1 वाजता मी अमित शहा यांच्याशी बोललो. शिवसेनेला मुख्यमंत्रीपद हव असल्याचे मी त्यांना सांगितले. यावेळी अमित शहा यांनी स्पष्टच सांगितले, ”मुख्यमंत्री पदाच्या संदर्भात वर्षानुवर्ष आपला फॉर्म्युला ठरलाय”. ”त्यामुळे या संदर्भात काहीच कॉ़म्प्रोमाईज होणार नाही”. ”तुम्हाला मंत्रीपद किंवा खाती पाहिजे असतील तर ती आम्ही देऊ”. ”पण मुख्यमंत्री भाजपचेच असेल आणि असे होत नसेल तर युती थांबवा”, असे शहा यांनी सांगितल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

अमित शहा यांच्याशी फोनवर चर्चा झाल्यानंतर त्यांचा निर्णय मी उद्धव ठाकरेंना सांगितला. मुख्यमंत्री पद देता येणार नाही असे मी ठाकरेंना म्हणालो. यावर उद्धव ठाकरे यांनी युती करणे कठीण असल्याचे म्हणत आम्ही चर्चा थांबली. आणि आम्ही आपआपल्या घरी निघालो. यानंतर एका मध्यस्थाद्वारे उध्दव ठाकरे यांनी पुन्हा बोलायची इच्छा व्यक्त करत मुख्यमंत्रीपदाचा आग्रह सोडला असल्याचे म्हटले.

पत्रकार परीषदेची रंगीत तालीम

आता उद्धव ठाकरेंना पालघरची जागा हवी होती. त्यावेळी देखील ठाकरेंनी धोकाच दिला होता. कारण पालघऱमध्ये भाजपचा खासदार वारल्यानंतर त्यांच्याच कुटुंबातील मुलाला शिवसेनेने उमेदवारी दिली होती. त्यावेळी एखाद्या जागेकरता युती तोडणे शक्य नाही आहे. तुम्ही पालघरची जागा द्या, असे आमचे ठरले आणि आम्ही एक बैठक घेतली. या बैठकीतच मुख्यमंत्री पदाचा विषय संपला आणि पालघरची एक जागा खासदारासहीत शिवसेनेला दिली आणि आमची युती झाली असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

हे ही वाचा : BJP: अजित पवारांना सोबत घेण्याचा निर्णय चुकला?, ‘हा’ सर्व्हे भाजपसाठी धोक्याची घंटा

फडणवीस पुढे म्हणतात, उद्धव जी ज्या बाळासाहेबांच्या खोलीबाबत वारंवार सांगतात. त्याच खोलीत अमित शाह, उद्धव ठाकरे आणि मी बसलो होतो. यावेळी पत्रकार परीषदेत काय बोलायचं याची एक रंगीत तालीम देखील झाली. त्यावेळी खोलीत रश्मी वहिनी यांची एन्ट्री झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी वहिनींसमोरही बोलून दाखवयाला सांगितले.आणि मी ते बोलून देखील दाखवलं,असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.उद्धव ठाकरे यांचे त्यावेळी शब्द होते.’मी खुप टोकाचं बोललो आहे, त्यामुळे युटर्न घेतो’. अशा गोष्टी सांगायचा नसतात. पण ती वेळ आलीय,असे देखील फडणवीस म्हणाले आहेत.

दरम्यान यानंतर प्रत्येक सभेमध्ये अमित शाह, उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात निवडणूक लढल्याचे म्हटले होते. पण जशी निवडणूक झाली आणि नंबर गेम झाला. त्यावेळी पुन्हा ठाकरेंनी आम्हाला मुख्यमंत्री पद हवंय आणि आमचे दरवाजे उघडे असल्याचे जाहीर केले होते, असे फडणवीस म्हणाले.

    follow whatsapp