Deepak Kesarkar: राज्यातील राजकारणात प्रचंड वेगाने घडामोडी घडत असतानाच आमदार, खासदार (MLA and MP) आणि मंत्र्यांच्या विधानामुळेही राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. एकीकडे अपात्र आमदारांचा विषयाने गती घेतलेली असतानाच शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (School Education Minister) यांनी एक धक्कादायक विधान केले आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. मंत्री दीपक केसरकर कोल्हापूर दौऱ्यावर असताना त्यांनी सांगितले की, जेव्हा या विभागाचा पदभार स्वीकारला तेव्हा तुम्हाला आम्ही वर्षाला 25 कोटी (25 corer) रुपये देतो असे सांगत काही एजंट (Agent) माझ्याजवळ आले होते असा खळबळ जनक विधान त्यांनी केले आहे. त्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. (deepak kesarkar sensational statement offered 25 crores Criticism schools permission agents)
ADVERTISEMENT
एजंटबरोबर डिलिंग
दीपक केसरकर यांनी एजंटांच्या 25 कोटीचे वक्तव्य केले असले तरी त्याआधी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारचेच एजंट मंत्रालयाजवळ फिरत असल्याचा आरोप केला होता. त्या कंत्राटदार आणि एजंटबरोबर डिलिंग होत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला होता. दलालीसाठी शिंदे सरकार काम करत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला होता. त्यांच्या या आरोपालाच त्यांनी हे अशा प्रकारचे खरमरीत उत्तर दिले आहे.
हे ही वाचा >> Mumbai Tak Chavadi: ‘विधानपरिषदेचा फॉर्म भरलेला, शेवटच्या क्षणी सांगितलं आता…’, पंकजा मुंडेंचा गौप्यस्फोट
विरोधकांना खरमरीत उत्तर
नाना पटोले यांनी सरकारवर गंभीर आरोप केल्यानंतर दीपक केसरकर यांनीही खळबळजनक वक्तव्य करुन अनेकांना धक्का दिला आहे. विरोधकांनी टीका करताच त्यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. दीपक केसरकर म्हणाले की, मी जेव्हा माझ्या डिपार्टमेंटचा कार्यभार सांभाळला त्यावेळला माझ्याकडे असेच एजंट लोक आले होते. आम्ही तुम्हाला वर्षाला 25 कोटी रुपये देतो. मात्र तसे न करता तुम्ही ज्या शाळांना परवानगी देता त्यावर आम्ही सह्या करतो. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जाहीर कार्यक्रम करतो.
जनतेसाठी काम
फाईल आणि गुलाबाचं फुलं देतो. मात्र हे असे कोट्यवधी रूपये कुणाला नको असतात असे बिल्कुल नाही. परंतु ही आमची काम करायची पद्धत नाही. आमची काम करायची पद्धत जनतेसाठी काम करायची पद्धत आहे, त्यानंतर त्यावेळा मी ती ऑफर स्वीकारली असती. तसेच ॲडमिशनसाठी तशी ऑफरही आली होती.
हे ही वाचा >> Mulund : ‘दिल्लीश्वर नाराज होतील म्हणून…’, आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर हल्ला
कारवाईचा बडगा
महाराष्ट्राच्या राजधानी मध्ये आम्ही काम करतो मुंबई ही मायानगरी आहे. मुंबई हे कमर्शियल भारताचं कॅपिटल आहे. म्हणून ते आमच्याशी संबंधित असतात, असं समजू नका, कुठल्याही एजंटला कोणीही बळी पडू नका, त्या एजंटांचे काय करायचे, त्याच्यासाठी आम्ही समर्थ आहोत तुम्ही फक्त आम्हाला नाव द्या हे लोक असं करतात म्हणून सांगा आम्ही त्यांच्यावर कारवाई करतो असं अश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
ADVERTISEMENT