‘मी साधुसंत नाही, तर…’, ठाकरेंचा उल्लेख, देवेंद्र फडणवीसांनी काय सांगितलं?

मुंबई तक

02 Jul 2023 (अपडेटेड: 02 Jul 2023, 03:46 AM)

उपमुख्यमंत्री तथा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. उद्धव ठाकरेंनी धोका दिल्याने प्रत्युत्तर द्यावे लागले, असे ते म्हणाले.

Devendra Fadnavis attacks on Uddhav Thackeray over the break alliance with bjp.

Devendra Fadnavis attacks on Uddhav Thackeray over the break alliance with bjp.

follow google news

Devendra Fadnavis vs Uddhav Thackeray : ‘मी वैयक्तिक पातळीवर कायमच नैतिकता ठेवून राजकारण करण्याचा प्रयत्न करतो. पण, राजकारण करताना जिवंत राहिलो, तर नैतिकता ठेवता येते”, असं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या काही महिन्यांत झालेल्या राजकारणाबद्दल रोखठोक भूमिका मांडलीये. लोकसत्ता दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले. (Devendra Fadnavis says Uddhav Thackeray backstab to him)

हे वाचलं का?

“मी 80 ते 90 टक्के नैतिकतेनेचे राजकारण केले आहे. आदर्शवादी बनून कोणी पाठीत वार केला, तर काय करणार? जनतेने निवडून देऊनही उद्धव ठाकरे चुकीचे वागले. मी साधुसंत नाही, राजकारणी नाही आहे. कोणी असे वागले, तर त्याला प्रत्युत्तर द्यावेच लागते. पण काँग्रेस, एमआयएम यांच्या विचारधारांबरोबर आम्ही जाऊ शकणार नाही”, असं म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना काँग्रेससोबत केलेल्या हातमिळवणीवरून अप्रत्यक्षपणे टोला लगावला.

माझ्यावरच अन्याय झाला…

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाबद्दल बोलताना फडणवीसांनी चिमटा काढला. ते म्हणाले, “उद्धव ठाकरेंना सुरुवातीला जनतेची सहानुभूती होती. पण, आता ती जात आहे. ते कार्यकर्त्यांना व नेत्यांनाही भेटत नाहीत. त्यांच्यावर नाही, माझ्यावरच अन्याय झाला आहे.”

पुढचा मुख्यमंत्री भाजप ठरवेल

राज्यात 2024 च्या विधानसभा निवडणुकीची जोरात तयारी सुरू झाली आहे. विविध राजकीय पक्षांकडून स्थानिक पातळीवर पक्ष विस्तार आणि मतदारसंघांची बांधणी केली जात आहे. त्यातच पुन्हा भाजप-शिवसेना युतीच्या सरकारला जनादेश मिळाला तर मुख्यमंत्री कोण असेल? असा प्रश्न भाजप-शिवसेना युतीच्या राज्यातील नेतृत्वाला केला जात आहे.

वाचा >> Pasmanda Muslim: ‘या’ मुस्लिम मतांवर BJP चा डोळा का? PM मोदींची रणनीती नेमकी काय?

अनेकदा यावर दोन्हींकडील नेते बोलणं टाळत असतात, मात्र देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल महत्त्वाचं विधान या मुलाखतीत केलं आहे. ते म्हणाले, “मुख्यमंत्री नेते असतात. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या जातील. 2024 नंतर मुख्यमंत्रीपद कुणाला मिळणार, हे आमच्या पक्षात संसदीय मंडळाकडून ठरवलं जाते.”

अमृता फडणवीस प्रकरण माझ्यावर दबाब आणण्यासाठी…

गेल्या आठवड्यात उद्धव ठाकरेंनी अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरणाचा उल्लेख न करता देवेंद्र फडणवीसांवर घरापर्यंत येऊ नका अशी टीका केली होती. यावर बोलताना फडणवीस म्हणाले, “माझी पत्नी अमृता फडणवीस हिला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न झाला. त्या बुकीविरोधातील गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया आधीच्या सरकारच्या काळात सुरू झाली होती.”

वाचा >> Narendra Modi Speech : उद्धव ठाकरेंसाठी भाजपचे दरवाजे अजूनही खुले आहेत?

“सरकार बदलल्यावर माझ्यावर दबाव आणण्यासाठी हे षडयंत्र आखले गेले. एका बॅगेत पैसे भरल्याची व तशीच दुसरी बॅग आमच्या घरातील कामवाल्या बाईला देण्याची चित्रफित तयार केली गेली. न्यायवैद्यक तपासणीत दोन्ही बॅगा वेगवेगळ्या असल्याचे समोर आले. मी कोणतीही तडजोड न करता पोलिसांकडे तक्रार केली आणि फरार गुन्हेगाराला अटक झाली. त्या प्रकरणात तथ्य असते, तर मला कुणी सोडले नसते”, असं देवेंद्र फडणवीस या प्रकरणावर बोलताना म्हणाले.

    follow whatsapp