Devendra Fadnavis : ''युतीमध्ये तडजोड करावी लागते'', फडणवीस असं का म्हणाले?

Devendra Fadnavis News : आपण एक नाही आहोत असा नरेटिव्ह तयार केला जातो आहे. या नरेटिव्हला दुदैवाने आपणच बळ देतोय. आपणच हिडविकेटे, रनआऊट होतोय, असे देखील फडवणीस यांनी सांगितले आहे.

आपलेच प्रवक्ते एकमेकांच्या विरोधात काय काय बोलतात.

devendra fadnavis big statement every alliance party comprise seat sharing mahayuti meeting

सौरभ वक्तानिया

• 10:58 PM • 06 Jul 2024

follow google news

बातम्या हायलाइट

point

आपलाच अनेकवेळा आपापसात विसंवाद दिसतो.

point

आपलेच प्रवक्ते एकमेकांच्या विरोधात काय काय बोलतात.

point

आपण एक नाही आहोत असा नरेटिव्ह तयार केला जातो आहे.

Devendra Fadnavis News : 'प्रत्येकाच्याच आशा आकांक्षा असतात. पण अशा आकांक्षा असल्या तरी युतीमध्ये प्रत्येक पक्षाला तडजोड करावीच लागते. तडजोड करण्याची भूमिका असेल तेव्हाच युती टिकते, तडजोडची भूमिका नसेल तेव्हा युती टिकणार नाही', असा कानमंत्र देवेंद्र फडवीसांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांना दिला आहे.  (devendra fadnavis big statement every alliance party comprise seat sharing mahayuti meeting) 

हे वाचलं का?

 महायुतीची षण्मुखानंदमध्ये शासकीय योजना, अंमलबजावणी संदर्भात बैठक पार पडली आहे. या बैठकीतून देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'आपण महायुतीत एकत्र आहोत, पण आपलाच अनेकवेळा आपापसात विसंवाद दिसतो. आपलेच प्रवक्ते एकमेकांच्या विरोधात काय काय बोलतात. हे बंद केले पाहिजे. आणि कुणाला जर बोलायची खुमखुमी आली, तर पहिल्यांदा आपल्या नेत्याला विचारा, मला खुमखुमी आली आहे, मी हे बोलू का? नेत्यांनी हो म्हटलं की तुमची खुमखुमी पुर्ण करा', असा सल्ला देखील फडणवीसांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. 

हे ही वाचा : मुंबईत 1 कोटीचा फ्लॅट, ऑडी कार..., अट्टल चोराची लाईफस्टाईल पाहून पोलीस थक्क!

दरम्यान आपण एक नाही आहोत असा नरेटिव्ह तयार केला जातो आहे. या नरेटिव्हला दुदैवाने आपणच बळ देतोय. आपणच हिडविकेटे, रनआऊट होतोय, असे देखील फडवणीस यांनी सांगितले आहे.

तिकिट वाटपावर बोलताना फडणवीस म्हणाले की,  तिकीट वाटप कसं करायचंय, कुणाला कुठल्या जागा द्यायच्या आहेत. याबाबत सगळ्यांच्या सल्ल्याने त्याचा निर्णय करू. 

शेवटी आपण जेव्हा युतीमध्ये असतो, तेव्हा सगळ्यांच्या आशा आकांक्षा असतात. आशा आकाक्षा असल्या तरी युतीमध्ये प्रत्येक पक्षाला त़डजोड करावी लागते. तडजोड करण्याची भूमिका असेल तेव्हाच युती टिकते. तडजोडची भूमिका नसेल तेव्हा युती टिकणार नाही. आपण शेकचिंली सारखं ज्या झाडावर बसलो तीच फांदी कापायला बसलो तर शेवटी शेकचिल्ली जे झालं तेच आपलं होईल, असे देखील फडणवीस यांनी सांगितले. 

    follow whatsapp