Fadnavis Thackeray : "उद्धवजींचा डोक्यावरचा ताबा...", फडणवीसांनी सोडला बाण

मुंबई तक

• 03:39 PM • 03 Aug 2024

Devendra Fadnavis Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी ढेकणांना आव्हान देत नाही म्हणत देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. त्याला फडणवीसांनी उत्तर दिले. 

उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस.

देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे.

follow google news

बातम्या हायलाइट

point

उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीसांचं उत्तर

point

ठाकरेंच्या भाषणावर फडणवीस काय बोलले?

Uddhav Thackeray Devendra fadnavis : विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय हल्ले प्रतिहल्ले तीव्र होऊ लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून भाजपचे नेते आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जोरदार कलगीतुरा रंगला आहे. शनिवारी उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केले. त्यावर फडणवीसांकडूनही लगेच पलटवार करण्यात आला. त्यामुळे हा राजकीय संघर्ष आणखी भडकला आहे. (Devendra Fadnavis First Reaction on Uddhav Thackeray Statement)

हे वाचलं का?

उद्धव ठाकरेंना फडणवीसांनी काय दिले उत्तर?

देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंना तिखट शब्दात उत्तर दिले. देवेंद्र फडणवीस काय म्हणाले पहा...

हेही वाचा >> यशश्रीची ज्या कोयत्याने केली हत्या, तो कुठे सापडला? Inside Story

"उद्धवजींचा डोक्यावरचा ताबा सुटलेला आहे. ते अत्यंत वैफल्यग्रस्त आहेत. वैफल्यग्रस्त होऊन ते ज्या प्रकारचे शब्द वापरत आहेत, मला असं वाटत की, यावर काय उत्तर आपण देणार? जेव्हा एखादा व्यक्ती अशा प्रकारच्या नैराश्यात डोकं बिघडल्यासारखा बोलतो, तेव्हा त्याला फार उत्तर द्यायचं नसतं. पण, हे भाषण करून जे अमित शाहांनी सांगितलं होतं औरंगजेब फॅन क्लब... आपण औरंगजेब फॅन क्लबचेच आहोत, हे उद्धव ठाकरेंनी दाखवून दिलं." 

उद्धव ठाकरेंचे विधान काय?

पुण्यात झालेल्या शिवसंकल्प मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजपला लक्ष्य केले. ठाकरे म्हणाले की, "मी मुंबईतील शिवसैनिकांसमोर बोललो की, एकतर तू राहशील किंवा मी राहीन. इकडे माझ्या पायाजवळ कलिंगड ठेवलं आहे."

हेही वाचा >> "वाझेला हाताशी धरून फडणवीस...", हायकोर्टाचा निकाल दाखवत देशमुखांचा गंभीर आरोप

"काही जणांना वाटलं मी त्यांना आव्हान दिलं. मी कोणत्याही ढेकणाला आव्हान देत नाही. मी म्हणजे कोण आणि तू म्हणजे कोण, हे समजून घेतलं पाहिजे. ढेकणांना कधी आव्हान नाही देत. ढेकणांना पायाने चिरडायचे असते."

"कुणाला तरी (देवेंद्र फडणवीस) वाटलं की मी त्यांनाच बोललोय. त्याने सांगितलं की, माझ्या नादाला लागू नका. अरे नादाला लागण्याच्या कुवतीचा तू नाहीस", अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती. 

    follow whatsapp