बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याच्या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडाली. संतोष देशमुख यांना अतिशय अमानूषपणे मारहणार करुन त्यांना संपवण्यात आलं. मात्र, आता ही घटना ताजी असतानाच आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धाराशिवमध्येही तुळजापूर तालुक्यातील जवळगा गावच्या सरपंचाच्या हत्येचा प्रयत्न झाला आहे. विशेष म्हणजे इथेही पवनचक्कीशी संबंधीत वादाचाच संबंध आहे. सरपंच नामदेव निकम यांच्यावर गुरूवारी रात्री हल्ला करत त्यांना पेट्रोलने जाळण्याचा प्रयत्न झाला आहे.
ADVERTISEMENT
पवनचक्कीच्या वादातून नामदेव निकम यांच्यावर हा हल्ला झाल्याची माहिती आहे. धाराशिवमधील बारूळ गावाजवळ काही लोकांनी त्यांच्या वाहनाच्या काचा फोडल्या. त्यानंतर त्यांच्यावर थेट पेट्रोल टाकून हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
हे ही वाचा >> Exclusive: 'धनू भाऊ दिसत असून आंधळं झाला का? तुमचं 54 हजार फुटावरचं विमान जरा...', सुरेश धस तुफान बरसले
हल्ला कसा झाला?
सरपंच नामदेव निकम कसेबसे या हल्ल्यातून वाचले. या घटनेबद्दल त्यांनी स्वत: माहिती दिली आणि आपबीती सांगितली. ते म्हणाले रात्री आम्ही जात बारूळ गावाजवळून जात असताना दोन दुचाकी आमच्या गाडीच्या दोन्ही बाजूंनी आल्या. त्यावेळी आम्ही कुणाला साईड द्यायची हे लक्षात येत नसल्यानं गाडीचा वेग कमी केला. गाडी स्लो होताच दोन्हीकडून काचा फोडण्यात आल्या आणि थेट पेट्रोलने भरलेले फुगे गाडीत फेकण्यात आले. मग आम्ही वेग वाढवला, पण त्यांनी पुन्हा आंडे फेकून मारले. तेव्हा आमच्या गाडीचा वेग कमी झाला आणि हल्लेखोरांनी थेट गाडी पेटवण्याचा प्रयत्न झाला. हे असं जर सुरू असेल तर महाराष्ट्राचं कसं व्हायचं असा सवालही निकम यांनी उपस्थित केला.
हे ही वाचा >>Pune Crime News : पुण्यात दोन चिमुकल्या बहिणींचा खून, पाण्याच्या टाकीत सापडले मृतदेह, नागरिकांचा संताप
दरम्यान, निकम यांना पोलीस संरक्षणाची मागणी करणार का असं विचारल्यावर त्यांनी संरक्षण मिळालं तर चांगलंच होईल असं म्हटलं. अन्यथा आम्ही जनतेची कामं करणार कशी असा सवालही उपस्थित केला. निकम म्हणाले, दिवसभर गावात लाईट नव्हती, त्यामुळे लाईटचं काम बघायला आम्ही गेलो होते, त्यावेळीच ही घटना घडली. दरम्यान, पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून, या प्रकरणाच्या तपासात काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं आहे.
ADVERTISEMENT
