Maharashtra MLC Election : 11 जागांसाठी निवडणूक जाहीर, ठाकरे-पवारांची विधानसभेपूर्वी 'परीक्षा'?

मुंबई तक

18 Jun 2024 (अपडेटेड: 18 Jun 2024, 03:50 PM)

Maharashtra Legislative Council Election 2024 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या ११ जागा रिक्त होत असून, त्यासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.

विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. ठाकरे पवारांचे आमदार कमी असल्याने त्यांना जागा राखता येणार का?

follow google news

Maharashtra MlC Election 2024 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या ११ जागा रिक्त होत असून, त्यासाठी निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. विधान परिषदेच्या 11 जागांच्या निवडणुकीत विधानसभेचे आमदार मतदान करतात. सध्यस्थितीत महायुतीकडे आमदारांची संख्या मोठी आहे. दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार कमी आहेत, त्यामुळे जागा राखता येणार का? त्यामुळे या निवडणुकीत कुरघोड्या होण्याची चिन्हे आहेत. (ECI announces elections for 11 seats in Maharashtra Legislative Council)

हे वाचलं का?

विधान परिषदेच्या विधानसभेतून निवडून द्यायच्या ११ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फाटाफूट झाल्याने उमेदवार निवडून आणण्यासाठी मतांची जुळवा जुळव करण्याचे आव्हान असणार आहे. महत्त्वाचे म्हणजे जागा राखताना ठाकरे-पवारांचा कस लागणार आहे.

या आमदारांचा संपतोय कार्यकाळ

डॉ. मनीषा कायंदे

विजय गिरकर

अब्दुलाह खान दुराणी

निलय नाईक

अनिल परब

रमेश पाटील

रामराव पाटील

वजाहत मिर्झा

प्रज्ञा सातव

महादेव जानकर

जयंत पाटील

विधान परिषदेतील या ११ आमदारांचा कार्यकाळ २७ जुलै रोजी संपत आहे.

हेही वाचा >> 5 कारणे... ज्यामुळे राहुल गांधींनी वायनाडऐवजी रायबरेली निवडली

विधान परिषद निवडणूक कार्यक्रम

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २ जूलै आहे. अर्ज मागे घेण्याची तारीख ५ जुलै असून, १२ जुलै रोजी मतदान होणार आहे. सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होणार असून, १२ जुलै रोजीच सायंकाळी ५ वाजता निकाल जाहीर केला जाणार आहे. 

विधान परिषद निवडणुकीत किती असणार मतांचा कोटा?

कसे आहे राजकीय चित्र?

11 जागा रिक्त होत असून, ५ जागा निवडून आणण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. दुसरीकडे शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादीही दोन जागा निवडून आणण्याच्या प्रयत्नात आहे. आमदारांचे संख्याबळ बघता महायुतीकडून 9 जागा जिंकण्याचे प्रयत्न होऊ शकतात.

हेही वाचा >> Alka Yagnik यांना व्हायरल अटॅकमुळे बहिरेपणा, सेंसरी नर्व हियरिंग लॉस आजार काय? 

ठाकरे-पवार काय करणार?

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाकडे दोन्ही संख्याबळ कमी आहे. मात्र, दोन्ही पक्षानी एकच उमेदवार दिला, तर निवडून येऊ शकतो.  असं असलं तरी ठाकरे-पवारांची रणनीती काय असणार आणि महाविकास आघाडीकडून किती उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न होणार, हेही महत्त्वाचं आहे. 

    follow whatsapp