Amit Shah : ''शरद पवार भ्रष्टाचाराचे सरदार मग अजितदादा कोण?'', शिंदेंचा नेता 'हे' काय बोलून गेला?

मुंबई तक

22 Jul 2024 (अपडेटेड: 22 Jul 2024, 09:43 PM)

Amit Shah News : शिंदेंच्या आमदारने शरद पवार (Sharad Pawar) भ्रष्टाचाराचे सरदार आहेत तर अजित पवार (Ajit pawar) कोण? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. या विधानाची आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

eknath shinde mla bachhu kadu reaction on amit shah criticize sharad pawar biggest curruption kingpin maharashtra politics

या वादात आता शिंदेंच्या नेत्याने उडी घेतली आहे.

follow google news

बातम्या हायलाइट

point

पवारांवरील टीकेच्या वादात शिंदेंच्या नेत्याची उडी

point

बच्चू कडूंची अमित शाहांनी पवारांवर केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया

point

बच्चू कडू नेमकं काय म्हणाले?

Bachhu Kadu On Sharad Pawar : धनंजय साबळे, अमरावती :   केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी रविवारी शरद पवारांवर भ्रष्टाचाराचे सरदार अशी टीका केली होती. या टीकेवर आता शरद पवार गटासह अजित पवार गटाकडूनही प्रतिक्रिया येत आहेत. त्यामुळे मोठा वाद पेटला आहे. या वादात आता शिंदेंच्या नेत्याने उडी घेतली आहे. शिंदेंच्या आमदारने शरद पवार (Sharad Pawar) भ्रष्टाचाराचे सरदार आहेत तर अजित पवार (Ajit pawar) कोण? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. (eknath shinde mla bachhu kadu reaction on amit shah criticize sharad pawar biggest curruption kingpin maharashtra politics)  

हे वाचलं का?

शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू माध्यमांशी बोलत होते. यावेळी बच्चू कडू यांनी अमित शाह यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया दिली होती. यावेळी शरद पवार भ्रष्टाचाराचे सरदार असतील तर लोक विचारतील शरद पवार यांचे पुतणे अजितदादा पवार कोण? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच अमित शहा हे चुकून बोलले असावेत, कदाचित ते विसरभोळे झाले असतील, असे देखील बच्चू कडू म्हणाले आहेत.

हे ही वाचा : Pink Rickshaw Yojana : 'लाडकी बहीण' नंतर महिलांसाठी आणखी एक योजना, काय आहे पिंक रिक्षा योजना?

अमित शाहा काय म्हणाले? 

शरद पवार हे देशातील भ्रष्टाचाराचे सूत्रधार आहेत. त्यांनी देशात भ्रष्टाचाराच्या संस्था तयार केल्या'', अशी जोरदार टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा (Amit Shah) यांनी शरद पवारांवर केली आहे.पुण्यात आयोजित भाजप पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात अमित शाहा बोलत होते. 

जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात भाजपचं सरकार येते, तेव्हा तेव्हा मराठा समाजाला आरक्षण मिळालं आहे. पण जेव्हा जेव्हा शरद पवारांचे सरकार आले, तेव्हा मराठा आरक्षण गायब झाले आहे'', अशी टीका शाहांनी पवारांवर केली. तसेच शरद पवारांचे सरकार आलं तर मराठा आरक्षण जाईल. मराठा आरक्षण कायम ठेवायचं असेल तर भाजप सरकार आलंच पाहिजे, असे विधान करून अमित शाहा यांनी मराठा समाजाला साद घालण्याचा प्रयत्न केला. 

हे ही वाचा : पिंपरीत Hit And Run चा थरार, भरधाव कारच्या धडकेत महिला हवेत उडाली अन्..., थरारक व्हिडिओ

'''मी शरद पवारांना विचारतो की त्यांनी महाराष्ट्राला काय दिले? त्यांनी केवळ खोटी आश्वासने दिली आहेत. त्यांच्या सरकारने 1 लाख 19 हजार कोटी दिले, तर गेल्या दहा वर्षात पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राला 10 लाख कोटी दिले. मी या 10 लाख कोटींमध्ये मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा समावेश केलेला नाही'', असा हल्ला देखील शरद पवारांनी पवारांवर चढवला. 
 

    follow whatsapp