Sanjay Shirsat, Mumbai Tak Chavadi : ठाकरे गटाचे नेते आणि शिंदे गटाचे नेते, या दोन्ही गटातील नेत्यांचा मातोश्रीवरील अनुभव वेगवेगळा राहिलेला आहे. याबाबतचा अनुभव सांगताना तुम्ही या नेत्यांना माध्यमांना प्रतिक्रिया देताना ऐकलं असेलच. पण आता मातोश्रीवरील आलेला अनुभव शिरसाट यांनी मुंबई तक चावडीवर सांगितला आहे. त्याचसोबत धर्मवीर 2 सिनेमाच्या एका सीनममध्ये संजय शिरसाट एका लेखकाला मातोश्रीवर घेऊन गेले होते. या दरम्यान मातोश्रीवर काय घडलेलं? हा संपूर्ण प्रसंग आता संजय शिरसाट यांनी सांगितला आहे. (eknath shinde mla sanjay shirsat tell the story behind the dharmveer 2 movie scene reach writer with varsha bunglow maharashtra politics mumbai tak chavadi)
ADVERTISEMENT
मुंबई तकच्या चावडीवर आज शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट उपस्थित होते. या चावडीवर अनेक मुद्यावर दिलखुलास भाष्य केले. तसेच धर्मवीरमध्ये दाखवण्यात आलेल्या त्या सीनचा संपूर्ण प्रसंग देखील त्यांनी सांगितला आहे. आता त्या लेखकाच नाव मला आठवत नाही पण ही घटना सत्य आहे. या घटनेबाबत संशस असेल तर मिलिंद नार्वेकरांना विचारा, त्यात एक जण दाखवला नाही ते अनिल देसाई होते, असे संजय शिरसाट म्हणाले आहेत. मी चार तास बाहेर थांबून निघालो. त्यानंतर वडाळ्यापर्यंत गेल्यावर मिलिंदचा फोन आला. संजय तू कुठे आहेस, मी बोललो, मी वडाळ्याला आहे. साहेबांनी आठवण काढली. मी गेलो तेव्हा उद्धव ठाकरे बंगल्याच्या आत चालले होते.अररे तू दोनच मिनिट लेट झालास, असे मला नार्वेकरने म्हटलं. अरे पण तुम्हाला पलटवता आलं असत ना, किती वेळ लागणार आहे. फक्त पलटायचं. काय शिरसाट काय म्हणत होता, आण ते पुस्तक आण. पण ते म्हणाले उशीर झाला 2 मिनिटं, असे संजय शिरसाट यांनी सांगितले.
हे ही वाचा : Harshavardhan Patil : ''सुप्रिया सुळेंच्या विजयात आमचा अदृष्य सहभाग'', हर्षवर्धन पाटलांचं मोठं विधान
या घटनेनंतर मी मिलिंद नार्वेकर आणि देसाईंना ठणकावून बोलला होतो.मातोश्री हे तुमचं वैयक्तिक घर आहे, पण वर्षा नाही तिथे कुणाला बोललायचं हा तुमचा अधिकार आहे. तुम्हाला हवं तर त्यांना चावडीवर बोलावून विचारा असे देखील संजय शिरसाटांनी सांगितलं.
हे ही वाचा : Arjun Khotkar : 'मुडदे पाडण्याच्या' विधानावर खोतकरांचा पलटवार, ''रावसाहेब दानवे काहीही...''
ADVERTISEMENT