Lok Sabha Election 2024: मोदीच येणार, पण…; नव्या ETG सर्व्हेने भाजपचं वाढलं टेन्शन!

हर्षदा परब

17 Aug 2023 (अपडेटेड: 17 Aug 2023, 02:34 PM)

Times Now Navbharat Survey 2023, NDA vs INDIA : देशात पुन्हा एनडीएचे सरकार येऊ शकते, असे कल नव्या सर्व्हेतून समोर आले आहे. त्याचबरोबर इंडिया आघाडीची मतांची टक्केवारी वाढू शकते, असंही हा कल म्हणतो.

Times Now Navbharat Survey, NDA vs INDIA : who will get more seats if lok sabha election conducted today. maha vikas aghadi will get only 15 to 19 seats.

Times Now Navbharat Survey, NDA vs INDIA : who will get more seats if lok sabha election conducted today. maha vikas aghadi will get only 15 to 19 seats.

follow google news

Lok Sabha Election 2024 Survey : विरोधकांच्या इंडिया आघाडीची लोकप्रियता वाढताना दिसत आहे. एका सर्व्हेतून समोर आलेल्या कलातून ही बाब समोर आली असून, यामुळे भाजपचं टेन्शन वाढलं आहे. आज लोकसभा निवडणुका झाल्या तर केंद्रात मोदीच पुन्हा सत्तेत येईल. मात्र, एनडीए आणि इंडिया आघाडीत अटीतटीची लढत होताना या आकडेवारीतून समोर आलं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात मात्र इंडिया आघाडीची पिछेहाट झाल्याचे कल आहेत.

हे वाचलं का?

ETG आणि टाइम्स नाऊ नवभारतने एक सर्व्हे केला असून, या सर्व्हेतून समोर आलेला कल भाजपच्या चिंतेत भर घालणारा आहे. देशात आज निवडणुका झाल्या, तर एनडीएचं सरकार पुन्हा येण्याचे कल आहेत, मात्र दुसरीकडे इंडिया आघाडीची ताकद वाढण्याचे कल आकडेवारीतून दिसत आहेत.

लोकसभा निवडणूक 2024 सर्व्हे : कुणाला किती टक्के मते?

सर्व्हेतील आकडेवारीनुसार आज निवडणुका झाल्या तर लोकसभेच्या 543 जागांपैकी एनडीएला 296-326 जागा मिळू शकतात. दुसरीकडे विरोधकांच्या इंडिया आघाडीला 160 ते 190 जागा मिळू शकतात. पण, सर्व्हेतून समोर आलेली मतदानाची टक्केवारी भाजपचं टेन्शन वाढवणारी आहे. एनडीएला 42 टक्के मते मिळू शकतात, असा निष्कर्ष आहे. तर इंडिया आघाडीला 40 टक्क्यांपर्यंत मते मिळू शकतात. म्हणजे इंडिया आघाडीची मतांची टक्केवारी वाढू शकते.

वाचा >> ‘बायको आत्महत्या करेल सांगून शिंदेंकडून घेतलं मंत्रिपद’, भरत गोगावलेंनी टाकला बॉम्ब

कुणाला किती जागा मिळू शकतात?

एनडीए > 296-326
इंडिया > 160-190
वायएसआर काँग्रेस > 24-25
बीआरएस > 9-11
बीजेडी > 12-14
इतर > 11-14

महाराष्ट्रात कुणाला किती जागा मिळू शकतात?

या सर्व्हेतून समोर आलेले अंदाज महाविकास आघाडीची चिंता वाढवणारे आहेत. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. पण, यात सर्वाधिक जागा एनडीए म्हणजेच महायुतीला मिळण्याचा कल आहे. लोकसभेच्या आज निवडणुका झाल्या, तर एनडीएला 28 ते 32 जागा मिळू शकतात, असे या सर्व्हेक्षणातील आकडेवारीत म्हटलं आहे.

वाचा >> NCP चा नेमका अध्यक्ष कोण? शरद पवारांकडे मागितले ‘पुरावे’, फक्त ‘एवढीच’ मुदत

आज निवडणुका झाल्या तर महाराष्ट्रात कसं असेल चित्र?

एनडीए (महायुती) > 28-32
इंडिया (मविआ) > 15-19
इतर >1-2

देशात इंडिया आघाडीच्या मतांची टक्केवारी आणि एनडीएची टक्केवारी यांच्या 2 टक्क्यांचंच अंतर सर्व्हेत दाखवलं गेलं आहे. त्यामुळे अनेक जागांवर दोन्ही आघाड्यांच्या उमेदवारांमध्ये अटीतटीची लढत होऊ शकते.

    follow whatsapp