Kamal Nath: येत्या काही दिवसात 2024 च्या लोकसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. मात्र त्याआधीच काँग्रेस पक्षात मात्र काहीही चांगलं होताना दिसून येत नाही. जागांबाबत जोरदार चर्चा चालू असतानाच काँग्रेसमधील अनेक जुने जाणते नेते मात्र काँग्रेसचा (Congress) हात सोडून जात आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन त्यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे. त्यानंतर आता मध्य प्रदेशचे (Madhya Pradesh) माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांच्यासह त्यांचा मुलगा नकुलनाथही आता भाजपच्या वाटेवर असल्याचे सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
...तरीही काँग्रेसकडून प्रयत्न नाही
लोकसभा निवडणुकीआधीच काँग्रेसला एक एक मोठे धक्के बसत आहेत. महाराष्ट्रानंतर आता मध्य प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री कमलनाथही भाजपच्या वाटेवर असल्याची चित्र गडद होत आहे. तरीही काँग्रेस नेतृत्वाकडून कमलनाथ यांच्याशी कोणताही संपर्क करण्यात साधण्यात आला नाही. त्यामुळे आता हे ही चित्र स्पष्ट झाले आहे की, ते जरी भाजपमध्ये जाणार असले तरी त्यांना थांबवण्यासाठी अजून कोणतेही प्रयत्न केले गेले नाहीत हे ही स्पष्ट झाले आहे.
मी स्वतः माहिती देईन
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ दिल्लीला पोहोचल्यानंतर त्यांनी त्यांनी काँग्रेस सोडण्याबाबत आपलं मौन सोडले. काँग्रेस सोडण्याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, असा काही प्रकार घडला तर त्याची माहिती आपण स्वतः देऊ असं त्यांनी सांगितले.
काँग्रेसचा लोगो हटवला
भाजपमध्ये प्रवेश करण्याबाबत कमलनाथ यांनी पत्रकारांना सांगितले की, असे काही घडले तर भाजपप्रवेशाबाबत मी स्वतःच तु्म्हाला सांगेन असं स्पष्टपणे सांगितले. तर दुसरीकडे, कमलनाथ यांचे सुपुत्र खासदार नकुलनाथ यांनी सोशल मीडियावरी त्यांच्या प्रोफाईवरून काँग्रेस पक्षाचाही लोगो हटवला आहे. तर मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह हे मात्र अजूनही असं समजतात की, 'कमलनाथ सोनिया गांधी आणि इंदिरा गांधी यांच्या कुटुंबियांना ते कधीच सोडू शकत नाहीत.'
इंदिरा गांधींचा तिसरा मुलगा
माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्याबद्दल बोलताना इंदिरा गांधी यांनी सांगितले होते, 'माझा तुम्ही तिसरा मुलगा आहात' असं म्हणत त्यांनी लोकांना तुम्ही कमलनाथ यांना मत द्या असं आवाहन त्यांनी केली होती. कमलनाथ यांचा जन्म 18 नोव्हेंबर 1946 रोजी उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये झाला. मात्र त्यांनी मध्य प्रदेशातून राजकीय इनिंगला सुरुवात केली.
गांधींसाठी तुरुंगात गेले
कमलनाथ यांच्या वडिलांचे नाव महेंद्रनाथ आणि आईचे नाव लीला नाथ आहे. कमलनाथ यांनी 1973 मध्ये अलका नाथ यांच्याशी लग्न केले.त्यांना नकुलनाथ आणि बकुलनाथ अशी दोन मुलं आहेत. संजय गांधी यांचे मित्र म्हणूनही कमलनाथ यांची ओळख होती. त्यांची मैत्री शालेय जीवनापासून होती. आणीबाणीनंतर संजय गांधींना अटक झाली तेव्हा त्यांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून न्यायाधीशांशी गैरवर्तन करून कमलनाथ तिहार तुरुंगात गेले होते ही आठवण आजही कायम सांगितली जाते.
राजकीय प्रवास
कमलनाथ यांनी 1968 मध्ये युवक काँग्रेसमधून आपला राजकीय प्रवास सुरु केला. 1976 मध्ये त्यांना उत्तर प्रदेशच्या युवक काँग्रेसची धुरा मिळाली होती. 1970 ते 1981 पर्यंत ते अखिल भारतीय युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय परिषदेचे सदस्य होते. कमलनाथ हे 1979 मध्ये युवक काँग्रेसचे महाराष्ट्र निरीक्षक होते आणि 2000 ते 2018 पर्यंत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे ते सरचिटणीस होते. ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षही होते.
विजयी निवडणुका
कमलनाथ यांनी छिंदवाडा येथून काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर 9 वेळा लोकसभा निवडणूक जिंकली आहे. गेल्या दोन वेळा ते या मतदारसंघातून आमदार आहेत. 1980 मध्ये लोकसभा निवडणूक जिंकून कमलनाथ पहिल्यांदा संसदेत गेले होते. 1985 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत कमलनाथ विजयी झाले होते. त्यानंतर 1989, 1991, 1998, 1999, 2004, 2009 आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकाही जिंकल्या होत्या.
राज्य ते केंद्रातील प्रवास
कमलनाथ हे डिसेंबर 2018 ते मार्च 2020 या काळात मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री होते. कमलनाथ यांचे पुत्र नकुलनाथ हे सध्या छिंदवाडा येथून खासदार आहेत. तर कमलनाथ 1991 ते 1994 या काळात केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री राहिले आहेत. कमलनाथ 1995 ते 1996 या काळात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री, 2004 ते 2008 पर्यंत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री, 2009 ते 2011 पर्यंत केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री, 2012 ते 2014 पर्यंत नगरविकास मंत्री आणि संसदीय कार्य मंत्रीही ते राहिले आहेत.
ADVERTISEMENT