Former US President Donald Trump :
ADVERTISEMENT
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Former US President Donald Trump) सध्या मोठ्या वादात सापडले आहेत. या वादाचं कारण ठरलं आहे ते पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल आणि डोनाल्ड ट्रम्प यांचं कथित अफेयर. याच कथित अफेयरमुळे ट्रम्प यांना कोर्टाची पायरी चढावी लागली आहे. तसंच या प्रकरणात ते दोषी सिद्ध झाले तर त्यांना शिक्षा देखील होऊ शकते. यामुळे त्यांच्या भविष्यातील राजकीय वाटचालीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलं आहे. (Former US President Donald Trump is currently in a big controversy. Due to affair of porn star Stormy Daniels)
पण नेमकं हे प्रकरण काय आहे?
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या एक महिना अगोदर म्हणजे ऑक्टोबर 2016 मध्ये पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सला डोनाल्ड ट्रम्प यांनी 1 लाख 30 हजार डॉलर दिल्याचा आरोप आहे. अफेअरची बाब सार्वजनिक न करण्यासाठी वकील मायकल कोहेन यांच्या माध्यमातून हा व्यवहार झाल्याचा दावा आहे. इथे एक महत्वाची गोष्ट म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी अफेयर केलं किंवा पैसे दिले हा गुन्हा नसून जेव्हा वकील मायकल कोहेन यांना पैसे दिले तेव्हा ते त्यांचे कायदेशीर शुल्क म्हणून दाखवले गेले. हे दस्तऐवज फेरफारचे प्रकरण मानले जात आहे आणि न्यूयॉर्कमध्ये हा एक मोठा गुन्हा आहे. ट्रम्प यांचे वकील मायकल कोहेन यांनीही ट्रम्प यांच्या सांगण्यावरून हा गुन्हा केल्याचं मान्य केलं आहे.
हेही वाचा : “… त्याला जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही”; ठाकरेंवर फडणवीसांचा पलटवार
कोण आहे स्टॉर्मी डॅनियल?
स्टॉर्मी डॅनियल ही अमेरिकन चित्रपटसृष्टीतील अॅडल्ट फिल्म स्टार आहे. तिचे खरे नाव स्टेफनी ग्रेगरी क्लिफर्ड असून तिचा जन्म १७ मार्च १९७९ रोजी लुईझियाना येथे झाला. लुईझियानामध्येच स्टॉर्मीचे बालपण गेले. तिच्या लहानपणीच आई-वडिलांचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर तिच्या आईनेच तिला वाढवलं. एका रिपोर्टनुसार, वयाच्या 9व्या वर्षी स्टॉर्मीचे एका वयस्कर व्यक्तीने लैंगिक शोषण केले होते. पुढे पैसे कमवण्यासाठी ती हायस्कूलमध्ये स्ट्रिप क्लबमध्ये काम करू लागला. 2000 मध्ये, स्टॉर्मी मुख्य स्ट्रिप डान्सर बनली. यादरम्यान तिची डेव्हॉन मिशेलशी भेट झाली. मिशेलनेच तिला अडल्ट चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी नेले. स्टॉर्मी डॅनियल अमेरिकन गर्ल्स 2 I या अडल्ट चित्रपटात काम केले. स्टॉर्मीने अनेक प्रसिद्ध मासिकांसाठीही शूट केले. यामध्ये प्लेबॉय, हसलर, पेंटहाऊस, हाय सोसायटी, जीक्यू आणि एफएचएम यांचा समावेश आहे.
ट्रम्प आणि अॅडल्ट स्टार डेनियलची काय आहे कहाणी?
ट्रम्प आणि स्टॉर्मी यांचं अफेयर 2006 मध्ये सुरू झाले होते. त्यावर्षीच्या उन्हाळ्यात, नेवाडा येथे एक सेलिब्रिटी गोल्फ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. इथेच ट्रम्प आणि स्टॉर्मी डॅनियल्सला पहिल्यांदा भेटले. एका वृत्तानुसार, ट्रम्प यांनी स्टॉर्मीला त्यांच्या हॉटेलमधील रुममध्ये आमंत्रित केले होते. यावेळी ट्रम्प यांनी तिला टीव्हीवर शोमध्ये आणण्याचे आश्वासन दिले होते. स्टॉर्मीच्या दाव्यानुसार याचवेळी दोघांमध्ये शारिरीक संबंधही प्रस्थापित झाले. त्यावेळी ट्रम्प यांचे वय सुमारे 60 वर्षांचे होते तर ती केवळ 27 वर्षांची होती. दुसऱ्या बाजूला ट्रम्प यांनी नेहमीच स्टॉर्मी डॅनियलचे दावे फेटाळले आहेत.
हेही वाचा : Uddhav Thackeray ठाण्यात; थेट हॉस्पिटलमध्ये जाऊन घेतली शिवसेनेच्या वाघिणीची भेट
ट्रम्प पुन्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात का?
ट्रम्प यांचं सध्याच वय 77 वर्ष असून ते 2017 ते 2021 पर्यंत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांनी पुन्हा एकदा निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाकडून उमेदवारी मिळविण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. अमेरिकन राज्यघटनेनुसार, या प्रकरणात ट्रम्प यांना दोषी/दंड ठोठावण्यात आला तरी, त्यांच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्यावर कोणताही परिणाम होणार नाही. ट्रम्प 2024 च्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी त्यांचा औपचारिक प्रचार सुरू ठेवू शकतात. घटनेनुसार, अमेरिकेत जन्मलेली कोणतीही व्यक्ती जी किमान 35 वर्षे वयाची आहे किंवा किमान 14 वर्षे अमेरिकन नागरिक आहे ती राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवू शकते. तज्ज्ञांच्या मते, ट्रम्प यांना तुरुंगवास भोगावा लागला तरीही गुन्हेगारी आरोपांना सामोरे जात असताना त्यांचा अध्यक्षीय प्रचार सुरू ठेवण्यास कोणताही कायदेशीर अडथळा नाही.
ADVERTISEMENT