Gautam Gambhir : गौतम गंभीर राजकारणातून 'आऊट'

मुंबई तक

02 Mar 2024 (अपडेटेड: 02 Mar 2024, 01:18 PM)

खासदार गौतम गंभीर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आता आपण लोकसभा निवडणूक लढविणार नसून, मला खेळावर पुन्हा लक्ष केंद्रीत करायचे असल्याचे सांगत, त्यांनी राजकारण थांबवणार असल्याचेच सांगितले आहे.

gautam gambhir lok sabha elections

gautam gambhir lok sabha elections

follow google news

बातम्या हायलाइट

point

गौतम गंभीर राजकारणातून 'आऊट'

point

राजकारणातून मला मुक्त करा

Gautam Gambhir : देशातील राजकारणात सध्या लोकसभेच्या निवडणुकीचे(Lok sabha Election) वारे वाहू लागले आहेत. वेगवेगळ्या जागांवर दावे प्रतिदावे केले जात असतानाच भाजपचाच खासदार असलेल्या गौतम गंभीरने मात्र भाजपला धक्का दिला आहे. पूर्व दिल्लीचे भाजप खासदार गौतम गंभीर यांनी राजकारणातून मला मुक्त करण्याची विनंती करत आता राजकारणात न आता खेळावर लक्ष करायचे असल्याचे सांगितले आहे. 

हे वाचलं का?

गौतम गंभीर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आता आपल्याला राजकारणात न राहता किक्रेटवर लक्ष केंद्रीत करायचे असल्याचे त्यांनी पोस्टमध्ये सांगितले आहे. गौतम गंभीर हे 2019 मध्ये लोकसभेची निवडणूक जिंकून ते लोकसभेत गेले होते.

हे ही वाचा >>'सत्तातुरांना ना भय ना लज्जा!', 'सामना'तून सरकारचे वाभाडे

गौतम गंभीर यांनी सोशल मीडियावर पोस्टमध्ये करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे आभार मानत त्यांनी भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याकडे आपल्याला राजकीय कर्तव्यातून मुक्त करण्याची विनंती केली आहे. 

यावेळी त्यांनी राजकारणातून मुक्त करण्याची विनंती केली असली तरी त्याचवेळी त्यांनी आपल्याला आता क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करायचे आहे असंही त्यांनी सांगितले आहे.

गौतम गंभीर हे सध्या भाजपच्या तिकिटावर पूर्व दिल्लीतून लोकसभेचे खासदार आहेत. गौतम गंभीर हा T20 विश्वचषक 2007 आणि एकदिवसीय विश्वचषक 2011 मध्ये भारतीय संघात होता. गौतम गंभीरने दोन्ही स्पर्धांच्या फायनलमध्ये भारतीय संघासाठी मॅचविनिंग इनिंग खेळली होती. 

गौतम गंभीरने टी-20 विश्वचषकाच्या फायनलमध्येही 54 चेंडूत 75 धावा केल्या होत्या. त्याच वेळी, एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात त्याच्या बॅटमधून 91 धावांचा पाऊस पडला होता. गंभीर सध्या आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सचा (केकेआर) मार्गदर्शक असून ते सध्या लखनौ सुपर जायंट्सचा (एलएसजी) मार्गदर्शकही राहिला आहे.

गौतम गंभीरकडून इंडियासाठी शेवटची कसोटी 2016 मध्ये राजकोटमध्ये इंग्लंडविरुद्ध खेळली होती. गौतम गंभीरकडून त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये 58 कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.  आणि 41.95 च्या सरासरीने 4154 धावा केल्या होत्या व त्यामध्ये 9 शतकं केली होती. 

    follow whatsapp